आजपासून नवरात्रीला सुरुवात झाली आहे. नवरात्रीमध्ये अनेकजण उपवास करतात. प्रत्येक घरात उपवासासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे असंख्य पदार्थ तयार केले जातात. उपवासाला आपण काही मोजकेच पदार्थ खातो. याच काही मोजक्या पदार्थांचा वापर करुन उपवासाचे अनेक पदार्थ तयार केले जातात. साबुदाणा, वरई, राजगिरा हे उपवासाचे काही कॉमन पदार्थ आहेत. उपवासाचा कोणताही पदार्थ करायचा म्हटलं की हे पदार्थ आवर्जून वापरले जातात(Fasting Special Recipe).
साबुदाण्याचा चिवडा, खिचडी, वरईचा भात, राजगिऱ्याच्या लाडू, चिक्की असे अनेक पदार्थ उपवासाला खाल्ले जातात. खरंतर उपवासाचे हे सगळे पदार्थ नेहमीचेच आहेत, आणि हे पदार्थ सारखेच खाऊन कंटाळा येतो. अशावेळी उपवासाला (How To Make Rajgira Halwa) काहीतरी वेगळं गोडधोड खायचं असेल तर राजगिऱ्याच्या पिठाचा झटपट तयार होणारा हलवा तयार करु शकता. या राजगिऱ्याच्या हलव्याची चव अतिशय भारी लागते तसेच तो खाल्ल्याने आपल्याला उपवासादरम्यान ऊर्जाही मिळते. राजगिऱ्याच्या हलवा तयार करण्याची सोपी रेसिपी पाहूयात(Navratri Special Rajgira Halwa Recipe).
साहित्य :-
१. तूप - ५ ते ६ टेबलस्पून २. राजगिऱ्याचे पीठ - १ कप ३. दूध - १ लिटर ४. साखर - १ कप ५. मनुका - १ टेबलस्पून ६. वेलीची पूड - १/२ टेबलस्पून ७. ड्रायफ्रुट्सचे काप - १ ते २ टेबलस्पून ८. गुलाबाच्या पाकळ्या - ५ ते ६ (सुकलेल्या पाकळ्या)
नवरात्र उपवास स्पेशल : प्या ‘ही’ उपवास स्मूदी-पोटही भरेल आणि डिहायड्रेशनही होणार नाही...
कृती :-
१. सगळ्यात आधी एका मोठ्या कढईत तूप घेऊन ते मंद आचेवर वितळवून घ्यावे. २. आता या हलकेच गरम झालेल्या तूपात राजगिऱ्याचे पीठ घालावे. आता या राजगिऱ्याच्या पिठाला थोडासा डार्क गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत मंद आचेवर तुपात परतून घ्यावे. तूप आणि राजगिऱ्याचे पीठ सतत चमच्याने हलवत राहावे. ३. या मिश्रणाला गोल्डन ब्राऊन रंग आल्यानंतर यात गरम दूध ओतावे. हलव्याची कन्सिस्टंसी तुम्हाला जशी हवी त्या प्रमाणात हळुहळु दूध घालावे.
साबुदाणा वडा तेलात फट्कन फुटतो-उडतं अंगावर तेल? ५ चुका टाळा- भाजणारही नाही...
४. दूध घातल्यानंतर ते दूध चांगले आटवून घ्यावे. दूध घातल्यावर हलवा सतत चमच्याने हलवत राहावा. ५. दूध आटून हलवा थोडासा घट्टसर झाल्यावर त्यात साखर घालावी. आता ही साखर संपूर्णपणे त्या हलव्यात एकजीव करून घ्यावी. त्यानंतर त्यात मनुका वेलीची पूड, ड्रायफ्रुट्सचे काप घालावेत. ६. आता हा हलवा मंद आचेवर शिजवून घ्यावा. जोपर्यंत या हलव्यातील तूप सुटून ते वेगळे होत नाही तोपर्यंत चमच्याने हलवत राहावे. ७. हलव्यातील तूप सुटून ते वेगळे झाल्यानंतर गॅस बंद करून हलवा खाण्यासाठी सर्व्ह करावा.
गरमागरम हलवा सर्व्ह करताना त्यावर आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्सचे काप व सुकवून घेतलेल्या गुलाबाच्या पाकळ्या घालाव्यात.