नवरात्रीच्या (Navratri 2023) नऊ दिवसांच्या उपवासात नेहमीच साबुदाण्याची खिचडी किंवा भगर खाण्याचा कंटाळा येतो. (Sabudana Bhaji) अशावेळी तुम्ही उपवासाच्या पदार्थांचा वापर करून खमंग, कुरकुरीत नाश्ता बनवू शकता. (Cooking Hacks) हे पदार्थ बनवण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत लागणार नाही.
अगदी कमी वेळेत कमी खर्चात उपवासाच्या भजी घरीच बनवता येतील. (How to make sabudana pakoda) उपवासाच्या दिवसांसाठी पूर्वतयारी म्हणून तुम्ही साबुदाण्याचे पीठ आधीच दळून आणू शकता जेणेकरून नंतर घाई होणार नाही. याशिवाय तुम्हाला शिंगाड्याचे पीठ, राजगिरा सुद्धा तयार मिळेल.
उपवासाची भजी बनवण्याचे साहित्य
१) साबुदाणे- १ वाटी
२) बटाट्याच्या बारीक फोडी- १ वाटी
३) कोथिंबीर- १ वाटी
४) शेंगदाण्याचे कुट - १ वाटी
५) काळी मिरी- पाव टिस्पून
६) जीरं - १ टिस्पून
साबुदाण्याची कुरकुरीत भजी कशी करावी? (How to make sabudana bhaji crispy)
१) उपवासाची भजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी १ कप साबुदाणे मिक्सरमध्ये दळून घ्या. साबुदाण्यांची पावडर व्यवस्थित बारीक होईपर्यंत दळून घ्या.
मऊ, जाळीदार उपवासाचा ढोकळा घरीच करा; २ जिन्नस वापरून बनेल चविष्ट नाश्ता-सोपी रेसिपी
२) साबुदाणा बारीक झाल्यानंतर त्यात मोठ्या आकाराच्या बटाट्याचे बारीक काप करून घाला. त्यात आलं किंवा मिरची घाला. थोडं पाणी घालून मिक्सरमधून वाटून घ्या.
३) ही पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात शेंगदाणाचे कुट, जीरं, काळी मिरी पावडर, मीठ, कोथिंबीर घालून एकजीव करून घ्या.
देवीच्या नैवेद्याला करा मऊ पायनॅप्पल शीरा; तोंडात टाकताच विरघळेल-चविष्ट नैवेद्य झटपट बनेल
४) नंतर एका कढईत तेल तापवण्याासाठी ठेवा. तेल गरम झालं की मिश्रणाचे गोळे तेलात सोडून खमंग भजी तळून घ्या. ही भजी तुम्ही शेंगदाण्याची आमटी, दही किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता.
५) भजी तेलकट होऊ नये यासाठी तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतरच त्यात भजी घाला. मऊपणा येण्यासाठी तुम्ही इनो घालू शकता. उपवासाच्या भजीत तुम्ही वरीच्या तांदळाची पेस्टही घालू शकता. तांदळाला