Lokmat Sakhi >Food > रक्षाबंधन स्पेशल : पांढऱ्याशुभ्र खुटखुटीत नारळ्याच्या वड्या करण्याची परफेक्ट रेसिपी, सर्वांच्या आवडीची गोडगोड वडी !

रक्षाबंधन स्पेशल : पांढऱ्याशुभ्र खुटखुटीत नारळ्याच्या वड्या करण्याची परफेक्ट रेसिपी, सर्वांच्या आवडीची गोडगोड वडी !

Narali Purnima Special : Easy Coconut Burfi Recipe, Indian Sweet : नारळीपौर्णिमेनिमित्त नारळी भात, नारळी पाकाचे लाडू आणि नारळाची वडी तर हवीच हवी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2023 02:40 PM2023-08-25T14:40:01+5:302023-08-25T14:55:59+5:30

Narali Purnima Special : Easy Coconut Burfi Recipe, Indian Sweet : नारळीपौर्णिमेनिमित्त नारळी भात, नारळी पाकाचे लाडू आणि नारळाची वडी तर हवीच हवी!

Narali Purnima Special : Soft Coconut Barfi in 15 Minutes, Naralachi Vadi Recipe. | रक्षाबंधन स्पेशल : पांढऱ्याशुभ्र खुटखुटीत नारळ्याच्या वड्या करण्याची परफेक्ट रेसिपी, सर्वांच्या आवडीची गोडगोड वडी !

रक्षाबंधन स्पेशल : पांढऱ्याशुभ्र खुटखुटीत नारळ्याच्या वड्या करण्याची परफेक्ट रेसिपी, सर्वांच्या आवडीची गोडगोड वडी !

रक्षाबंधन म्हटल्यावर बहिण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते आणि सोबतच मिठाई भरवून त्याचं तोंड गोड करते. राखीपौर्णिमा म्हणजेच नारळीपौर्णिमा. महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या बऱ्याच भागांत हा सण अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी भावाला ओवाळून राखी बांधल्यानंतर त्याला नारळाचा गोड पदार्थ भरवला जातो. यामध्ये नारळी भात, नारळाचा लाडू, नारळाची करंजी, नारळाची वडी यांपैकी काही ना काही आवर्जून केले जाते. 

नारळी पौर्णिमेच्या दिवशी नारळापासून तयार केलेल्या पदार्थांना विशेष असे महत्त्व असते. नारळाच्या विविध पदार्थांचा नैवेद्य देवाला दाखवून हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आपल्याकडे प्रत्येक सणानुसार त्या - त्या वेळेला काही पारंपरिक पदार्थ हे आवर्जून केले जातात. राखीपौर्णिमेला केल्या जाणाऱ्या नारळाच्या अनेक पदार्थांपैकी नारळी वडी हा एक सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ आहे. नारळाची वडी (Naralachi Vadi) आपण क्वचितच करतो. परंतु खायला खुसखुशीत आणि तोंडात टाकली की विरघळणारी ही नारळाची वडी (Naralachi Vadi) नेमकी कशी करायची असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. काहीवेळा आपण ही नारळाची वडी बनवतो तेव्हा त्यातील साखर संपूर्णपणे विरघळत नाही, ती तशीच राहून वडी खाताना चरचरीत लागते. याचबरोबर वड्या काहीवेळा ओल्या राहतात. या सगळ्या कारणांमुळे नारळाची वडी (Naralachi Vadi) आपल्याला पाहिजे तशी खुसखुशीत होत नाही. यासाठी नारळाची वडी नेमकी कशी बनवावी याची सोपी रेसिपी पाहूयात(Narali Purnima Special : Soft Coconut Barfi in 15 Minutes, Naralachi Vadi Recipe).

साहित्य :- 

१. नारळ - मध्यम आकाराचा १ नारळ 
२. साखर - सव्वा कप साखर 
३. पाणी - अर्धा कप
४. लिंबाचा रस - अर्धा टेबलस्पून 
५. वेलची पावडर - पाव टेबलस्पून 
६. तूप - १ ते २ टेबलस्पून 

मंगळागौरी निमित्त पारंपरिक भाजणीचे वडे बनवण्याची सोपी कृती, वडे होतील खमंग - खुसखुशीत...

कृती :- 

१. सर्वप्रथम खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यावेत, या खोबऱ्याचा पांढराशुभ्र भाग वेगळा काढून घ्यावा. 
२. आता हे खोबऱ्याचे तुकडे मिक्सरमध्ये घालून त्याचा किस करून घ्यावा. 
३. त्यानंतर एका मोठ्या काढईमध्ये साखर घेऊन साखर पूर्ण भिजेल इतके पाणी घालावे. 
४. गॅस मंद आचेवर ठेवून चमच्याने ढवळत ही साखर पाण्यांत संपूर्णपणे विरघळवून घ्यावी. त्यात लिंबाचा रस घालावा. 

भजी - वडे एकदम गोल गरगरीत एकसारखे होण्यासाठी १ सोपी ट्रिक, सणावाराला करा उत्तम भजी - वडे...

फक्त १० मिनिटांत फ्रिजमध्ये करून ठेवा ४ प्रकारची वाटणं, रोजचा स्वयंपाक होईल चमचमीत - झटपट...

५. साखर संपूर्ण विरघळल्यानंतर त्यात खोबऱ्याचा किस घालावा. नंतर गॅसची आच मंद करून चमच्याने ढवळत राहावे.
६. जेव्हा या मिश्रणातील सगळे पाणी शोषले जाऊन मिश्रण कोरडे होईल तोपर्यंत मिश्रण ढवळत राहावे. 
७. या मिश्रणाचा गोळा घट्टसर गोळा तयार झाल्यानंतर एका डिशला तूप लावून त्यात हे मिश्रण गरम असतानाच ओतून चमच्याने किंवा हाताने थापून घ्यावे. 
८. मिश्रण गरम असतानाच हलक्या हाताने सुरीच्या मदतीने त्यांचे काप पाडून घ्यावेत. 
९. थोड्यावेळाने मिश्रण थंड झाल्यावर या वड्या खाण्यासाठी सर्व्ह कराव्यात. 

गुळाचा चहा फुटू नये म्हणून ५ टिप्स, न फाटता - न नासता चहा होईल फक्कड !!

घरच्याघरी १० मिनिटांत चहा मसाला करण्याची सोपी कृती, पावसाळ्यात ‘मसाला चाय’ प्या मनसोक्त...

नारळाची वडी तयार करण्यासाठी टिप्स :- 

१. नारळाच्या वड्यांसाठी साखरेचा पाक तयार करताना त्यात जास्त पाणी घालू नये. 

२. साखरेच्या पाकात लिंबाचा रस घालावा यामुळे वड्यांना छान पांढराशुभ्र रंग येतो. 

३. साखरेच्या पाकात खोबर घातल्यावर त्यातील पाण्याचा अंश संपूर्णपणे काढून मिश्रण कोरडे करून घ्यावे यामुळे वड्या ओल्या राहणार नाहीत. 

४. साखरेचा पाक व खोबऱ्याचे मिश्रण तयार करताना ते मंद आचेवर ठेवावे नाहीतर मिश्रणाचा रंग बदलून वड्या थोड्या लालसर होतात.

Web Title: Narali Purnima Special : Soft Coconut Barfi in 15 Minutes, Naralachi Vadi Recipe.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.