Lokmat Sakhi >Food > नवरात्र स्पेशल : अष्टमीसाठी करा खव्या-रव्याच्या पारंपरीक साटोऱ्या; देवीचा नैवेद्य होईल चविष्ट-परफेक्ट

नवरात्र स्पेशल : अष्टमीसाठी करा खव्या-रव्याच्या पारंपरीक साटोऱ्या; देवीचा नैवेद्य होईल चविष्ट-परफेक्ट

Navratri Ashtami Satori sanjori Authentic Recipe : वर्षभर मुद्दामहून न केला जाणारा हा पदार्थ अष्टमीला मात्र आवर्जून केला जातो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2023 01:33 PM2023-10-19T13:33:22+5:302023-10-19T13:37:56+5:30

Navratri Ashtami Satori sanjori Authentic Recipe : वर्षभर मुद्दामहून न केला जाणारा हा पदार्थ अष्टमीला मात्र आवर्जून केला जातो.

Navratri Ashtami Satori sanjori Authentic Recipe Navratri Special: For Ashtami, do the traditional satore of Khava-Rava; The offering to the goddess will be delicious-perfect | नवरात्र स्पेशल : अष्टमीसाठी करा खव्या-रव्याच्या पारंपरीक साटोऱ्या; देवीचा नैवेद्य होईल चविष्ट-परफेक्ट

नवरात्र स्पेशल : अष्टमीसाठी करा खव्या-रव्याच्या पारंपरीक साटोऱ्या; देवीचा नैवेद्य होईल चविष्ट-परफेक्ट

नवरात्रात देवीच्या नैवेद्यासाठी परंपरेनुसार वेगवेगळे पदार्थ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात केले जातात. कोकणी लोक तांदळाची खीर आणि भोपळ्याच्या घारग्याचा नैवेद्य दाखवतात तर खान्देश किंवा मराठवाडा भागात कडाकण्या करण्याची पद्धत आहे. काही जणांकडे देवीला अष्टमीला सांजोऱ्या किंवा साटोऱ्या करण्याची पद्धत आहे. वर्षभर मुद्दामहून न केला जाणारा हा पदार्थ अष्टमीला मात्र आवर्जून केला जातो. रवा आणि खव्याचा वापर करुन केले जाणारे हे मिष्टान्न करणे अनेकांना अवघड वाटते. पण योग्य प्रमाण आणि नेमक्या पद्धतीने केल्यास कोणताच पदार्थ करायला तितका अवघड नसतो. पाहूयात पारंपरिक सांजोऱ्या किंवा साटोऱ्या करण्याची सोपी पद्धत (Navratri Ashtami Satori sanjori Authentic Recipe )...

साहित्य - 

आवरणासाठी

१. बारीक रवा - १ वाटी
२. मीठ - पाव चमचा
३. तूप - ४ चमचे

(Image : Google )
(Image : Google )

सारणासाठी 

१. रवा - १ वाटी 
२. तूप - ३ चमचे 
३. दूध - १ वाटी
४. खवा - ३ वाटी 
५. पिठीसाखर - २ ते ३ वाट्या
६. वेलची पूड - अर्धा चमचा

कृती - 

१. रव्यामध्ये मीठ आणि तूप घालून अंदाजे पाणी घालून मध्यमसर पीठ मळून घ्यायचे आणि साधारण अर्धा तास हे पीठ मुरवत ठेवायचे.
२. पॅनमध्ये तूप घालून त्यावर रवा खरपूस भाजून घ्यायचा. यावर गरम दुधाचा हबका द्यायचा म्हणजे रव्याचा कच्चेपणा जाण्यास मदत होते. 
३. रचा चांगला फुलला की त्यामध्ये खवा घालायचा आणि हे मिश्रण २ ते ३ मिनीटे चांगले एकजीव परतून घ्यायचे. म्हणजे खवा आणि रवा चांगले एकजीव होण्यास मदत होते.
४. यावर झाकण ठेवून हे मिश्रण १० मिनीटे बाजूला ठेवावे म्हणजे रवा खव्यामध्ये चांगला मिसळण्यास मदत होते. 
५. त्यानंतर यामध्ये पिठीसाखर आणि वेलची पूड घालून हे मिश्रण पु्न्हा चांगले एकजीव करुन घ्यायचे. 
६. आता भिजवलेल्या रव्याचा पिठाचे लहान गोळे करुन घेऊन ते मध्यम आकाराचे लाटून घ्यायचे.
७. आलू पराठा किंवा पुरणपोळीला ज्याप्रमाणे सारण भरतो त्याप्रमाणे मध्यभागी सारण भरुन पोळी बंद करुन पुन्हा लाटायची. 
८. तव्यावर तूप सोडून ही साटोरी चांगली खरपूस भाजून घ्यायची. 

Web Title: Navratri Ashtami Satori sanjori Authentic Recipe Navratri Special: For Ashtami, do the traditional satore of Khava-Rava; The offering to the goddess will be delicious-perfect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.