Lokmat Sakhi >Food > Navratri Fasting Rules : ९ दिवस उपवास करताना लक्षात ठेवा ४ गोष्टी, व्रताचा फायदा व्हायला हवा-तोटा नाही

Navratri Fasting Rules : ९ दिवस उपवास करताना लक्षात ठेवा ४ गोष्टी, व्रताचा फायदा व्हायला हवा-तोटा नाही

Navratri Fasting Rules : अनेकदा लोक उपवास करताना काहीही खात नाहीत. रिकाम्या पोटी उपवास करणे ही सर्वात मोठी चूक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 04:44 PM2022-09-24T16:44:47+5:302022-09-24T17:51:51+5:30

Navratri Fasting Rules : अनेकदा लोक उपवास करताना काहीही खात नाहीत. रिकाम्या पोटी उपवास करणे ही सर्वात मोठी चूक आहे.

Navratri Fasting Rules : Shardiya navratri 2022 dos and donts of fasting | Navratri Fasting Rules : ९ दिवस उपवास करताना लक्षात ठेवा ४ गोष्टी, व्रताचा फायदा व्हायला हवा-तोटा नाही

Navratri Fasting Rules : ९ दिवस उपवास करताना लक्षात ठेवा ४ गोष्टी, व्रताचा फायदा व्हायला हवा-तोटा नाही

नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. हा हिंदूचा एक महत्त्वाचा सण आहे, ज्याची प्रत्येकजण वर्षभर वाट पाहत असतो. या काळात बहुतांश लोक उपवासही करतात. नवरात्रीत एकीकडे उपवास ठेवला जातो. तर दुसरीकडे भरपूर मेजवानी असते. (Navratri Fasting Rules) उपवास आरोग्यासाठी चांगला मानला जातो. या दरम्यान तुम्ही फळे, दूध, दुग्धजन्य पदार्थ, फळांचे रस, खीर, राजगिरा, साबुदाणा, भगर, सिंघाडा यासारख्या काही स्वादिष्ट पदार्थांचे सेवन करू शकता. (Shardiya Navratri 2022 do's and dont's of fasting)

या गोष्टी आरोग्यदायी तर राहतातच शिवाय तुम्हाला एनर्जी देखील देतात. किरण रुकडीकर, ख्यातनाम पोषणतज्ज्ञ ,बेरिएट्रिक फिजिशियन आणि लठ्ठपणा सल्लागार डॉ. किरण रुकडीकर यांनी  उपवास करताना काय करावे आणि काय करू नये. (Food items to avoid during Navratri vrat) याविषयी अधिक माहिती दिली आहे.

रिकाम्यापोटी राहू नका

ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. अनेकदा लोक उपवास करताना काहीही खात नाहीत. रिकाम्या पोटी उपवास करणे ही सर्वात मोठी चूक आहे. जर तुम्हाला दिवसभर फिट राहायचे असेल तर फळांचे रस, दूध आणि भरपूर पाणी प्या. भूक लागल्याने अशक्तपणा, आळस आणि अस्वस्थता यासारख्या समस्या उद्भवू शकतात. (Diet, Dos and Don’ts)

तळलेले पदार्थ खाऊ नका

अनेकांना उपवासात बटाट्यापासून बनवलेल्या तळलेल्या गोष्टी खायला आवडतात, ज्या आरोग्याला हानी पोहोचवण्याचे काम करतात. आपण निरोगी पर्याय निवडल्याची खात्री करा.

सगळं एकत्र खा

उपवासाच्या दिवसांत भूक लागली असली तरी एकाच वेळी भरपूर खाऊ नका. प्रत्येक वेळी थोड्या प्रमाणात फास्टिंग फूड खा.

उपवास कसा सोडाल

सुरुवातीच्या दिवसांत उपवास करताना त्रास होतो, जास्त भूक लागते. अशा स्थितीत उपवास सोडताना जास्त अन्न खाऊ नका. कमी जेवणाने सुरुवात करा.

उपवास करताना हे लक्षात घ्या

उपवास करताना हे लक्षात ठेवा की तुमच्या आहारात प्रथिनांचे प्रमाणही चांगले असावे. निरोगी राहण्यासाठी प्रथिने आवश्यक आहेत.

फायबर्स

दररोज फायबर युक्त अन्न खा. ज्यामध्ये धान्य, फळे आणि भाज्यांचा समावेश आहे. यामुळे तुम्हाला पचनाशी संबंधित कोणतीही समस्या होणार नाही.

शिळं अन्न खाऊ नका

उपवासाच्या वेळी पॅकफूड खाऊ नका.  दररोज ताजे अन्नपदार्थ तयार करा. यामुळे तुम्ही आजारी पडणार नाही आणि तुम्ही संपूर्ण उपवास करू शकाल.

Web Title: Navratri Fasting Rules : Shardiya navratri 2022 dos and donts of fasting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.