Lokmat Sakhi >Food > उपवासाला खा पौष्टिक मखाणा खीर, ५ मिनिटांत होणारी मखाणा खीर खा - मिळेल इन्स्टंट ताकद...

उपवासाला खा पौष्टिक मखाणा खीर, ५ मिनिटांत होणारी मखाणा खीर खा - मिळेल इन्स्टंट ताकद...

Navratri Fasting Recipes : Fast Special Makhana Kheer : उपवास करताना आपण काय खातो यावरही आपली ताकद आणि आनंद अवलंबून असतो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2023 06:56 PM2023-10-13T18:56:49+5:302023-10-13T19:16:03+5:30

Navratri Fasting Recipes : Fast Special Makhana Kheer : उपवास करताना आपण काय खातो यावरही आपली ताकद आणि आनंद अवलंबून असतो...

Navratri Fasting Recipes Fast Special Makhana Kheer,How To Make Upvas Makhana Kheer | उपवासाला खा पौष्टिक मखाणा खीर, ५ मिनिटांत होणारी मखाणा खीर खा - मिळेल इन्स्टंट ताकद...

उपवासाला खा पौष्टिक मखाणा खीर, ५ मिनिटांत होणारी मखाणा खीर खा - मिळेल इन्स्टंट ताकद...

नवरात्रीचा सण आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. सगळीकडेच नवरात्रीचा उत्साह आणि आनंद भरभरून पहायला मिळत आहे. या आनंद आणि उत्साहासोबतच उपवास करणाऱ्यांसाठी हा सण म्हणजे एक पर्वणीच असते. नऊ दिवस उपवासाचे काहीतरी वेगवेगळं खायला मिळणार याचा आनंद मनातून असतोच. उपवास करण्याचा उत्साह असला तरी तो दिवसभर टिकून राहत नाही. कारण दिवसभर उपवास करुन शरीरात ऊर्जाच राहात नाही. शरीरात पुरेशी ताकद व ऊर्जा नसल्याने थकवा येऊन गळून गेल्यासारखं होतं. असे असले तरीही उपवासाला फराळ म्हणून काय खातो यावरही उत्साह आणि ऊर्जा अवलंबून असते. उपवासाच्या दिवशी दिवसभर उत्साह टिकून राहाण्यासाठी मखाण्यांची पौष्टिक प्रोटीनरीच खीर खावी. ही खीर एरवीपेक्षा उपवासालाच केली जाते(How To Make Upvas Makhana Kheer : Fasting Recipe : Navratri Special). 

नवरात्रीच्या उपवासाच्या दिवशी नेहमीची भगर - आमटी, साबुदाणा खिचडी, वडे नकोसे वाटतात. काहीतरी वेगळं पण पोटभरीचं खावंसं वाटतं. असे पदार्थ जे मन उत्साही आणि प्रसन्न ठेवतील. जर आपण अशा पदार्थाच्या शोधात असेल तर नवरात्रीतील उपवासाला सात्विक उपवासाची मखाण्यांची खीर (Makhana Kheer) हा चांगला पर्याय आहे. हा झटपट होणारा पदार्थ पोटभरीचा असून करायलाही (How To Make Upvas Makhana Kheer) एकदम सोपा आहे. आपल्या नेहमीच्या उपवासाच्या पदार्थांना नवीन आणि पौष्टिक पर्याय म्हणून हा पदार्थ नक्कीच ट्राय करून पहा(Navratri Vrat Special - Makhana Kheer Recipe).

साहित्य :- 

१. ताजे दही - १ कप 
२. चिया सिड्स - १ कप (पाण्यात भिजवून फुलवून घेतलेल्या) 
३. मखाणे - १ कप (मखाणे कोरडे भाजून घेतलेले)
४. मनुका - ८ ते १० 
५. डाळिंबाचे दाणे - १/२ कप 
६. सफरचंदाचे तुकडे - १/२ कप 
७. वेलची पूड - १/२ टेबलस्पून 
८. शेंगदाणे - १ टेबलस्पून (साल काढून पाण्यांत भिजवून घेतलेले)

उपवास करताना तब्येत बिघडू नये म्हणून कोणते मीठ खावे ? तज्ज्ञ सांगतात, मीठ खाणार असाल तर...

कोण म्हणतं साबुदाणा नको, खाऊन तर पाहा साबुदाण्याची बर्फी - उपवासासाठी स्पेशल एनर्जीचा डोस...

नवरात्र स्पेशल : साबुदाणा व भगर वापरून चटकन बनवा उपवासाचा डोसा, खायला कुरकुरीत, बनवायला सोपा...

कृती :- 

१. सर्वातआधी एका मोठ्या बाऊलमध्ये घरी लावलेले ताजे व किंचित घट्टसर असे दही घ्यावे. 
२. आता या दह्यात चिया सिड्स, भाजून घेतलेले मखाणे, मनुका,डाळिंबाचे दाणे, सफरचंदाचे तुकडे, वेलची पूड, भिजवून घेतलेले शेंगदाणे घालावेत. 
३. आता हे सगळे जिन्नस चमच्याने ढवळून एकजीव करून घ्यावेत. 

आपली उपवासा साठीची प्रोटिनरीच मखाणा खीर खाण्यासाठी तयार आहे.

Web Title: Navratri Fasting Recipes Fast Special Makhana Kheer,How To Make Upvas Makhana Kheer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.