नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हटले जाते. नारळाचा वापर अनेक कारणांसाठी होतो. नारळाचे पाणी आणि खोबऱ्याचा वापर आपण जेवणात करतोच. खोबऱ्याची चटणी, ओल्या नारळाचे लाडू, खोबऱ्याची वडी आपण खाल्लीच असेल. पण आपण कधी खोबऱ्याची खीर करून पाहिली आहे का? जेवणानंतर अनेकांना गोड पदार्थ खाण्याची सवय असते.
सध्या सणावाराचे दिवस आहेत, गोड पदार्थ म्हणून आपण ओल्या नारळाची खीर करून पाहू शकता. ही खीर चवीला भन्नाट तर लागतेच, शिवाय करायलाही सोपी आहे. कमी वेळात - कमी मेहनत घेता, ही खीर तयार होते. यंदाच्या गणेश चतुर्थीनिमित्त गोड पदार्थात काहीतरी हटके म्हणून आपण ओल्या नारळाची खीर तयार करू शकता(Nariyal Ki Kheer Recipe - Coconut Pudding).
ओल्या नारळाची खीर करण्यासाठी लागणारं साहित्य
ओलं खोबरं
रवा
दूध
सुकामेवा
दूध
केसर
दररोज मुठभर भाजलेले चणे खाण्याचे ६ फायदे, फक्त स्नॅक्स म्हणून खाऊ नका - आनंदाने खा पोटभर
साखर
वेलची पूड
कृती
सर्वप्रथम, पॅन गरम करण्यासाठी ठेवा. त्यात एक चमचा तूप घाला. तूप विरघळल्यानंतर त्यात २ चमचे रवा घालून खरपूस भाजून घ्या. रवा भाजून झाल्यानंतर त्यात एक कप बारीक चिरलेला सुकामेवा घाला. त्यानंतर त्यात एक कप किसलेलं ओलं खोबरं घालून खरपूस भाजून घ्या. खोबरं भाजून घेतल्यानंतर त्यात एक कप दूध, अर्धा कप साखर घालून चमच्याने ढवळत राहा.
जेवल्यानंतर शतपावली करण्याचे ५ फायदे, जुनाट काहीतरी म्हणून नाक न मुरडता चालून तर पाहा..
नंतर त्यात २ चमचे केसर दूध, एक चमचा वेलची पूड घालून मिक्स करा. साहित्य चमच्याने सतत ढवळत राहा. व मध्यम आचेवर खीर घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या. अशा प्रकारे नारळाची खीर खाण्यासाठी रेडी.