Join us  

नवरात्र स्पेशल: देवीसाठी तांबुल करायचा? २ सोप्या रेसिपी, तांबुलही रंगेल छान..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2022 3:55 PM

Tambul Recipe: थोड्याशा ट्रिक्स आणि टिप्स वापरल्या तर देवीसाठी तांबुल करणं अगदी सोपं- सहज आहे. म्हणूनच बघा झटपट तांबुल करण्याची सोपी रेसिपी (Tambul recipe). 

ठळक मुद्दे या बघा २ अगदी सोप्या रेसिपी. कमी वेळात अतिशय चवदार तांबुल तयार.

नवरात्रीमध्ये देवीची घटस्थापना झाली की देवीसाठी हमखास तांबुलाचा नैवेद्य दाखवला जातो. जितका मान देवीसाठी करण्यात आलेल्या गोड पदार्थांच्या नैवेद्याला असतो, तेवढाच मान तांबुलाचा देखील असतो. शिवाय नवरात्रीच्या दिवसांत महिला अनेक धार्मिक कार्यक्रम करतात. या काळात घरी येणाऱ्या महिलांनाही तांबुल (How to make tambul) किंवा विड्याचं पान देण्यात येतं. त्यामुळे तांबुल नवरात्रात हमखास लागतोच. म्हणूनच या बघा २ अगदी सोप्या रेसिपी (Tambul recipe). कमी वेळात अतिशय चवदार तांबुल तयार.

 

कसा करायचा तांबुलसाहित्य२५ विड्याची पानं४ टेबलस्पून बडिशेप

नवरात्री स्पेशल: करा उपवासाचा कुरकुरीत मसाला डोसा, शेफ कुणाल कपूर यांची चविष्ट- सोपी रेसिपी२ टेबलस्पून गुलकंदएक टीस्पून कातअर्धा टिस्पून चुना२ टेबलस्पून ज्येष्ठमधाची पावडर४ टेबलस्पून किसलेले खोबरे८ ते ९ लवंग आणि तेवढ्याच विलायची.

 

रेसिपी१. सगळ्यात आधी विड्याची पानं स्वच्छ धुवून घ्या. पुसून कोरडी करून घ्या. या पानांमध्ये पाण्याचा अंशही राहणार नाही, याची काळजी घ्या. नाहीतर तांबुलाला वास येतो.

नवरात्रीच्या उपवासाने थकवा आला? बघा ४ प्रकारचे एनर्जी ड्रिंक... चटकन वाटेल फ्रेश आणि थकवा गायब

२. यानंतर विड्याच्या पानांची देठं काढून टाका. पानाचे हातानेच तुकडे करा आणि ते मिक्सरमध्ये टाका. वरील साहित्यापैकी गुलकंद वगळता इतर सगळे साहित्यही मिक्सरमध्ये टाका.

३. मिक्सर फिरवून जाडीभरडी पेस्ट करा. त्यानंतर मग दुसऱ्या टप्प्यात गुलकंद टाका आणि पुन्हा एकदा फिरवून घ्या.

४. खूपच बारीक पेस्ट करू नये. तांबुल थोडा जाडसरच चांगला वाटतो. त्यामुळे त्यातल्या सगळ्या पदार्थांची छान चव लागते. 

 

रेसिपी २१. वर दिलेल्या रेसिपीमध्ये सांगितलेले साहित्य घरात नसेल आणि त्याची जमवाजमव करायला वेळही नसेल तर सरळ २५ विड्याची पानं विकत आणा. त्याच्यासोबतच टपरीवर मिळणारी ४ मसाला पानंही विकत आणा. 

२. विड्याची पानं धुवून- पुसून घ्या. त्याचे तुकडे करून ते मिक्सरमध्ये टाका. त्याच्यासोबत विकत आणलेली ४ मसाला पानंही मिक्सरमध्ये टाका. सगळे एकदम वाटून घेतले की झटपट ५ मिनिटांत तांबुल झाला तयार. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीनवरात्री