नवरात्रीच्या (Navratri 2023) नऊ दिवसांच्या उपवासात नेहमीच वेगवेगळे उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात पण नेहमी नेहमी तेच तेच खाऊन कंटाळा येतो. उपवासाच्या दिवसांत साबुदाण्याची खिचडी दिवसरात्र खाल्ली जाते. (How to make Vrat ki Puri) यात बदल म्हणून तुम्ही साबुदाणा बटाट्याची पुरी बनवू शकता. (Cooking Hacks)
अगदी ५ ते १० मिनिटांत साबुदाण्याची पुरी बनून तयार होते. साबुदाण्याची पुरी बनवण्यासाठी तुम्हाला फार काही करावं लागणार नाही. साबुदाणे न भिजवता ही झटपट रेसिपी तयार होते. (How to make sabudana batata puri) साबुदाण्याचे पीठ दळून तयार ठेवणं, उकडलेला बटाटा ही पूर्वतयारी तुम्हाला करावी लागेल.
उपवासाच्या पुऱ्यांसाठी लागणारं साहित्य (Sabudana-batata puri preparation)
1) साबुदाणे- १ ते २ वाटी
2) उडकून मॅश केलेले बटाटे - २ वाटी
3) जीरं- २ चमचे
4) हिरव्या मिरच्या - २
5) आलं- अर्धा इंच
6) मीठ- चवीनुसार
7) तेल- गरजेनुसार
साबुदाणा-बटाट्याची पुरी कशी करण्याची कृती (Upvasachi Puri Recipe)
१) उपवासाची पुरी बनवण्यासाठी सगळ्यात आधी साबुदाणे व्यवस्थित भाजून घ्या. साबुदाण्यांची व्यवस्थित पावडर करून झाल्यानंतर त्यात मीठ, जीरं, उकडून मॅश केलेला बटाटा, मिरचीची पेस्ट घाला. थोडं पाणी घालून हे मिश्रण एकजीव करून घ्या. तुम्ही मिरची ऐवजी लाल तिखटाचाही वापर करू शकता.
२) यात थोडं तेल घालून पीठ पुन्हा व्यवस्थित मळून घ्या त्यानंतर या पीठाचे मध्यम आकाराच गोळे तोडा. हे गोळे व्यवस्थित लाटून घ्या.
दूध न पिता कॅल्शियम कसं मिळेल? दुप्पट कॅल्शियम असलेले ८ पदार्थ खा-२०६ हाडं होतील मजबूत
३) त्यानंतर ग्लास किंवा झाकणाच्या साहाय्याने हे वेगळं करून घ्या. तेलाला उकळी फुटल्यानंतर पुरी फुगेपर्यंत व्यवस्थित तळून घ्या. या उपवासाच्या पुऱ्या तुम्ही बटाट्याच्या भाजीबरोबर किंवा ठेच्याबरोबर खाऊ शकता.
देवीच्या नैवेद्याला करा मऊ पायनॅप्पल शीरा; तोंडात टाकताच विरघळेल-चविष्ट नैवेद्य झटपट बनेल
४) पुऱ्यांसाठी बटाटा मॅश करताना बटाटा ओलसर नसेल याची काळजी घ्या. अन्यथा पुरी व्यवस्थित फुलणार नाही. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतरच त्यात पुरी घाला. यात शिंगाड्याचे पीठ किंवा वरीच्या तांदळाची पावडरही वापरू शकता.