Lokmat Sakhi >Food > नवरात्र स्पेशल फूड :  रोज १ ग्लास ताक पिण्याचे १० फायदे;  स्त्रियांच्या आहारात तर ताक हवेच..

नवरात्र स्पेशल फूड :  रोज १ ग्लास ताक पिण्याचे १० फायदे;  स्त्रियांच्या आहारात तर ताक हवेच..

नवरात्र स्पेशल फूड : स्त्री शक्तीची उपासना करताना स्त्रियांचा आहार आणि आरोग्य याकडे दुूर्लक्ष व्हायला नको. भाग १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2022 03:29 PM2022-09-26T15:29:32+5:302022-09-26T15:31:40+5:30

नवरात्र स्पेशल फूड : स्त्री शक्तीची उपासना करताना स्त्रियांचा आहार आणि आरोग्य याकडे दुूर्लक्ष व्हायला नको. भाग १

Navratri Special Food: 10 Benefits of Drinking 1 Glass of Buttermilk Daily; Buttermilk is a must in women's diet. | नवरात्र स्पेशल फूड :  रोज १ ग्लास ताक पिण्याचे १० फायदे;  स्त्रियांच्या आहारात तर ताक हवेच..

नवरात्र स्पेशल फूड :  रोज १ ग्लास ताक पिण्याचे १० फायदे;  स्त्रियांच्या आहारात तर ताक हवेच..

Highlightsताक पिताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या तर ताकाचे भरपूर लाभ आपल्याला होतील.

मंजिरी कुलकर्णी

नवरात्र  म्हणजे स्त्री शक्तीचा जागर. पण स्त्रियांच्या स्वत:च्या शक्तीचा, आरोग्याचाही विचार या दिवसात करायला हवा. या नवरात्रीमध्ये आपण दररोज असे ९ अन्न पदार्थ बघणार आहोत जे प्रत्येक स्त्री ने दररोजच्या आहारात घेणे आवश्यक आहे. आजचा पदार्थ आहे पहिला आणि पांढरा पदार्थ आहे ताक. आयुर्वेदात ताकाला अमृत असे म्हणले जाते .जीवदान देणारे ते अमृत .प्रत्येक स्त्री च्या शरीरात दर महिन्याला मासिक पाळीच्या दिवसात हानी किंवा कमतरता निर्माण होत असते. त्यामुळे स्त्रियांनी जर आहार संतुलित ठेवला तर ही हानी लवकर भरून निघण्यास मदत होते. 

(Image : google)

ताक सेवन करण्याचे फायदे

१. ताकात Vitamin A असते जे प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते.
२. Vitamin B असते जे शारीरिक क्षमता वाढवते. 
३. शरीराचे तापमान नियंत्रित राखण्यासाठी मदत होते.
४. ताक प्यायलामुळे शरीरात पाण्याची कमतरता होत नाही.
५. पचनशक्ती मजबूत होते.
६. ताकामध्ये भरपूर कॅल्शियम असते ज्यामुळे हाडे ठिसूळ होत नाहीत.
७. पित्त होत नाही.
८. कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित राहते.
९. प्रतिकार शक्ती वाढते.
१०. त्वचा चमकदार होते.
११. वजन कमी करण्यास मदत होते .

(Image : google)

मात्र ताक कोणते प्यावे?

बाजारातून ताकाची पिशवी आणली, फोडली आणि प्याले ताक तर चालते का? तसे ताक प्यावे का?
शक्यतो ताक पिताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या तर ताकाचे भरपूर लाभ आपल्याला होतील.

१. ताक हे ताज्या आणि घरी लावलेल्या दह्याचे असावे.
२. दही आंबट नसावे.
३. ताक हे जास्त घट्ट असू नये.
४. साखरेचा वापर करू नये.
५. सुंठ, मिरे , जिरे पूड ,पुदिना आणि रॉक सॉल्ट वापरुन ताक बनवले तर त्याची गुणवत्ता चांगली होते.

(लेखिका आहारतज्ज्ञ आहेत. Themindfuldiet इथे त्यांच्याशी 9518538993 या क्रमांकावर संपर्क करता येईल.)

Web Title: Navratri Special Food: 10 Benefits of Drinking 1 Glass of Buttermilk Daily; Buttermilk is a must in women's diet.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.