नवरात्र (Navratri 2023) सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. नवरात्रीच्या (Shardiya Navratri Utsav 2023) नऊ दिवसात उपवासाचे अनेक पदार्थ खाल्ले जातात. साबुदाणा वडा किंवा खिचडी खाऊन कंटाळा आला की काहीतरी नवीन खावंसं वाटतं. ऑफिसचं काम, घरातील कामं या सगळ्यामुळे वेळ मिळत नसल्याने उपवासाच्या दिवशी काय वेगळं बनवावं हेच सुचत नाही. (Upwas Special Food)
अशावेळी तुम्ही गरमागरम साबुदाण्याचा पराठा (Sabudana Paratha Recipe) बनवू शकता. हा पराठा बनवण्यासाठी तुम्हाला जास्त साहित्य लागणार नाही. कमीत कमी वेळेत हा पदार्थ बनून तयार होईल. (How to make sabudana paratha)
साबुदाणा पराठा कसा बनवायचा? (Sabudana thalipith kase karave)
१) साबुदाणा पराठा बनवण्यासाठी सगळ्यात आधी ५ ते ६ तास भिजवलेला साबुदाणा एका भांड्यात काढून घ्या. त्याच दाण्याचे कुट आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घाला. त्यात चवीनुसार मीठ घाला. त्यात तुम्ही सैंधव मीठही घालू शकता. यात एक ते दोन चमचे दही घाला.
२) त्या कोथिंबीर घालून व्यवस्थित एकजीव करून घ्या. त्यात अर्धा कच्चा बटाटा किसून घ्या. कच्चा बटाटा व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यात उकडलेल्या बटाट्याचा किस घाला. याचा गोळा बनवल्यानंतर थोड्यावेळासाठी बाजूला ठेवून द्या.
३) नंतर एका प्लास्टिकच्या पेपरला तेल लावून घ्या. नंतर त्यावर तयार साबुदाणा-बटाट्याचा गोळा घेऊन व्यवस्थित पसरवून घ्या. हा पराठा थोडा जाडसरच ठेवा.
४) तव्याला थोडं तेल लावून घ्या. तुम्ही आवडीनुसार तूपही लावू शकता. पॉलिथीन वेगळे करून तव्याला थोडं तेल लावून घ्या आणि पराठा तव्यावर घाला.
५) मध्यम आचेवर तीन ते चार मिनिटं शेकल्यानंतर पुन्हा तेल लावून घ्या. खालची बाजू शिजल्यानंतर दुसऱ्या बाजूनेही २ ते ३ मिनिटांसाठी शिजवून घ्या. साबुदाणा पराठा दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घेतल्यानंत गॅस बंद करा. हा पराठा तुम्ही दही किंवा ओल्या नारळाच्या चटणीबरोबर खाऊ शकता.