Join us  

नवरात्रात करा खास फराळी उपवासाचे दहीवडे! मऊसूतआणि चविष्ट फराळी दहीवड्यांची खास रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2022 9:34 AM

Vrat Ke Dahi Vade: उपवासाच्या दिवशी (fast) जर चवदार, खमंग दहीवडे खायला मिळाले, तर क्या बात है... म्हणूनच तर थोडासा चेंज म्हणून ही घ्या एक मस्त रेसिपी.

ठळक मुद्देअसे एक से एक चवदार आणि वेगवेगळे पदार्थ उपवासाच्या दिवशी खायला मिळाले तर उपवासाचा आनंद आणखी वाढणार हे निश्चित.

उपवासाचे तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर आता हा एक नवा, चटपटीत पदार्थ करून बघा. उपवासाचे दहीवडे (Vrat Ke Dahi Vade). एरवी दहीवडे आपण चाट म्हणून कधीही खातो. पण हेच दहीवडे जर उपवासाच्या पदार्थांपासून तयार झाले आणि उपवासाच्या दिवशी मनसोक्त खाता आले, तर क्या बात है... असे एक से एक चवदार आणि वेगवेगळे पदार्थ उपवासाच्या दिवशी खायला मिळाले तर उपवासाचा आनंद आणखी वाढणार हे निश्चित. ही खास रेसिपी शेफ रणवीर ब्रार (How to do dahi vada for fast?) यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. 

 

उपवासाचे दहीवडेपीठासाठीचे साहित्यअर्धा कप भगर२ टेबलस्पून फेटलेलं दहीपाव कप भिजवलेला साबुदाणा

अफलातून ! साडीच्या पदरावरची नक्षी जशीच्या तशी रांगोळीतून साकारली, पाहा महिलांची अप्रतिम कलाकुसरचवीनुसार मीठअर्धा टिस्पून साखर२ ते ३ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्याअर्धा इंच किसलेलं आलं२ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, ४ ते ५ कापलेले मनुकातळण्यासाठी तेल.

चटणीसाठी साहित्य२ ते ४ हिरव्या मिरच्यापाव कप कोथिंबीरपाव कप पुदिन्याची पानेचवीनुसार मीठ२ ते ३ काजू१ टेबलस्पून दही

 

रेसिपी १. साबुदाणा आणि भगर एकत्र करून मिक्सरमधून काढून त्याची पेस्ट करून घ्या.

दररोज करा बालासन, रोज छळणारी पाठदुखी होईल गायब, शरीर आणि मन दोन्ही होईल रिलॅक्स..

२. हे मिश्रण एका बाऊलमध्ये काढा. त्यात वरील सगळे मिश्रण मिक्स करा. थोडंंसं तेल देखील टाका.

३. आता या मिश्रणाचे वडे तळा. तळताना गॅस मध्यम आचेवर ठेवा.

४. वडे तळल्यानंतर ते ताकात टाका. जेणेकरून ताक वड्यांमध्ये मुरेल आणि वड्याला जरा मऊपणा येईल. 

 

चटणी रेसिपी१. मिरची, कोथिंबीर, पुदिना, काजू, मीठ आणि दही हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घ्या.

नवरात्र स्पेशल पदार्थ: खूप अशक्तपणा वाटतो? अंगात ताकदच नाही? खा सातूचे पीठ- फायदे ५

२. त्यात थोडे दही आणि चवीनुसार मीठ आणि चिमुटभर साखर टाका.

३. वरतून जिऱ्याची फोडणी घाला. चटपटीत चटणी झाली तयार.   

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.नवरात्री