Join us  

नवरात्र स्पेशल : फक्त १० मिनिटांत करा साबुदाणा आणि भगरीच्या पीठाचे घावन, उपवासाचा झटपट चविष्ट बेत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2023 7:50 PM

How To Make Upvasache Ghavan At Home : वेळ कमी - भूक लागलेली असेल तर नक्की करा ही झटपट घावनं रेसिपी...

नवरात्रीच्या उपवासाला आता सर्वत्र सुरुवात झाली आहे. उपवासाला नेमके काय खावे असा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. आपल्यापेक्षा घरच्या गृहिणीची अशावेळी तारांबळ उडते. नेमके उपवासाचे नऊ दिवस काय बनवावे असा मोठा प्रश्न तिला पडतो. रोज तोच तो वरीचा भात, साबुदाण्याची खिचडी, वडे, रताळ्याचा किस, बटाट्याची भाजी असे उपवासाचे पदार्थ खाऊन अगदी उबग येतो. अशावेळी काहीतरी पोटभरीच पौष्टिक खावंसं वाटत(Navratri Special : How To Make Upvsache Ghavne At Home In Just 10 Minute).

उपवासाच्या वेळी पटकन भूक लागल्यास कमीत कमी वेळात घरात उपलब्ध असलेल्या अगदी मोजक्या साहित्याचा वापर करून आपण झटपट होणारे उपवासाचे घावन करु शकतो. एरवी आपण तांदुळाचे घावन नाश्त्याला किंवा जेवणाला म्हणून करतो. परंतु उपवासा दरम्यान घावन खावेसे वाटल्यास आपण झटपट साबुदाण्याचे व भगरीचे पीठ वापरून पटकन होणारे हे घावन (How To Make Upvsache Ghavne) तयार करु शकतो. उपवासाचे हे घावन अगदी कमी वेळात तयार करण्याची सोपी रेसिपी पाहूयात(How To Make Upvsache Ghavne At Home).

साहित्य :- 

१. साबुदाण्याचे पीठ - १ कप २. भगरीचे पीठ - १ + १/२ कप ३. मीठ - चवीनुसार४. खायचा सोडा - १/४ टेबलस्पून ५. दही - २ टेबलस्पून ६. पाणी - गरजेनुसार 

नवरात्र स्पेशल : नेहमीची तीच ती साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळलात ? त्याच पारंपरिक साबुदाणा खिचडीला द्या हटके ट्विस्ट...

फ्रेंच फ्राईज परफेक्ट होण्यासाठी शेफ पंकज भदोरिया सांगतात ५ स्टेप्स, उपवासाला खा रेस्टाॅरण्टसारखे कुरकुरीत फ्रेंच फ्राईज...

कृती :- 

१. एका भांड्यात साबुदाण्याचे व भगरीचे पीठ दोन्ही सम प्रमाणांत घ्यावे. २. त्यानंतर त्यात गरजेनुसार खायचा सोडा व चवीनुसार मीठ घालून घ्यावे. ३. आता या पिठात दही घालून घ्यावे. ४. थोडे पाणी घालून आधी हे पीठ थोडे घट्ट तयार करुन चमच्याच्या मदतीने मिक्स करुन घ्यावे. ५. त्यानंतर या भांड्यावर झाकण ठेवून ५ ते १० मिनिटे हे पीठ झाकून ठेवावे. 

नवरात्र स्पेशल : साबुदाणा व भगर वापरून चटकन बनवा उपवासाचा डोसा, खायला कुरकुरीत, बनवायला सोपा...

उपवासासाठी करा स्पेशल फराळी पॅटिस, मऊ - लुसलुशीत पौष्टिक पॅटिस करण्याची सोपी - झटपट रेसिपी...

६. आता या पिठात गरजेनुसार हळूहळू पाणी घालत पीठ ढवळून किंचित पातळ करुन घ्यावे. ७. बिड्याचा तवा किंवा नॉर्मल पॅनला थोडे तेल लावून घ्यावे. त्यानंतर त्यावर गोलाकार आकारात हे घावन सोडावे. ८. घावन तव्यावर घातल्यानंतर त्याच्या चारही बाजुंनी तेल सोडून घ्यावे. ९. घावन पूर्ण कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्यावे. 

आपले उपवासाचे घावन खाण्यासाठी तयार आहेत. हे गरमागरम घावन उपवासाची बटाट्याची भाजी, आमटी किंवा चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करावेत.

टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव 2023नवरात्रीअन्नपाककृती