Lokmat Sakhi >Food > नवरात्रीत ९ दिवस उपवास करताना लक्षात ठेवा ७ गोष्टी; तब्येतीला त्रास न होता करता येतील उपवास आनंदाने

नवरात्रीत ९ दिवस उपवास करताना लक्षात ठेवा ७ गोष्टी; तब्येतीला त्रास न होता करता येतील उपवास आनंदाने

Navratri Fasting Rules 2023 (Navratri cha Upvas Kasa Karava) : उपवास ठेवलेल्या व्यक्तीने काम, क्रोथ, मोह यांपासून दूर राहायला हवं.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 09:37 AM2023-10-12T09:37:00+5:302023-10-12T15:47:53+5:30

Navratri Fasting Rules 2023 (Navratri cha Upvas Kasa Karava) : उपवास ठेवलेल्या व्यक्तीने काम, क्रोथ, मोह यांपासून दूर राहायला हवं.

Navratri Fasting Rules 2023 : Dos and Don’ts to Keep in Mind During Shardiya Navratri | नवरात्रीत ९ दिवस उपवास करताना लक्षात ठेवा ७ गोष्टी; तब्येतीला त्रास न होता करता येतील उपवास आनंदाने

नवरात्रीत ९ दिवस उपवास करताना लक्षात ठेवा ७ गोष्टी; तब्येतीला त्रास न होता करता येतील उपवास आनंदाने

नवरात्रीचा (Navratri 2023) उपवास करताना उपवासाचा त्रास होऊ नये आणि उपवासाचा पुरेपूर फायदा व्हावा यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं महत्वाचं असतं. अनेकांना उपवास केल्यानंतर शारीरिक त्रास उद्भवतात तर काहीजणांना पूजा करूनही मानसिक शांती लाभत नाही. सतत डोक्यात विचार येत असतात, चिडचिड होते हे टाळण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. (Navratri Fasting Rules) बेसिक नियम पाळले तर  ९ दिवस छान आनंदात जातील आणि घरातही आनंददायी वातावरण राहील. (Traditional Rules to Celebrate the Festival With Your Family)

१)  काही लोक ९ दिवस उपवास ठेवू शकत नाहीत. त्यांनी सप्तमी, अष्टमी, नवी  हे व्रत करायला हवेत. याला त्रिरात्र व्रत असं म्हणतात. उपवासाच्या दिवसांत वागण्या बोलण्यात नम्रता, उदारता हवी. नेहमी उत्साहाचं वातावरण असावे. (Dos and Don’ts to Keep in Mind During Shardiya Navratri)

२) उपवास ठेवलेल्या व्यक्तीने काम, क्रोथ, मोह यांपासून दूर राहायला हवं. मनावर नियंत्रण ठेवावे, अपशब्द वापरू नये. कोणाचंही मन दुखावलं जाईल असे वागू-बोलू नये. उपवासाच्या दिवसांत रागावर नियंत्रण ठेवा.

रात्रीच्या उरलेल्या खिचडीचा करा कुरकुरीत डोसा; झटपट बनेल नाश्ता-पाहा एकदम सोपी रेसिपी

३) नवरात्रीच्या उपवासात गहू तांदूळ यांसारखे पदार्थ खाणं टाळा. नवरात्रीच्या उपवासाला तुम्ही शिंगाड्याचे पीठ, साबुदाण्याचे पीठ, वरीचे तांदूळ, राजगिऱ्याचं पीठ, खिचडी, साबुदाण्याची  खीर असे पदार्थ खाऊ शकता. 

४) नऊ रात्रीच्या उपवासात तुम्ही दूध आणि फळांचा आहार घेऊ शकता.  याशिवाय फ्रुट सॅलेट, फ्रुट्स  ज्यूसचा आहारात समावेश करा. 

५) नवरात्रीच्या दिवसात बरेच लोक  बटाटा, रताळे, अरबी, सुरण, काकडी,  गाजर या भाज्यांचा आहारात समावेश करतात. पनीर, व्हाईट बटर, दूध, तूप हे पदार्थ आहारात घ्या.  

५ मिनिटांत करा खमंग साबुदाणा पराठा-उपवासाची सोपी रेसिपी, साबुदाणा भाजणं-दळण्याची गरजच नाही

६) उपवास केला असला तरी पाणी भरपूर प्या किंवा नारळपाणी, फ्रुट ज्यूस घेत राहा. यामुळे शरीर हायड्रेट राहील आणि कसलाच त्रास होणार नाही. 

७) उपवासाच्या दिवसात चिप्स, तळेलेले पापड, वारंवार चहा-कॉफी घेणं टाळा यामुळे आतड्यांच्या आरोग्यावर चुकीचा परिणाम होतो. जास्तीत जास्त हेल्दी पर्यायांची निवड करा.

Web Title: Navratri Fasting Rules 2023 : Dos and Don’ts to Keep in Mind During Shardiya Navratri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.