Lokmat Sakhi >Food > आता १० वेळा मिक्सर लावण्याची गरज नाही, करून ठेवा इन्स्टंट ग्रीन चटणी प्रीमिक्स, पाणी मिसळताच तयार होईल चटणी

आता १० वेळा मिक्सर लावण्याची गरज नाही, करून ठेवा इन्स्टंट ग्रीन चटणी प्रीमिक्स, पाणी मिसळताच तयार होईल चटणी

Natural Green Instant Coriander Chutney Premix तोंडी लावण्यासाठी करा स्पेशल इन्स्टंट ग्रीन चटणी प्रीमिक्स, पाणी मिसळताच २ मिनिटात होईल चटणी रेडी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2023 04:29 PM2023-05-28T16:29:50+5:302023-05-28T16:30:52+5:30

Natural Green Instant Coriander Chutney Premix तोंडी लावण्यासाठी करा स्पेशल इन्स्टंट ग्रीन चटणी प्रीमिक्स, पाणी मिसळताच २ मिनिटात होईल चटणी रेडी..

Natural Green Instant Coriander Chutney Premix | आता १० वेळा मिक्सर लावण्याची गरज नाही, करून ठेवा इन्स्टंट ग्रीन चटणी प्रीमिक्स, पाणी मिसळताच तयार होईल चटणी

आता १० वेळा मिक्सर लावण्याची गरज नाही, करून ठेवा इन्स्टंट ग्रीन चटणी प्रीमिक्स, पाणी मिसळताच तयार होईल चटणी

जेवणाची लज्जत व जिभेची चव वाढवण्यासाठी आपण ताटाच्या एका कोपऱ्यात चटणी वाढतो. आपल्या भारतात अनेक प्रकारच्या चटणी केल्या जातात. तोंडी लावायला म्हणून आपण ओली व सुकी चटणी करतो. या चटण्यांमुळे बेचव पदार्थाला चव येते. स्नॅक्स असो किंवा जेवण तोंडी लावण्यासाठी चटणी हवीच. चटणी जितकी चवीला उत्कृष्ट लागते, तितकीच करायला खूप मेहनत घ्यावी लागते. चटण्यांमध्ये हिरवी चटणी फार फेमस आहे.

हिरवी मिरची, कोथिंबीर यासह इतर साहित्यांचा वापर करून हिरवी चटणी तयार केली जाते. चटणी वाटण्यापासून ते फोडणीपर्यंत चटणी करण्याची प्रोसेस खूप मोठी आहे. जर आपल्या ही प्रोसेस न करता झटपट इन्स्टंट ग्रीन चटणी प्रीमिक्स हवं असेल तर, ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहा. चटणी खायची इच्छा झाल्यास २ मिनिटात ही चटणी रेडी होते(Natural Green Instant Coriander Chutney Premix).

इन्स्टंट ग्रीन चटणी प्रीमिक्स करण्यासाठी लागणारं साहित्य

पुदिना

कोथिंबीर

आलं

कडीपत्ता

हिंग

काळे मीठ

जिरं पावडर

कांदा चिरताना डोळ्यातून घळाघळा पाणी येतं? ५ उपाय, कांदा रडवणार नाही, बारीक चिरला जाईल

आमचूर पावडर

मीठ

लिंबाचा रस

भाजलेली चणा डाळ

अशा पद्धतीने करा इन्स्टंट ग्रीन चटणी प्रीमिक्स

सर्वप्रथम पुदिना व कोथिंबीरीची पानं स्वच्छ धुवून पुसून घ्या. मिक्सरचं भांडं घ्या, त्यात ही पानं, हिरवी मिरची, आलं, कडीपत्ता, हिंग, काळे मीठ, जिरं पावडर, आमचूर पावडर, चवीनुसार मीठ, लिंबाचा रस, एक कप भाजलेली चणा डाळ घालून बारीक पावडर तयार करून घ्या. आपल्याला हवं असल्यास आपण त्यात खोबरं देखील घालू शकता.

कैरीची आंबटगोड शेव कधी खाल्ली आहे? सिझन संपण्यापूर्वी करा कुरकुरीत ‘कैरी शेव!’

पावडर तयार झाल्यानंतर एका हवाबंद डब्यात साठवून ठेवा. आपल्याला जेव्हा हवं असल्यास ही पावडर एका बाऊलमध्ये काढून घ्या, त्यात पाणी मिक्स करा, अशा प्रकारे इन्स्टंट ग्रीन चटणी प्रीमिक्स रेडी. आपण ही चटणी सँडविच, समोसा, वडापाव किंवा इतर स्नॅक्ससह खाऊ शकता. 

Web Title: Natural Green Instant Coriander Chutney Premix

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.