Join us  

बघा नारळ सोलण्याची सोपी ट्रिक- एका झटक्यात खोबरं येईल करवंटीच्या बाहेर! झटपट करा नारळीभात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2024 9:03 AM

How To Remove Coconut From Shell: नारळी पौर्णिमेला भावासाठी नारळीभात करायचा असेल तर झटपट नारळ खोवण्याची ही एक सोपी ट्रिक एकदा पाहून घ्या... (Narali pournima special 2024)

आपल्याकडच्या सणांची मजा काही औरच असते.. कारण प्रत्येक सणाच्या प्रथा- परंपरा जशा वेगळ्या असतात, तसेच त्या त्या सणाचे काही खास पदार्थही असतात. म्हणूनच तर एरवी आपण कधीही नारळीभात करत नाही. पण राखीपौर्णिमा किंवा नारळीपौर्णिमेच्या निमित्ताने नारळीभात हमखास केलाच जातो. आता नारळीभात करायचा म्हणजे मग नारळ फोडणं, खोवणं ओघाने आलंच.. तेच सगळ्यात जास्त अवघड असणारं काम कोणतीही जास्त मेहनत न घेता झटपट कसं करावं ते पाहा. करवंटीतून नारळ बाहेर काढण्याची ही ट्रिक एकदम सोपी आहे. (simple and most easy hack to remove coconut shell)

 

खोबरे करवंटीबाहेर काढण्याची सोपी ट्रिक

आपण नारळ फोडतो तेव्हा खोबऱ्याचा तुकडा करवंटीमध्येच अडकलेला असतो. तो बाहेर काढण्यासाठी आपण सुरी, किंवा उलथणे अशा वस्तूंचा वापर करतो. पण बऱ्याचदा त्या वस्तू आपल्यालाच इजा करतात. म्हणूनच आता ही एक सोपी ट्रिक पाहा. 

वजन- शुगर वाढू नये म्हणून जेवताना कोणता पदार्थ कधी खावा? डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचा खास सल्ला

कमीतकमी मेहनतीत खोबरे करवंटीबाहेर काढण्यासाठी खोबऱ्याची वाटी गॅसवर ठेवा आणि १० ते १२ सेकंद ती गरम होऊ द्या.

त्यानंतर ती गॅसवरून खाली घ्या. आता खोबरं आणि करवंटीच्या मधल्या गॅपमध्ये सुरी किंवा उलथणे घालून अलगद ते ओट्यावर, जमिनीवर आपटा. लगेचच करवंटीमधून खोबरे बाहेर येईल. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.