Join us

नवरात्री स्पेशल: करा उपवासाचा कुरकुरीत मसाला डोसा, शेफ कुणाल कपूर यांची चविष्ट- सोपी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2022 14:10 IST

Masala Dosa for Navratri Fast: भगर, साबुदाणा, राजगिरा यांचे पदार्थ तर आपण उपवासाच्या दिवशी नेहमीच करतो. आता करून बघा सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर ( Kunal Kapur) यांनी सांगितलेला उपवासाचा खमंग कुरकुरीत मसाला डोसा.

ठळक मुद्देहा डोसा करायला सोपा, चवीला उत्तम आणि शिवाय अतिशय पौष्टिक आहे.

साबुदाण्याची खिचडी किंवा उसळ, राजगिऱ्याचे थालिपीट, भगर- आमटी, बटाट्याचा किस हे काही पदार्थ खास उपवासासाठी ठरलेले असतात. पण नवरात्रीच्या नऊ दिवसांत रोज तेच ते पदार्थ खाण्याचा कंटाळा येतो. काही तरी नवा पदार्थ खावा, चव बदल व्हावी, असं वाटतं. म्हणूनच हा एक पदार्थ तुम्हाला आवडू शकेल असाच आहे. सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी उपवासाचा मसाला डोसा कसा करायचा, याची रेसिपी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. हा डोसा करायला सोपा, चवीला उत्तम आणि शिवाय अतिशय पौष्टिक आहे.

 

उपवासाचा मसाला डोसा (Masala dosa for fast)साहित्य१ वाटी साबुदाणाअर्धी वाटी भगर२ टेबलस्पून दहीचवीनुसार मीठतेलतसेच भाजीसाठी उकडलेले बटाटे, मिरच्या, चवीनुसार तिखट आणि मीठ

रेसिपी१. सगळ्यात आधी साबुदाणा भिजत टाका आणि तो ४ ते ५ तास भिजू द्या.

२. त्यानंतर भगर देखील भिजत टाकावी आणि २ तास भिजू द्यावी.

३. आता भिजवलेला साबुदाण, भिजवलेली भगर, दही, चवीनुसार साधे मीठ आणि थोडे सैंधव मीठ असे सगळे साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाका आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.

४. हे पीठ खूप जास्त पातळ करू नये, तसेच अतिघट्ट देखील ठेवू नये. 

५. आता गॅसवर तवा तापायला ठेवा. तवा तापला की त्यावर डोसा पीठ टाका. हलक्या हाताने ते पसरवून घ्या. आजूबाजूला आणि डोस्यावर तेल सोडा आणि खमंग- कुरकुरीत डोसे करा.

६. त्यासोबत खाण्यासाठी आपण बटाटे उकडून जशी भाजी करतो, तशी भाजी नेहमीप्रमाणे करून घ्या. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.कुणाल कपूर