Lokmat Sakhi >Food > Navratri Fasting Tips 2022 : नवरात्रीच्या सुरूवातीला ५ गोष्टी करा; उपवासातही एर्नेजेटिक वाटेल, येणार नाही थकवा

Navratri Fasting Tips 2022 : नवरात्रीच्या सुरूवातीला ५ गोष्टी करा; उपवासातही एर्नेजेटिक वाटेल, येणार नाही थकवा

Navratri Fasting Tips 2022 : जर तुम्ही दोन्ही वेळच्या उपवासाची योजना आखत असाल, तर तुमचे आरोग्य आणि ऊर्जा पातळी राखण्यासाठी या टिप्सचा वापर करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 04:45 PM2022-09-25T16:45:09+5:302022-09-25T17:13:43+5:30

Navratri Fasting Tips 2022 : जर तुम्ही दोन्ही वेळच्या उपवासाची योजना आखत असाल, तर तुमचे आरोग्य आणि ऊर्जा पातळी राखण्यासाठी या टिप्सचा वापर करू शकता.

Navratri Fasting Tips 2022 : Navratri 2022 on this shardiya navratri follow these 5 tips for healthy fasting shared cleveland clinic | Navratri Fasting Tips 2022 : नवरात्रीच्या सुरूवातीला ५ गोष्टी करा; उपवासातही एर्नेजेटिक वाटेल, येणार नाही थकवा

Navratri Fasting Tips 2022 : नवरात्रीच्या सुरूवातीला ५ गोष्टी करा; उपवासातही एर्नेजेटिक वाटेल, येणार नाही थकवा

हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाच्या सणांपैकी एक शारदीय नवरात्री (Shardiya Navratri) 26 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. यादरम्यान ठिकठिकाणी मंडपात दुर्गादेवीच्या मूर्तीची स्थापना केली जाते. 9 दिवस चालणाऱ्या या उत्सवात दुर्गादेवीला प्रसन्न करण्यासाठी अनेक लोक उपवास करतात. जरी प्रत्येकाची उपवासाची पद्धत वेगळी असू शकते, परंतु लोक या 9 दिवशी उपवासाच्या पदार्थांचे सेवन करतात. यासाठी तुमच्या शरीराला आधीच तयार करा. अनेकदा असे घडते की उपवासाचे नाव ऐकताच भूक लागते. (Navratri Fasting Tips 2022) असे घडते कारण, कोणताही आकस्मिक बदल स्वीकारण्यापूर्वी, आपला मेंदू तो नाकारण्याचा प्रयत्न करतो, ही मेंदूची नैसर्गिक प्रक्रिया आहे. अशा परिस्थितीत उपवास करण्यापूर्वी या वेळेसाठी तुम्ही तुमचे मन तयार करणे महत्त्वाचे आहे. (Navratri 2022 on this shardiya navratri follow these 5 tips for healthy fasting shared cleveland clinic)

क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, उपवास करण्याचे अनेक मार्ग आहेत. काहीवेळा, उपवास म्हणजे कर्बोदक किंवा चरबीसारख्या विशिष्ट प्रकारचे अन्न वर्ज्य करणे किंवा फक्त एकूण कॅलरीज कमी करणं. त्याच वेळी, काही लोक काहीही न खाता किंवा दिवसातून एकदाच खाल्ल्याशिवाय एक किंवा अधिक दिवस  उपवास करतात. जर तुम्ही दोन्ही वेळच्या उपवासाची योजना आखत असाल, तर तुमचे आरोग्य आणि ऊर्जा पातळी राखण्यासाठी या टिप्सचा वापर करू शकता.

सुरूवातीलाच कमी खा

तज्ज्ञ शिफारस करतात की उपवास करण्यापूर्वी काही दिवस किंवा आठवडे हळूहळू अन्न आणि पेय कमी करा. अन्यथा, अचानक उपवास सुरू करणे तुमच्या शरीरासाठी धक्कादायक ठरू शकते. जेवण कमी करण्यासाठी, जेवणाच्या दरम्यानच्या स्नॅकसह दिवसातून तीनवेळा पूर्ण जेवण खाऊ नका हळूहळू खाणं कमी करा.

साखर खाऊ नका

आहारात साखरेचे प्रमाण कमी ठेवा. उपवास करण्यापूर्वी कुकीज आणि गोड चहा वर भर देणं करणे कधीही चांगली कल्पना नाही.  जेव्हा तुमच्या रक्तातील साखर एक किंवा दोन तासांनी कमी होते, तेव्हा तुम्हाला खूप भूक लागते आणि अशक्त होऊ शकते. दीर्घकाळ पुरेशी ऊर्जा राखण्यासाठी कर्बोदके (तांदूळ आणि बटाटे) आणि प्रथिने खा.

भरपूर पाणी प्या

काही धार्मिक उपवासांना पाण्यासह सर्व अन्न आणि पेय घेतली जात नाही. जर तुमची उपवासाची मार्गदर्शक तत्त्वे पाणी पिण्याची परवानगी देत असतील, तर हायड्रेटेड राहिल्याने डिहायड्रेशन टाळण्यास, ऊर्जा पातळी राखण्यास आणि डोकेदुखी, चिडचिड यासारखे दुष्परिणाम कमी करण्यास मदत होईल. अशा स्थितीत उपवास करण्यापूर्वी आणि दरम्यान पुरेसे पाणी प्या.

हलका व्यायाम करा

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तुम्ही खात किंवा पीत नसताना जड किंवा थकवणारा व्यायाम केल्याने तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. या प्रकरणात, जोपर्यंत आपल्याला पुरेसे पोषक मिळत नाही तोपर्यंत हलका व्यायाम करणे चांगली कल्पना असू शकते.
उपवास करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या

जर तुम्हाला दीर्घकालीन वैद्यकीय  समस्या असेल तर उपवास करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी बोला. आणि तुमच्या औषधांच्या डोसची खात्री करा. कारण उपवासाच्या वेळी अचानक औषधे बंद केल्याने तुमच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात. उपवासाचे कोलेस्टेरॉल सुधारण्यासाठी, ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यासाठी आणि ऊर्जा संतुलित करण्यासाठी असे अनेक संभाव्य फायदे आहेत. अधिक कठीण आणि बरेच दिवस उपवास करणे आपल्यासाठी धोकादायक देखील असू शकते.

Web Title: Navratri Fasting Tips 2022 : Navratri 2022 on this shardiya navratri follow these 5 tips for healthy fasting shared cleveland clinic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.