Lokmat Sakhi >Food > हॉटेलसारखे कुरकुरीत साबुदाणा वडे घरीच करा; साबुदाण्यात १ पदार्थ घाला-कमी तेलात होतील वडे

हॉटेलसारखे कुरकुरीत साबुदाणा वडे घरीच करा; साबुदाण्यात १ पदार्थ घाला-कमी तेलात होतील वडे

How to Make Sabudana Vada Crispy : हे वडे खूप तेल पितात तर कधी जास्त मऊ पडतात, साबुदाणा वडा तेलात टाकताच फुटतो अशा अनेक तक्रारी महिलांच्या असतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 11:37 AM2023-10-13T11:37:35+5:302023-10-13T12:17:04+5:30

How to Make Sabudana Vada Crispy : हे वडे खूप तेल पितात तर कधी जास्त मऊ पडतात, साबुदाणा वडा तेलात टाकताच फुटतो अशा अनेक तक्रारी महिलांच्या असतात.

Navratri Special How to Make Sabudana Vada Crispy : Perfect Sabudana Vada Recipe | हॉटेलसारखे कुरकुरीत साबुदाणा वडे घरीच करा; साबुदाण्यात १ पदार्थ घाला-कमी तेलात होतील वडे

हॉटेलसारखे कुरकुरीत साबुदाणा वडे घरीच करा; साबुदाण्यात १ पदार्थ घाला-कमी तेलात होतील वडे

उपवासाच्या दिवशी साबुदाण्याचं कुरकरीत वडे खायला लोकांना फार आवडतं. काहीजण तर हे पदार्थ खायला मिळावेत यासाठीच उपवास करतात. (Navratri Fasting 2023) नवरात्रीच्या उपवासात अगदी रोज नाही पण एखाद्या दिवशी तरी तुम्ही साबुदाण्या वड्यांचा बेत करणार असाल तर साबुदाणे वडे परफेक्ट बनावेत यायासाठी काही टिप्स फॉलो करू शकता. हे वडे खूप तेल पितात तर कधी जास्त मऊ पडतात, साबुदाणा वडा तेलात टाकताच फुटतो अशा अनेक तक्रारी महिलांच्या असतात. (Sabudana Vada Recipe in marathi)

कमी तेल पिणारे-साबुदाणा वडे कसे बनवावे? (How to make soft sabudana vada)

१) साबुदाणा २ ते ३ वेळा स्वच्छ धुवून घ्या. नंतर एक्स्ट्रा पाणी घालून साबुदाणे भिजवा. साबुदाणे वडे मऊ-मोकळे शिजावेत यासाठी मध्यम पाण्यात भिजवा. दीड तासांसाठी साबुदाणे तसेच ठेवून द्या.  दुसरीकडे बटाटे उक़डून घ्या. दीड तासानंतर साबुदाणे फुललेले दिसून येतील. 

२) त्यानंतर यात सैंधव मीठ, काळीमिरी पावडर,  जीरं, बारीक चिरलेली हिरवी मिरची, दाण्याचे कूट कोथिंबीर आणि सगळ्यात शेवटी उकडून घेतलेला बटाटा हाताने मॅश करून घाला. (बटाटा किसून घालून नका अन्यथा तो जास्त चिकट होऊ शकतो. बटाटे शिजल्यानंतर थोड्या वेळासाठी हवेत ठेवून द्या. त्यानंतर त्याची सालं काढा.)

नवरात्रीत ९ दिवस उपवास करताना लक्षात ठेवा ७ गोष्टी; तब्येतीला त्रास न होता करता येतील उपवास आनंदाने

३) एका भांड्यात सर्व पदार्थ एकजीव केल्यानंतर एका मोठ्या ताटात काढून घ्या. थोडा आंबटपणा येण्यासाठी यात थोडा लिंबाचा रस घाला.  हे पदार्थ व्यवस्थित मिसळून घ्या. चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित समान आकाराचे गोळे तोडून वड्यांना गोलाकार शेप देऊन नंतर चपटे करा. रोल केल्यानंतर हलक्या हाताने दाबून घ्या. 

४) साबुदाणा वडे तळण्यासाठी कोल्ड प्रेस शेंगदाण्याच्या तेलाचा वापर करा. तुम्ही रिफाईन ऑईल किंवा तुपाचा वापरही करू शकता. मध्यम आचेवर ठेवल्यानंतर तेल गरम झाल्यानंतर  एक एक करून साबुदाणा वडे घाला. एका बाजूने फ्राय केल्यानंतर साबुदाणा वडा दुसऱ्या  बाजून तळून  घ्या. 

कोण म्हणतं फक्त बदामातून प्रोटीन मिळतं? मूठभर शेंगदाणे रोज खा, भरपूर कॅल्शियम मिळेल

५) जास्तीत जास्त  ५ मिनिटांत साबुदाणा वडा तळून होईल. गोल्डन, ब्राऊन होईपर्यंत साबुदाणा वडे तळून घ्या. हे वडे जास्त तेलही पिणार नाहीत. साबुदाणा वडे ओल्या नारळाची चविष्ट चटणी, शेंगदाण्याची आमटी याबरोबर तुम्ही खाऊ शकता. 

Web Title: Navratri Special How to Make Sabudana Vada Crispy : Perfect Sabudana Vada Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.