Lokmat Sakhi >Food > नागपंचमी स्पेशल : पुरणाच्या दिंडांची पारंपरिक रेसिपी, नागपंचमीला आजी करायची तसे वाफाळलेले दिंड तर हवेच..

नागपंचमी स्पेशल : पुरणाच्या दिंडांची पारंपरिक रेसिपी, नागपंचमीला आजी करायची तसे वाफाळलेले दिंड तर हवेच..

Puran Dind Recipe Nagpanchami Special : पुरणाचे दिंड चांगले होण्यासाठी त्यातले पुरण, वरचे आवरण चांगले झाले तरच दिंड चांगले होतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2023 09:10 AM2023-08-21T09:10:55+5:302023-08-21T11:53:03+5:30

Puran Dind Recipe Nagpanchami Special : पुरणाचे दिंड चांगले होण्यासाठी त्यातले पुरण, वरचे आवरण चांगले झाले तरच दिंड चांगले होतात.

Nag Panchami Special Puran Dind Recipe : Traditional recipe of Purana Dinda; Make sure to try an easier recipe than Puranpoli | नागपंचमी स्पेशल : पुरणाच्या दिंडांची पारंपरिक रेसिपी, नागपंचमीला आजी करायची तसे वाफाळलेले दिंड तर हवेच..

नागपंचमी स्पेशल : पुरणाच्या दिंडांची पारंपरिक रेसिपी, नागपंचमीला आजी करायची तसे वाफाळलेले दिंड तर हवेच..

श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. ग्रामीण भागात तर हा सण आवर्जून साजरा केला जातो. शेतकऱ्यासाठी महत्त्वाचा असलेल्या या नागाची या दिवशी पूजा केली जाते. नागोबाला लाह्या, बत्तासे आणि पुरणाचा नैवेद्य करण्याची पद्धत फार पूर्वापार चालत आली आहे. पुरण म्हणजे पुरणपोळी असं आपल्या डोक्यात पक्क गणित असतं. पण नागपंचमीला याच पुरणाच्या पोळ्या न करता दिंड केले जातात. नागपंचमीला सुरी, तवा वापरत नसल्याने हा पदार्थ केला जातो. पुरणाच्या पोळ्या चांगल्या जमल्या तरच त्या छान लागतात, त्याचप्रमाणे पुरणाचे दिंडही चांगले झाले तरच मज्जा येते. पुरणाचे दिंड चांगले होण्यासाठी त्यातले पुरण, वरचे आवरण चांगले झाले तरच दिंड चांगले होतात. हे दिंड परफेक्ट जमण्यासाठी नेमकं काय आणि कंस करायचं पाहूया 
(Puran Dind Recipe Nagpanchami Special)...

पुरणाचे साहित्य - 

१. हरभरा डाळ - १ वाटी 

२. पाणी - २ ते ३ वाट्या

(Image : Google)
(Image : Google)

३. हळद - चिमूटभर    

४. गूळ -  १ ते १.५ वाटी 

५. वेलची पावडर - २ चिमूट 

६. जायफळ पूड - २ चिमूट

कृती - 

१. हरभरा डाळ स्वच्छ धुवून ६ तास किंवा रात्रभर पाण्यात भिजवून ठेवायची. 

२. सकाळी यामध्ये असलेले पाणी आणि वरुन थोडे पाणी घालून ही डाळ कुकरला शिजवायला लावायची. 

३. शिजवतानाच यामध्ये चिमूटभर हळद घालायची, ३ ते ४ शिट्ट्यांमध्ये डाळ छान शिजते. 

४. कुकरचे झाकण पडले की डाळ गाळून घ्यायची. त्याचे पाणी म्हणजेच कट आपण आमटीसाठी वापरतो. 

५. ही घट्टसर डाळ स्मॅशर किंवा रवीने एकजीव करुन ती कढईत घालावी. त्यामध्ये गूळ घालावा.

६. हे सगळे छान एकजीव झाले की गुळाला पाणी सुटते. चांगले परतून घट्टसर होईपर्यंत हलवत राहावे. 

७. यामध्ये आवडीप्रमाणे जायफळ पावडर आणि वेलची पूड घालावी.

८. थोडे थंड झाले की पुरण यंत्रातून वाटून घ्यायचे. 

आवरणाचे साहित्य 

१. गव्हाचे पीठ - दोन वाट्या 

(Image : Google)
(Image : Google)

२. मीठ - चवीपुरते

३. तेल - पाव वाटी

४. पाणी - आवश्यकतेनुसार

कृती 

१. गव्हाच्या पीठामध्ये चवीपुरते मीठ आणि तेलाचे गरम मोहन घालावे. 

२. नंतर अंदाजे हळूहळू पाणी घालून घट्टसर कणीक मळून घ्यायची. 

३. अर्धा तास ही कणीक थोडं तेल लावून बाजूला ठेवून द्यायची.  


दिंड कृती 

१. कणकेचे पुरीएवढे गोळे करुन त्याच्या एकसारख्या मध्यम जाडीच्या पुऱ्या लाटायच्या.

२. यामध्ये पुरण भरुन ही पुरी चारही बाजुने बंद करायची.

३. एकीकडे पातेल्यात किंवा स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवायचे.

४. वरती चाळणीमध्ये केळ्याचे पान किंवा सुती कापड घेऊन त्यावर हे तयार दिंड ठेवायचे.

५. ही चाळणी स्टीमर किंवा पातेल्यावर ठेवायची आणि १० ते १५ मिनीटे चांगली वाफ काढून घ्यायची. 

६. गरमागरम दिंडाला मध्यभागी बोटाने दाबून त्यात भरपूर तूप घालून दिंड खायचे. 

Web Title: Nag Panchami Special Puran Dind Recipe : Traditional recipe of Purana Dinda; Make sure to try an easier recipe than Puranpoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.