७ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला सुरूवात होत आहे. अनेक भक्तगण देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी तर काहीजण पोटाला आराम देण्यासाठी या दिवसात उपवास करतात. काही जण निर्जळी तर काही अनवाणी पायांनी हे उपवास पूर्ण करतात. बहूतेक लोक दोन्हीवेळ फराळ किंवा एक वेळ फराळ करून नवरात्रीचे उपवास करतात. नवरात्रीचे उपवास करताना काही नियम लक्षात घेतले तर पूर्ण फलप्राप्ती होऊ शकते.
या ९ दिवसांच्या उपवासात काय खायचं काय टाळायचं? (Navratri upvas fasting rules)
१) भक्तांनी उपवासात शाकाहारी अन्नाचे सेवन करायला हवे.
२) गहू, तांदूळ यासारखे धान्य आहारात घेऊ नये. शिंगाड्याचे पीठ किंवा राजगीरा पीठ, साबुदाण्याचे पीठ यांचा तुम्ही आहारात समावेश करू शकता.
३) नवरात्रीच्या उपवासात तुम्ही फळे आणि सुका मेवा खाऊ शकता. काही भक्त केवळ फळं आणि दुधावर नऊ दिवस उपवास करतात. बटाटा, रताळी, अरबी, सुरण, अर्धा पिकलेला भोपळा किंवा कच्चा भोपळा यासारख्या काही भाज्यांना नवरात्रीच्या दिवसांत पसंती दिली जाते.
४) उपवासादरम्यान दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जसे पनीर, लोणी, तूप, मलई किंवा दूध आणि खव्यापासून बनवलेले पदार्थ वापरू शकता.
५) ताक आणि लस्सी नवरात्री दरम्यान स्वतःला दिवसभर हायड्रेटेड ठेवण्यासाठी उत्तम पर्याय आहेत.
६) नवरात्री दरम्यान स्वयंपाक करताना कांदा, लसूण आणि हळद धणे यांसारख्या मसाल्यांचा वापर टाळावा. इतर उष्णता निर्माण करणारे पदार्थ आणि मोहरीचे तेल किंवा तीळाचे तेल देखील टाळावे. तेलांऐवजी देशी तूप वापरावे.
7) घरात नेहमी स्वच्छ वातावरण असावे. घरात भांडण आणि कलहाचे वातावरण नसावे.