Lokmat Sakhi >Food > नवरात्र स्पेशल : उपवासासाठी सोप्या ४ स्टेप्समध्ये झटपट बनवा बटाट्याची रस्सा भाजी, बनवायला सोपी खायला चविष्ट...

नवरात्र स्पेशल : उपवासासाठी सोप्या ४ स्टेप्समध्ये झटपट बनवा बटाट्याची रस्सा भाजी, बनवायला सोपी खायला चविष्ट...

Navratri Special : Upvasachi Batata Rassa Bhaji : तोंडाला पाणी आणणारी, खमंग व चटपटीत उपवास स्पेशल बटाट्याची रस्सा भाजी बनवायची सोपी रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2023 07:37 PM2023-10-19T19:37:39+5:302023-10-19T19:54:30+5:30

Navratri Special : Upvasachi Batata Rassa Bhaji : तोंडाला पाणी आणणारी, खमंग व चटपटीत उपवास स्पेशल बटाट्याची रस्सा भाजी बनवायची सोपी रेसिपी...

Navratri Special How To Make Upvasachi Batata Rassa Bhaji , Upvasachi Batata Rassa Bhaji | नवरात्र स्पेशल : उपवासासाठी सोप्या ४ स्टेप्समध्ये झटपट बनवा बटाट्याची रस्सा भाजी, बनवायला सोपी खायला चविष्ट...

नवरात्र स्पेशल : उपवासासाठी सोप्या ४ स्टेप्समध्ये झटपट बनवा बटाट्याची रस्सा भाजी, बनवायला सोपी खायला चविष्ट...

आपल्याकडे उपवासाला एक प्रकारचे धार्मिक महत्त्व आहे. उपवासाच्या दिवशी आपल्याकडे  खास फराळ तयार केला जातो. उपवासाच्या या फराळामध्ये आपण सहसा साबुदाणा व बटाटा वापरून अनेक पदार्थ तयार करतो. उपवासा दरम्यान साबुदाण्याची खिचडी, वडे, खीर, बटाटयाची सुकी भाजी, उपवासाचे पराठे, थालिपीठ, उपवासाची मिसळ असे अनेक पदार्थ फराळ म्हणून खातो. यापैकीच एक लोकप्रिय फराळ म्हणजे (Maharashtrian Style Potato Curry For Fasting) उपवासाची बटाट्याची रस्सा भाजी. आपण एरवीसुद्धा बटाट्याची सुकी भाजी बनवून खातो. सगळ्यांचाच ही बटाट्याची भाजी खायला खूप आवडते(Upvas Batata Rassa Bhaji Recipe).

बटाटा म्हटलं की असंही तोंडाला पाणी सुटतं. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांची आवडती भाजी म्हणजे बटाटा. बटाट्याच्या वेगवेगळ्या रेसिपी आपल्याकडे प्रामुख्याने उपवासाला करण्यात येतात. अगदी फ्राईज, सुकी भाजी, रस्सा भाजी असे विविध चविष्ट पदार्थ आपण बटाट्यापासून तयार करतो. कोणत्याही प्रकारचा उपवास हा बटाट्याच्या कोणत्याही पदार्थाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. उपवासाला आपण बटाट्याची सुकी भाजी तर करतोच. परंतु यंदाच्या नवरात्रीच्या उपवासाला बटाट्याची रस्सा भाजी (Fasting Recipe) नक्की ट्राय करून पहा. घरीच उपलब्ध असणाऱ्या साहित्यात आपण ही झटपट होणारी रस्सा भाजी बनवू शकतो. ही रस्सा भाजी उपवासाला डोसा, घावन किंवा वरीच्या भातासोबत खाण्यासाठी चविष्ट लागते(Navratri Special How To Make Upvasachi Batata Rassa Bhaji).

साहित्य  :- 

१. किसलेलं खोबर - १/२ कप 
२. हिरव्या मिरच्या - ४ ते ५ 
३. आल्याच्या लहान तुकडा - १ छोटा तुकडा
४. पाणी - गरजेनुसार 
५. तेल - ३ ते ४ टेबलस्पून 
६. जिरे - १ टेबलस्पून 
७. कच्चे बटाटे - ३ कप (लहान तुकडे कापून घेतलेले)
८. भिजवलेले शेंगदाणे - १/२ कप 
९. मीठ - चवीनुसार 
१०. दही - ३ टेबलस्पून 
११. कोथिंबीर - २ टेबलस्पून (बारीक चिरून घेतलेली)

उपवासाला खा पौष्टिक मखाणा खीर, ५ मिनिटांत होणारी मखाणा खीर खा - मिळेल इन्स्टंट ताकद...

नवरात्र स्पेशल : फक्त १० मिनिटांत करा साबुदाणा आणि भगरीच्या पीठाचे घावन, उपवासाचा झटपट चविष्ट बेत...

कृती :- 

१. सर्वात आधी एका मिक्सरच्या भांड्यात किसलेलं खोबर, हिरव्या मिरच्या, आल्याच्या लहान तुकडा व गरजेनुसार पाणी घालून वाटण तयार करुन घ्यावे. 
२. आता एका भांड्यात तेल घेऊन ते हलकेच गरम झाले की त्यात जिरे, बटाट्याचे लहान तुकडे, भिजवलेले शेंगदाणे घालून घ्यावेत. 
३. हे मिश्रण तेलात चांगले परतून घेतल्यावर त्यात खोबऱ्याचे तयार करून घेतलेले वाटण घालावे. 

नवरात्र स्पेशल : नेहमीची तीच ती साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळलात ? त्याच पारंपरिक साबुदाणा खिचडीला द्या हटके ट्विस्ट...

उपवासाची भजी खाता आली तर काय मजा ना ? करा चमचमीत उपवासाची भजी, पाहा रेसिपी...

४. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ व पाणी घालून घ्यावे. त्यावर झाकण ठेवून ४ ते ५ मिनिटे व्यवस्थित शिजवून घ्यावे. 
५. सगळ्यात शेवटी गॅसची आच मंद करुन त्यात दही व बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. 
६. हे सगळे जिन्नस व्यवस्थित शिजवून घ्यावेत. 

आपली गरमागरम बटाट्याची रस्सा भाजी खाण्यासाठी तयार आहे. ही भाजी आपण उपवासाचा डोसा किंवा घावन, वरीचा भात यासोबत खाऊ शकता. यासोबतच ही भाजी नुसती खाण्यासाठी देखील चांगली लागते.

Web Title: Navratri Special How To Make Upvasachi Batata Rassa Bhaji , Upvasachi Batata Rassa Bhaji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.