Join us  

नवरात्र स्पेशल फूड : उत्तम पचनासाठी आठवणीने खावेत जवस, एक चमचाभर जवस तब्येतीसाठी ठरतात वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2022 3:28 PM

नवरात्र स्पेशल फूड : आज नवरात्राचा दुसरा दिवस. दुसरा स्त्रियांसाठी आहारात आवश्यक पदार्थ- जवस. -भाग -२

ठळक मुद्देदररोज जवसाची पूड खाल्ली आणि शरीरात इतर काही व्याधी असतील तर हेच स्लो पॉयझनिंगसारखं काम करू शकत . त्यामुळे जवस हे योग्य पद्धतीने खाणे अतिशय आवश्यक आहे.

मंजिरी कुलकर्णीनवरात्राचा दुसरा दिवस. आजचा पदार्थ आहे जवस (javas/Flax seed). काल आपण ताकाविषयी बोललोच. आज तसाच एक दुसरा पदार्थ म्हणजे जवस. जवस हे ओमेगा फॅटी ऍसिड रिच असलेलं आहे ओमेगा फॅटी ऍसिड हे जवसाच्या तेलामध्ये असतात. पण जेव्हा आपण जवसाची पूड करतो तेव्हा त्यामध्ये हवेशी संपर्क येऊन सायनाईड नावाचं विषद्रव्य तयार व्हायला सुरुवात होते. त्याचे प्रमाण विषबाधा करण्याइतके नसले तरी अगदी दररोज जवसाची पूड खाल्ली आणि शरीरात इतर काही व्याधी असतील तर हेच स्लो पॉयझनिंगसारखं काम करू शकत .त्यामुळे जवस हे योग्य पद्धतीने खाणे अतिशय आवश्यक आहे. साधारणतः पाळी गेल्यानंतर म्हणजेच मेनोपॉज नंतर स्त्रियांना हृदयाचा धोका होऊ शकतो. कारण आपल्या शरीरात पाळी असताना जी काही संप्रेरके तयार होत असतात ती आपल्याला हृदयविकारापासून लांब ठेवत असतात .

 

दररोज जवस सेवन केल्यामुळे खालील फायदे दिसुन येतात 1. ओमेगा फॅटी ॲसिड म्हणजेच चांगले फॅट्स मिळतात. 

नवरात्र स्पेशल फूड :  रोज १ ग्लास ताक पिण्याचे १० फायदे;  स्त्रियांच्या आहारात तर ताक हवेच..2. कॅन्सर पासून संरक्षण. 3. फायबर जास्त असल्यामुळे पचन चांगले होते.4. बॅड काेलेस्टेरॉल म्हणजे हानिकारक फॅट्स कमी होतात ..5. रक्तदाब नियंत्रित राहतो.6. मधुमेह नियंत्रित राहतो.

 

जवसाचे सेवन कसे करावे ?1. जवस भाजलेल्या बियांचा स्वरुपात, बडीशेप मध्ये मिक्स करून खावे 2 . गरोदरपणात जवस खाऊ नयेत.

नऊ दिवसांचे उपवास करताना तज्ज्ञांनी सांगितला खास आहार.. ॲसिडीटी, अपचनाचा त्रास होणार नाही3. जवसाचे तेल खाण्याला काहीच हरकत नाही.4. जवसाची चटणी ताजी असतानाच संपवावी.5 भाजलेल्या जवसाच्या बिया दररोज खाऊ शकता .

(लेखिका आहारतज्ज्ञ आहेत. Themindfuldiet इथे त्यांच्याशी 9518538993 या क्रमांकावर संपर्क करता येईल.

 

टॅग्स :अन्ननवरात्रीआहार योजनाहेल्थ टिप्स