Lokmat Sakhi >Food > नवरात्रीसाठी उपवासाची भाजणी करायची? खमंग खुसखुशीत थालिपीठांसाठी घ्या १ किलो भाजणीचे अचूक प्रमाण

नवरात्रीसाठी उपवासाची भाजणी करायची? खमंग खुसखुशीत थालिपीठांसाठी घ्या १ किलो भाजणीचे अचूक प्रमाण

How To Make Upavas Bhajani For Navaratri 2024: नवरात्रीच्या उपवासासाठी भाजणीचं पीठ करून ठेवणार असाल तर १ किलो भाजणीसाठी नेमके कोणते पदार्थ किती प्रमाणात घ्यावेत, ते एकदा बघा..(Upavas Bhajani  Recipe In Marathi)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2024 02:22 PM2024-09-27T14:22:55+5:302024-09-27T14:24:49+5:30

How To Make Upavas Bhajani For Navaratri 2024: नवरात्रीच्या उपवासासाठी भाजणीचं पीठ करून ठेवणार असाल तर १ किलो भाजणीसाठी नेमके कोणते पदार्थ किती प्रमाणात घ्यावेत, ते एकदा बघा..(Upavas Bhajani  Recipe In Marathi)

navaratri fast, how to make upavas bhajani for navaratri | नवरात्रीसाठी उपवासाची भाजणी करायची? खमंग खुसखुशीत थालिपीठांसाठी घ्या १ किलो भाजणीचे अचूक प्रमाण

नवरात्रीसाठी उपवासाची भाजणी करायची? खमंग खुसखुशीत थालिपीठांसाठी घ्या १ किलो भाजणीचे अचूक प्रमाण

Highlightsभाजणीतल्या एखाद्या पदार्थाचं प्रमाण जरी कमी- जास्त झालं तरी आपली भाजणी बिघडते आणि मग त्याचे आपल्याला पाहिजे तसे थालिपीठ, उपमा होत नाही.

नवरात्रीसाठी आता अवघे काही मोजके दिवस राहिले आहेत. त्यामुळे ज्यांच्या घरी नवरात्र बसते, त्यांच्या घरी नवरात्रीची जय्यत तयारी सुरू झालेली आहे. नवरात्र म्हटलं की बहुतेकांच्या घरी ९ दिवस उपवास केले जातात. घरातला १ सदस्य तरी हमखास उपवास करतोच. त्यामुळे घरोघरी या काळात भाजणीचे पीठ, उपवासाचे वेगवेगळे पदार्थ लागतातच. आता उपवास भाजणीचं पीठ घरी करणार असाल तर त्यासाठी कोणता पदार्थ किती प्रमाणात घ्यायला हवा, ते एकदा पाहून घ्या. कारण भाजणीतल्या एखाद्या पदार्थाचं प्रमाण जरी कमी- जास्त झालं तरी आपली भाजणी बिघडते आणि मग त्याचे आपल्याला पाहिजे तसे थालिपीठ, उपमा होत नाही (How To Make Upavas Bhajani For Navaratri 2024). त्यामुळे ही रेसिपी एकदा पाहून घ्या.. (Upavas Bhajani  Recipe In Marathi)

 

उपवासासाठी १ किलोची खमंग भाजणी करण्याचे परफेक्ट प्रमाण

उपवासाची खमंग भाजणी कशी करायची याचे प्रमाण MadhurasRecipe Marathi या यु ट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आली आहे.

साहित्य

वयाच्या पन्नाशीतही मलायका अरोराचे केस आहेत जाड आणि लांब- त्यासाठी करते 'हे' २ उपाय 

१ वाटी साबुदाणा

१ वाटी राजगिरा 

दिड वाटी भगर

कृती 

सगळ्यात आधी गॅसवर कढई गरम करायला ठेवा आणि त्यामधे सुरुवातीला साबुदाणा टाकून भाजून घ्या. भाजताना गॅस मंद ते मध्यम आचेवर असावा. साधारण ४ ते ५ मिनिटांत साबुदाणा भाजून होईल आणि त्याला छान सोनेरी रंग येईल. त्यानंतर साबुदाणा एका भांड्यात काढून घ्यावा.

 

यानंतर राजगिरा टाकून तो भाजून घ्या. राजगिरा भाजताना गॅसची फ्लेम कमीच असावी. कारण राजगिरा लगेचच फुलतो आणि उडतो. 

राजगिरा भाजून झाल्यानंतर भगरही भाजून घ्या.

नवरात्रीसाठी घरीच तयार करा कोणतीही भेसळ नसणाऱ्या शुद्ध तुपातल्या फुलवाती- पाहा सोपी पद्धत

जर तुमच्याकडे उपवासाला जिरे चालत असतील तर १ टेबलस्पून जिरे भाजून तुम्ही भाजणीत टाकू शकता.

त्यानंतर भाजून घेतलेले सगळे पदार्थ थंड झाले की मग ते मिक्सरमधून फिरवून बारीक करून घ्या. खमंग उपवासाची भाजणी झाली तयार.

या भाजणीचे किंवा अन्य कोणत्याही भाजणीचे तुम्ही जेव्हा थालिपीठ कराल तेव्हा त्यात उकडलेला बटाटा आठवणीने घाला. कारण बटाट्यामुळे भाजणी पीठ एकजीव होण्यास मदत होते. शिवाय चवही छान येते. 

 

Web Title: navaratri fast, how to make upavas bhajani for navaratri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.