नागपंचमीच्या (Nag Panchami) दिवशी अनेक सुवासिनी नागाची पुजा करायला वारुळावर जातात. काही जणी घरी पुजा करतात. पुजा घरी करो अथवा वारुळाच्या ठिकाणी जाऊन. त्या पुजेच्या थाळीमध्ये नागोबाला अर्पण करण्यासाठी साळीच्या लाह्या (salichya lahya) आणि दूध हे २ पदार्थ हमखास असतातच. आपल्या माहितीच आहे की प्रत्येक भारतीय सण (Indian festival) हा आरोग्याशी संबंधित असताे. ज्या सणाला ज्या पदार्थाचे महत्त्व असते, तो पदार्थ त्या काळात खाणे अतिशय फायदेशीर (benefits of eating lahya) असते. म्हणूनच तर संक्रांतीच्या सणाला तिळ- गुळाचे विशेष महत्त्व असते. तसेच काहीसे नागपंचमीच्या नैवेद्याला (Nag Panchami naivedya) असणाऱ्या साळीच्या लाह्यांचेही आहेच..
साळीच्या लाह्या खाण्याचे फायदे
१. पावसाळ्याच्या दिवसांत संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढलेले असते. वातावरण बदलामुळे या काळात बऱ्याच जणांना सर्दी, खोकला, कफ असा त्रास होतोच. कफ, सर्दी कमी करण्यासाठी साळीच्या लाह्या खाणे पोषक ठरते.
२. लाह्यांमध्ये फायबर मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होते.
जेवणानंतर लगेच ४ गोष्टी करणं टाळा, तब्येतीच्या लहानमोठ्या तक्रारी कमी होतील
३. लाह्यांमुळे पचनक्रिया आणि चयापचय क्रिया या दोन्हीही सुरळीत होत असल्याने वेटलॉस होण्यासाठी लाह्या खाणे उपयुक्त ठरते. जे वेटलॉस करत आहेत, अशांसाठी साळीच्या लाह्या आणि दूध हा एक उत्तम वेटलॉस ब्रेकफास्ट ठरू शकतो. यामु्ळे अधिक काळ एनर्जी टिकून राहते आणि बराच वेळ भूकही लागत नाही.
४. लाह्या खाल्ल्यामुळे ॲसिडिटी कमी होते. म्हणूनच गरोदरपणात उलट्या, मळमळ, जळजळ असा त्रास होत असेल तर साळीच्या लाह्या खाण्याचा सल्ला दिला जातो.
५. लाह्यांमध्ये ॲण्टीऑक्सिडंट्स तसेच कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते.
फोडणीच्या लाह्या... एक उत्तम हेल्दी ब्रेकफास्ट
लाह्या खाण्याचे फायदे तर आपण आताच पाहिले. म्हणूनच आता याच लाह्यांपासून एक चटकदार रेसिपी कशी बनवायची, ते पाहू या. अनेक जणांना नुसत्या लाह्या खाणं आवडत नाही. म्हणूनच ही अगदी सोपी अवघ्या ५ ते ७ मिनिटांत होणारी रेसिपी करून बघा. यामुळे लाह्या अतिशय चटकदार लागतात. वेटलॉस करणाऱ्यांसाठी ही एक परफेक्ट रेसिपी ठरू शकते.
नागपंचमी स्पेशल गव्हाची खीर! श्रावणातल्या हवेत खायला हवा असा पौष्टिक पदार्थ- पारंपरिक सोपी रेसिपी
साहित्य
२ वाटी लाह्या, चवीनुसार तिखट- मीठ, शेंगदाणे, दिड ते २ टेबलस्पून दही, फोडणीसाठी तूप, मोहरी, जिरे आणि हिंग, थोडासा कढीपत्ता, थोडीशी साखर.
कृती
- लाह्या एका भांड्यात घेऊन त्यात चवीनुसार तिखट आणि मीठ टाका.
- फोडणीसाठी एक छोटी कढई गॅसवर तापायला ठेवा. त्यात तूप टाका.
- तूप तापल्यानंतर त्यात मोहरी, जिरे, हिंग, चिमुटभर हळद टाकून फोडणी करून घ्या.
- फोडणीतच थोडे शेंगदाणे आणि कढीपत्ता टाका. फोडणीत परतून घेतलेले शेंगादाणे अधिक खमंग लागतात.
- आता ही फोडणी लाह्यांवर टाका. वरतून दही आणि थोडीशी साखर टाका.
- सगळे मिश्रण एकदा व्यवस्थित हलवून घेतले की फोडणी घातलेल्या खमंग, चवदार लाह्या झाल्या तयार.