Lokmat Sakhi >Food > नागपूर स्पेशल झणझणीत पाटवडी करण्याची पाहा झटपट, पारंपरिक रेसिपी! न थापता करा मऊ लुसलुशीत वडी, तोंडाला येईल चव

नागपूर स्पेशल झणझणीत पाटवडी करण्याची पाहा झटपट, पारंपरिक रेसिपी! न थापता करा मऊ लुसलुशीत वडी, तोंडाला येईल चव

How to Make Nagpur Special Patodi: Vidarbha’s Delicious Patodi Recipe: Step-by-Step Guide to Making Patodi: Authentic Patodi Recipe from Vidarbha: How to Cook Patodi: Nagpur Patodi Recipe: Traditional Vidarbha Patodi Recipe for a Taste of Maharashtra: नागपूरची पारंपारिक झटपट बनणारी पाटवडीची करुन पाहा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2025 14:55 IST2025-03-17T14:54:41+5:302025-03-17T14:55:53+5:30

How to Make Nagpur Special Patodi: Vidarbha’s Delicious Patodi Recipe: Step-by-Step Guide to Making Patodi: Authentic Patodi Recipe from Vidarbha: How to Cook Patodi: Nagpur Patodi Recipe: Traditional Vidarbha Patodi Recipe for a Taste of Maharashtra: नागपूरची पारंपारिक झटपट बनणारी पाटवडीची करुन पाहा.

Nagpur special Patodi how to make traditional recipe Vidarbha's Maharashtrian dish | नागपूर स्पेशल झणझणीत पाटवडी करण्याची पाहा झटपट, पारंपरिक रेसिपी! न थापता करा मऊ लुसलुशीत वडी, तोंडाला येईल चव

नागपूर स्पेशल झणझणीत पाटवडी करण्याची पाहा झटपट, पारंपरिक रेसिपी! न थापता करा मऊ लुसलुशीत वडी, तोंडाला येईल चव

भारत हा असा देश आहे जिथे अनेक पदार्थांची चव चाखयला मिळते. विविध राज्यानुसार पदार्थांच्या चवी देखील बदलतात. (How to Make Nagpur Special Patodi) प्रत्येक राज्य आणि शहरात वेगवेगळ्या खाण्याच्या सवयी, परंपरा आणि खवय्याला मंत्रमुग्ध करण्यासाठी काही वेगवेगळे पदार्थ असतात.(Vidarbha’s Delicious Patodi Recipe) खवय्याप्रेमींसाठी नागपूर हे शहर अगदी खास आहे. (Step-by-Step Guide to Making Patodi)
संत्रीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या शहराला ऑरेंज सिटी म्हणूनही ओळखले जाते.(Authentic Patodi Recipe from Vidarbha) नागपूरमध्ये अनेक खास पदार्थांची चव चाखायला मिळते. ज्यात तर्री पोहे, पाटोडी, नागपुरी समोसा, साओजी आणि खबरी हे फेमस पदार्थ आहे. अनेकदा घरात भाजी नसली की, गृहिणींना प्रश्न पडतो.(Nagpur Patodi Recipe) घरातल्यांना रोज तेच तेच पदार्थ खाऊन वैताग येतो. अशावेळी काही झणझणीत खाण्याची इच्छा होते. जर आपल्याही घरी असेच काहीसे होत असेल तर नागपूरची पारंपारिक झटपट बनणारी पाटवडीची करुन पाहा. (Traditional Vidarbha Patodi Recipe for a Taste of Maharashtra)

३ पदार्थ वापरुन घरीच तयार करा डाळिंबाची जेली; परफेक्ट बनेल, विकतचे जेली-जॅम विसराल


साहित्य 

हिरवी मिरची - ४
लसूण पाकळ्या - अर्धी वाटी
जिरे - १ चमचा 
ओवा - १ चमचा 
कोथिंबीर - आवश्यकेतनुसार 
बेसनाचे पीठ - १ वाटी 
पाणी - २ कप 
पांढरे तीळ - १ चमचा 
तेल - १ चमचा 
हळद- अर्धा चमचा
हिंग - चवीनुसार  
मीठ - चवीनुसार 

">

कृती 

1. सगळ्यात आधी बेसनाचे पीठ आणि पाणी घालून त्याचे पातळ मिश्रण बनवा. 

2. यानंतर मिक्सरमध्ये हिरवी मिरची, लसूण, जिरे, ओवा आणि कोथिंबीर घालून त्याचे वाटण तयार करा. 

3. कढईत तेल तापवून त्यात पांढरे तीळ, वाटण, हळद आणि हिंग घालून चांगले परतवून घ्या. वरुन त्यात कपभर पाणी घालून चांगले ढवळून घ्या. 

4. आता यात मीठ घाला, उकळी आल्यानंतर त्यात बेसनाची तयार केलेले पातळ मिश्रण घाला. चांगले ढवळत राहा. 

5. मिश्रण चांगले शिजल्यानंतर एका ताटात चमचाभर काढा. थंड झाल्यानंतर ते सहज निघाले तर मिश्रण व्यवस्थित झाले. 

6. त्यानंतर ताटाला तेल लावून मिश्रण घेऊन व्यवस्थित सेट करा. वरुन तीळ आणि कोथिंबीर घाला. 

7. मिश्रण थंड झाल्यानंतर त्याचा वड्या पाडा. 
 

Web Title: Nagpur special Patodi how to make traditional recipe Vidarbha's Maharashtrian dish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.