Join us  

Raksha Bandhan 2022 : तोंडात टाकताच विरघळणारे नारळाचे लाडू; फक्त 3 गोष्टी वापरुन 10 मिनिटात करा; ही घ्या रेसिपी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2022 4:19 PM

Narli Purnima 2022 Instant Coconut Ladoo : कढई गरम झाल्यानंतर त्यात गूळ आणि नारळाचं मिश्रण घाला. त्यात वेलची पावडर घालून मिश्रण ढवळत राहा. Raksha Bandhan 2022 :

भारतात प्रत्येक सणाला वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. सणांच्या दिवशी या पदार्थाचं विशेष महत्व असतं. 12 ऑगस्टला नारळीपौर्णिमा साजरी केली जाणार आहे.  समुद्राला नारळ अर्पण करण्याची पद्धत म्हणून नारळी पौर्णिमेचा सण साजरा केला जातो.  या दिवशी कोळी बांधव सोने किंवा चांदीचा नारळ अर्पण करतात. (Raksha Bandhan 2022 )

यानिमित्त नारळी भात, नारळाचे लाडू, नारळाची खीर असे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. सध्याच्या व्यस्त रुटीनमध्ये प्रत्येकालाच गोड धोड बनवायला वेळ मिळतो असं नाही. (Instant Coconut Ladoo ) म्हणूनच या लेखात नारळाचे लाडू बनवण्याची सोपी, झटपट रेसेपी आपण पाहूया अगदी २ ते ३ पदार्थ वापरून तुम्ही हे स्वादीष्ट लाडू बनवू शकता. (Fresh coconut ladoo recipe)

हे लाडू तयार करण्यासाठी तुम्हाला नारळ, गूळ, वेलची पावडर आणि तूप, आवडीनुसार ड्रायफ्रुट्स या पदार्थांची आवश्यकता असेल. चविष्ट लाडू करण्यासाठी सगळ्यात आधी ओला नारळ बारीक किसून घ्या. त्यानंतर एका ताटात गुळ बारीक चिरून घ्या. किसलेलं खोबरं आणि चिरलेला गुळ एकजीव करून घ्या.  त्यानंतर कढई गॅसवर ठेवा. गरज भासल्यास कढईत २ चमचे तूप घालू शकता. तूप घातलं नाही तरी चालेल.  (Coconut Ladoo Recipe with Jaggery)

फक्त ५ मिनिटात पटापट सोला एक किलोपेक्षा जास्त लसूण; 3 ट्रिक्स, काम होईल सोपं

कढई गरम झाल्यानंतर त्यात गूळ आणि नारळाचं मिश्रण घाला. त्यात वेलची पावडर घालून मिश्रण ढवळत राहा.  अन्यथा ते कढईला चिकटण्याची शक्यता असते. ५ ते १० मिनिटं मिश्रण गॅस वर ठेवल्यानंतर गॅस बंद करा. कढईतलं मिश्रण गरम असेपर्यंत हाताला तूप लावून छान लाडू वळून घ्या. तयार आहेत ओल्या नारळाचे चविष्ट लाडू. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स