Lokmat Sakhi >Food > नागपंचमी स्पेशल गव्हाची खीर! श्रावणातल्या हवेत खायला हवा असा पौष्टिक पदार्थ- पारंपरिक सोपी रेसिपी

नागपंचमी स्पेशल गव्हाची खीर! श्रावणातल्या हवेत खायला हवा असा पौष्टिक पदार्थ- पारंपरिक सोपी रेसिपी

Nag Panchami Special Gavhachi Kheer: नागपंचमीच्या सणाला गव्हाची खीर करण्याची परंपरा अनेक भागांत दिसून येते. ही उत्तम चवीची आणि अतिशय पौष्टिक असणारी गव्हाची खीर करण्याची (How to make wheat kheer) ही बघा पारंपरिक पद्धत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2022 12:52 PM2022-08-01T12:52:48+5:302022-08-01T12:55:26+5:30

Nag Panchami Special Gavhachi Kheer: नागपंचमीच्या सणाला गव्हाची खीर करण्याची परंपरा अनेक भागांत दिसून येते. ही उत्तम चवीची आणि अतिशय पौष्टिक असणारी गव्हाची खीर करण्याची (How to make wheat kheer) ही बघा पारंपरिक पद्धत.

Nag Panchami Special Food: How to make wheat kheer, Gavhachi kheer recipe for Nag Panchami festival | नागपंचमी स्पेशल गव्हाची खीर! श्रावणातल्या हवेत खायला हवा असा पौष्टिक पदार्थ- पारंपरिक सोपी रेसिपी

नागपंचमी स्पेशल गव्हाची खीर! श्रावणातल्या हवेत खायला हवा असा पौष्टिक पदार्थ- पारंपरिक सोपी रेसिपी

Highlightsगव्हाची खीर करण्यासाठी आपण गहू रात्रभर पाण्यात भिजत ठेवतो. गहू भिजवून ठेवल्याने त्यांच्यातली पौष्टिकता आणखी वाढते.

श्रावण सुरु झाला आणि श्रावणातला पहिला नागपंचमीचा सण (festivals in Shravan/Savan) आता येऊन ठेपला आहे. त्यानिमित्ताने सध्या घरोघरी या सणाची तयारी सुरु झालेली असणार. भारतीय सणांची खासियत म्हणजे प्रत्येक सणाला ऋतुमानानुसार बदलणारा आहार. म्हणूनच तर नागपंचमीला पुरणाचे दिंड, गव्हाची खीर (wheat kheer or Gavhachi kheer recipe) असे पदार्थ केले जातात. हा सण झाला की एरवी आपण हे पदार्थ नंतर वर्षभर क्वचितच करतो किंवा करतही नाही. त्यामुळे मग कधीतरी त्यांची रेसिपी (Nag Panchami special recipe) विसरलीही जाते. म्हणूनच तर ही बघा एक खास रेसिपी. ही रेसिपी यु ट्यूबच्या MadhurasRecipe या चॅनलवर शेअर करण्यात आली आहे. 

 

नागपंचमी स्पेशल गव्हाची खीर रेसिपी 
साहित्य

१ कप गहू, खपली गहू असेल तर आणखी उत्तम.
वेलची पूड अर्धा चमचा
बदाम आणि काजूचे तुकडे प्रत्येकी एकेक टेबलस्पून
१० ते १५ मनुका
१ कप गूळ
३ ते ४ चमचे साजूक तूप


कृती
- गहू पाखडून, निवडून किंवा चाळून तो स्वच्छ करून घ्या, धुवून घ्या आणि त्यानंतर रात्रभर पाण्यात भिजत घाला.
- यानंतर सकाळी ३ कप पाणी आणि रात्रभर भिजलेला गहू थेट कुकरमध्ये शिजण्यासाठी घाला. मध्यम आचेवर साधारण ८ ते १० शिट्ट्या होऊ द्या. गहू शिजायला थोडा जास्त वेळ लागतोच. नसेल शिजला तर आणखी थोडा वेळ शिजवा.
- आता शिजलेला गहू मिक्सरमध्ये भरडून घ्या किंवा मग रवीने फेटून घ्या.
- कढईमध्ये ४ टेबलस्पून तूप टाका. तूप तापल्यानंतर त्यामध्ये काजू- बदामाचे तुकडे टाकून परतून घ्या. त्यानंतर मनुका घाला.


- सुकामेवा परतून घेतल्यानंतर त्यात गव्हाची भरड टाका आणि ३ ते ४ मिनिटे परतून घ्या.
- गहू व्यवस्थित परतून झाला की त्यात पाणी घाला. गहू शिजवून उरलेलं जे पाणी आहे, ते पाणी या खिरीत टाका. 
- गहू आणि पाणी एकजीव झालं की त्यात किसलेला गूळ घाला आणि ८ ते १० मिनिटे शिजवून घ्या.
- जसंजसं शिजत जातं, तसतसं खिरीतलं पाणी आटत जातं. त्यामुळे वरतून एखादा ग्लास पाणी तरी घालावेच लागते.
- खीर शिजत आली की त्यात वेलची पूड घाला. हा झाला खिरीचा बेस तयार.
- जेव्हा खीर सर्व्ह करणार असाल तेव्हा ऐनवेळी त्यात दूध घाला आणि मग सर्व्ह करा.
- गरम खीर असेल तर गरम दूध घाला. खीर थंड झाली असेल तर थंड दूध वापरा.
- थंड किंवा गरम अशा दोन्ही पद्धतीने ही खीर खाता येते.

 

गव्हाची खीर खाण्याचे फायदे 
- गव्हामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात. त्यामुळे पचनासाठी ही खीर अतिशय उत्तम मानली जाते.
- गव्हाची खीर करण्यासाठी आपण गहू रात्रभर पाण्यात भिजत ठेवतो. गहू भिजवून ठेवल्याने त्यांच्यातली पौष्टिकता आणखी वाढते.
- गव्हामध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. 
- ही खीर करताना आपण गूळ टाकतो. त्यामुळे त्यातून लोह मिळते.
- अशक्तपणा घालविण्यासाठी ही खीर खाणं फायद्याचं ठरतं. 

 

Web Title: Nag Panchami Special Food: How to make wheat kheer, Gavhachi kheer recipe for Nag Panchami festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.