उपवासाचे तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर आता हा एक नवा, चटपटीत पदार्थ करून बघा. उपवासाचे दहीवडे (Vrat Ke Dahi Vade). एरवी दहीवडे आपण चाट म्हणून कधीही खातो. पण हेच दहीवडे जर उपवासाच्या पदार्थांपासून तयार झाले आणि उपवासाच्या दिवशी मनसोक्त खाता आले, तर क्या बात है... असे एक से एक चवदार आणि वेगवेगळे पदार्थ उपवासाच्या दिवशी खायला मिळाले तर उपवासाचा आनंद आणखी वाढणार हे निश्चित. ही खास रेसिपी शेफ रणवीर ब्रार (How to do dahi vada for fast?) यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
उपवासाचे दहीवडे
पीठासाठीचे साहित्य
अर्धा कप भगर
२ टेबलस्पून फेटलेलं दही
पाव कप भिजवलेला साबुदाणा
अफलातून ! साडीच्या पदरावरची नक्षी जशीच्या तशी रांगोळीतून साकारली, पाहा महिलांची अप्रतिम कलाकुसर
चवीनुसार मीठ
अर्धा टिस्पून साखर
२ ते ३ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
अर्धा इंच किसलेलं आलं
२ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर,
४ ते ५ कापलेले मनुका
तळण्यासाठी तेल.
चटणीसाठी साहित्य
२ ते ४ हिरव्या मिरच्या
पाव कप कोथिंबीर
पाव कप पुदिन्याची पाने
चवीनुसार मीठ
२ ते ३ काजू
१ टेबलस्पून दही
रेसिपी
१. साबुदाणा आणि भगर एकत्र करून मिक्सरमधून काढून त्याची पेस्ट करून घ्या.
दररोज करा बालासन, रोज छळणारी पाठदुखी होईल गायब, शरीर आणि मन दोन्ही होईल रिलॅक्स..
२. हे मिश्रण एका बाऊलमध्ये काढा. त्यात वरील सगळे मिश्रण मिक्स करा. थोडंंसं तेल देखील टाका.
३. आता या मिश्रणाचे वडे तळा. तळताना गॅस मध्यम आचेवर ठेवा.
४. वडे तळल्यानंतर ते ताकात टाका. जेणेकरून ताक वड्यांमध्ये मुरेल आणि वड्याला जरा मऊपणा येईल.
चटणी रेसिपी
१. मिरची, कोथिंबीर, पुदिना, काजू, मीठ आणि दही हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घ्या.
नवरात्र स्पेशल पदार्थ: खूप अशक्तपणा वाटतो? अंगात ताकदच नाही? खा सातूचे पीठ- फायदे ५
२. त्यात थोडे दही आणि चवीनुसार मीठ आणि चिमुटभर साखर टाका.
३. वरतून जिऱ्याची फोडणी घाला. चटपटीत चटणी झाली तयार.