Join us  

नवरात्र स्पेशल फूड : लालचुटूक बीट खाण्याचे ५ फायदे, वजन आणि बीपीचं टेन्शन आहे तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2022 1:14 PM

नवरात्र स्पेशल फूड : आज नवरात्रीचा तिसरा दिवस. महिलांच्या दृष्टीने रोजच्या आहारात आवश्यक असणारा तिसरा पदार्थ, बीटरुट कोशिंबीर- भाग ३.

ठळक मुद्देपण वजन, रक्तदाब आणि इतर शारिरीक समस्या दूर ठेवायच्या असतील, तर रोजच्या आहारात थोडंसं का असेना पण बीटरुट असायलाच पाहिजे.

मंजिरी कुलकर्णीखरं पाहिले तर निसर्गात आढळणार्‍या सर्व भाज्या आणि फळे सर्वांसाठी चालतील असे नाही. काही पदार्थ कुणाला सहन होतात, तर काही पदार्थ होत नाहीत. तरी बहुतांश स्त्रियांनी किंबहुना सर्वांनीच दैनंदिन आहारामध्ये आवर्जून घ्यायलाच पाहिजेत, असे काही पदार्थ आहेत. अशा पदार्थांपैकीच एक पदार्थ म्हणजे बीटरूट. काकडी, गाजर, टोमॅटो असे सलाड प्रकारात मोडणारे पदार्थ जसे आवडीने खाल्ले जातात, तसं प्रेम बीटरुटच्या (5 Benefits of eating beet root) बाबतीत बऱ्याचदा दिसून येत नाही. पण वजन, रक्तदाब आणि इतर शारिरीक समस्या दूर ठेवायच्या असतील, तर रोजच्या आहारात थोडंसं का असेना पण बीटरुट असायलाच पाहिजे. कोशिंबीरीच्या (How to make beet root salad or koshimbir) स्वरुपात ते खाल्लं तर निश्चितच अधिक चवदार लागेल आणि आवडीने खाल्ले जाईल. 

 

बीटरूट नियमितपणे खाल्ल्यास होणारे फायदे१. बीट हे एक उत्तम anti-inflammatory म्हणजेच शरीरात सूज उत्पन्न न होऊ देणारे अन्न आहे.

२. बीटरूटमध्ये नायट्रेट चांगल्या प्रमाणात असते. त्यामुळे ते फुफ्फुस आणि हृदयासाठी अतिशय चांगले मानले जाते.

अक्रोड खाऊन टरफलं फेकून देऊ नका! पांढऱ्या केसांसाठी करा त्याचा उत्तम उपाय, केस होतील काळेभोर, घनदाट

३. व्यायाम करण्याची क्षमता वाढविण्यासाठी बीटरुटचा फायदा होतो.

४. रक्तदाब नियंत्रित राहण्यासाठी बीट रुटची मदत होते. 

५. बीटरुटमध्ये फायबर जास्त असल्यामुळे पचनशक्ती चांगली राहते. पचनशक्ती आणि मेटाबॉलिझम म्हणजेच चयापचय क्रिया उत्तम असल्यास आपोआपच वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. 

 

या लोकांनी बीट खाऊ नये१. ज्यांना संधिवाताचा त्रास आहे.

चमचमता घागरा घालून रश्मिका मंदाना म्हणतेय "मी गोल्डन गर्ल...." - चमकिल्या घागऱ्यातला रश्मिकाचा खास लूक

२. ज्या लोकांना किडनी स्टोन असतो.

३. मधुमेहींनीही बीट खाऊ नये. 

 

बीटरुट कोशिंबीर रेसिपीबीट किसून घ्यावे. त्यानंतर त्यात त्यात धणेपूड आणि जिरेपूड घालावी. चिमुटभर साखर आणि चवीनुसार मीठ टाकावे. वरतून थोडेसे लिंबू पिळावे किंवा दही घालावे. आवडत असेल तर हिंग, मोहरी, जिरे घालून फोडणीही घालू शकता. मंजिरी कुलकर्णी (लेखिका आहारतज्ज्ञ आहेत. Themindfuldiet इथे त्यांच्याशी 9518538993 या क्रमांकावर संपर्क करता येईल.

 

टॅग्स :अन्ननवरात्रीवेट लॉस टिप्सहेल्थ टिप्समधुमेह