Lokmat Sakhi >Food > ललिता पंचमीच्या नैवेद्यासाठी १ वाटी तांदूळाची करा पातेलंभर खीर, घ्या सोपी-झटपट रेसिपी...

ललिता पंचमीच्या नैवेद्यासाठी १ वाटी तांदूळाची करा पातेलंभर खीर, घ्या सोपी-झटपट रेसिपी...

Navratri Special Lalita Panchami Tandul Rice Kheer Recipe : कोकणात ललिता पंचमीचे विशेष महत्त्व असून या दिवशी तांदळाची खीर करण्याची पद्धत आहे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2023 04:02 PM2023-10-18T16:02:55+5:302023-10-18T16:03:23+5:30

Navratri Special Lalita Panchami Tandul Rice Kheer Recipe : कोकणात ललिता पंचमीचे विशेष महत्त्व असून या दिवशी तांदळाची खीर करण्याची पद्धत आहे...

Navratri Special Lalita Panchami Tandul Rice Kheer Recipe : For the offering of Lalita Panchami, make 1 bowl of rice into kheer, get this easy-quick recipe... | ललिता पंचमीच्या नैवेद्यासाठी १ वाटी तांदूळाची करा पातेलंभर खीर, घ्या सोपी-झटपट रेसिपी...

ललिता पंचमीच्या नैवेद्यासाठी १ वाटी तांदूळाची करा पातेलंभर खीर, घ्या सोपी-झटपट रेसिपी...

नवरात्रातील सगळ्याच दिवसांना विशेष महत्त्व असले तरी ललिता पंचमी, अष्टमी या दिवसांना विशेष महत्त्व असते. पंचमीच्या दिवशी ललिता मातेची अतिशय भक्तीभावाने पूजा केली जाते. त्यामागे बऱ्याच दंतकथा सांगितल्या जातात . या दिवशी उपवास करुन, कथा-किर्तन केले जाते तसेच देवीची मनोभावे पूजा करुन तिला साग्रसंगीत पदार्थांचा नैवेद्य दाखवण्याचीही रीत आहे. या दिवशी बहुतांश महिला कुमारीका पूजन करतात. घरच्या देवीला नैवेद्य दाखवून कुमारीकेला जेवायला बोलावले जाते जेणेकरुन तिच्या रुपाने आपल्या घरात देवीचा वास राहतो असे मानले जाते. कुमारीकेची पूजा करुन तिला पोटभर देवायला घालून तिला काही भेटवस्तू देण्याची या दिवशी रीत आहे. कोकणात ललिता पंचमीचे विशेष महत्त्व असून या दिवशी तांदळाची खीर, लाल भोपळ्याचे घारगे आणि भाजणीचे वडे यांचा नैवेद्य आवर्जून केला जातो. यामध्ये केली जाणारी तांदळाची खीर करण्याची सोपी रेसिपी पाहूया (Navratri Special Lalita Panchami Tandul Rice Kheer Recipe)... 

साहित्य -

१. तांदूळ - १ वाटी

२. साखर - १ ते १.५ वाटी 

३. दूध - अर्धा लिटर

(Image : Google )
(Image : Google )

४. काजू, बदाम, पिस्ते काप - आवडीनुसार 

५. वेलची पूड - पाव चमचा 

कृती - 

१. तांदूळ पाण्यात १५ मिनीटे भिजत ठेवा. (आपल्या आवडीचा चांगला वास येणारा आंबेमोहोर, बासमती असा कोणताही तांदूळ तुम्ही या खिरीसाठी घेऊ शकता.)

२. एका मध्यम आकाराच्या पातेल्यात तांदूळ हे तांदूळ पाण्यासोबत गालून वरुन आणखी एक ग्लास पाणी घालावे.

३. तांदूळ चांगला शिजत आला की त्यामध्ये तापवून घेतलेले अर्धा लीटर दूध घालून पुन्हा शिजवून घ्यावे.

४. उकळी येईपर्यंत मधे मधे हलवत राहायचे आणि काही वेळाने काजू आणि बदामाचे काप घालायचे. 

५. काही वेळाने यामध्ये साखर आणि वेलची पावडर घालून पुन्हा एकसाऱखे हलवून घ्यायचे. 

६. एकूण साधारणपणे २० मिनीटे खीर शिजवून घ्यायची. यामुळे सगळे जिन्नस चांगल्या पद्धतीने एकजीव होण्यास मदत होते. 

Web Title: Navratri Special Lalita Panchami Tandul Rice Kheer Recipe : For the offering of Lalita Panchami, make 1 bowl of rice into kheer, get this easy-quick recipe...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.