Join us  

ओल्या नारळाच्या वड्या करा फक्त १५ मिनिटांत, खुटखुटीत-पांढरीशुभ्र वडी तोंडात टाकताच विरघळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2024 3:56 PM

naralachi vadi | Maharashtrian coconut mithai : नारळाच्या वड्या करताना हमखास होणाऱ्या चुका टाळा; वड्या होतील परफेक्ट..

सणवार कोणताही असो अनेक घरांमध्ये गोडाचे पदार्थ आवर्जून केले जातात (Naral Vadi). लाडू असो किंवा वडी बरेच जण घरी बनवण्यापेक्षा मिठाईच्या दुकानातून आणतात (Food). कारण घरात तयार करताना लाडू किंवा वडी फसतात. खोबऱ्याचे लाडू किंवा खीरमध्ये ओलं खोबऱ्याचा वापर होतो (Cooking Tips). पण बरेच जण घरात ओल्या खोबऱ्याचे वडी करतात.

ओल्या खोबऱ्याची वडी काळपट तर कधी खुटखुटीत होत नाही. जर आपल्याला परफेक्ट ओल्या खोबऱ्याची वडी करायची असेल तर, तर या सोप्या पद्धतीने ओल्या खोबऱ्याची खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारी वडी करून पाहा. अगदी १५ मिनिटात ओल्या खोबऱ्याची वडी तयार करून होईल(naralachi vadi | Maharashtrian coconut mithai).

सुनील शेट्टी सांगतो ३ नियम, वयासोबत फिटनेसही वाढेल आणि आजार जवळपास फिरकणार नाहीत

ओल्या खोबऱ्याची वडी करण्यासाठी लागणारं साहित्य

किसलेलं ओलं खोबरं

पाणी

साखर

वेलची पूड

पाणी पिताना केलेल्या ३ चुका पडतात महागात; पचनक्रिया बिघडेलच- फुफ्फुसावरही होईल परिणाम

कृती

सर्वात आधी कढई गरम करण्यासाठी ठेवा. त्यात एक कप साखर घाला. नंतर त्यात साखर भिजेल इतके पाणी घाला. जास्त पाणी घालणं टाळा. यामुळे बऱ्याचदा लोकांचे पाक करताना चुका होतात, ज्यामुळे पाक बिघडतो. गॅस मध्यम आचेवर ठेवा, आणि साखर विरघळेपर्यंत चमच्याने ढवळत राहा.

उकळी आल्यानंतर त्यात एक बाऊल किसलेलं ओलं खोबरं घालून मिक्स करा. नंतर त्यात अर्धा चमचा वेलची पूड घालून मिक्स करत राहा. मिक्स केल्यानंतर एका भांड्याला बटर पेपर लावून कव्हर करा. त्यात मिश्रण ओतून चमच्याने पसरवा, आणि भांडं ८ तास फ्रिजमध्ये ठेवा. जेणेकरून वडी व्यवस्थित सेट होईल.

८ तास वडी फ्रिजमध्ये सेट झाल्यानंतर त्यावर बारीक चिरलेले ड्रायफ्रुट्स घालून गार्निश करा. अशा प्रकारे ओल्या खोबऱ्याची वडी खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स