नवरात्रीचे नऊ दिवस जर उपवास असेल तर उपवासाचे अनेक पदार्थ खाल्ले जातात. उपवासाला बहुतेक घरात साबुदाण्याचेचे पदार्थ फार मोठ्या प्रमाणावर तयार केले जातात. काहीवेळा साबुदाण्याचे वडे, खिचडी असे नेहमीचे तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा येतो. अशावेळी काहीतरी वेगळा नवीन पदार्थ तयार करावा आणि खावा अशी मनोमन इच्छा होते. परंतु घरातील काम, रोजची घाई गडबड यात उपवासाला रोज कोणता नवीन पदार्थ तयार करावा हे सुचतच नाही.
कुठला नवीन पदार्थ करायचा म्हटलं की त्याची बेसिक (How to make Sago Paratha For Fasting) तयारी देखील करावी लागते. वेळ काढून, तयारी करुन कोणता उपवासाचा नवीन पदार्थ केला आणि जर तो फसला तर फारच हिरमोड होतो, आणि पुन्हा तेच ते साबुदाण्याचे (Navratri Special Sabudana ka Paratha) नेहमीचे पदार्थ खावे लागतात. यासाठी उपवासाच्या वेळी खाण्यासाठी कोणतातरी झटपट तयार होईल इन्स्टंट पदार्थ (Vrat Special Sabudana Aloo Paratha) असावा असे वाटते. अशावेळी आपण आहे त्याच साबुदाण्याचा वापर करून पटकन तयार होणारा उपवासाचा पराठा करु शकतो. घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यात उपवासाचा पराठा चटकन कसा करावा, याची सोपी रेसिपी पाहूयात(upvasache sabudana paratha recipe).
साहित्य :-
१. साबुदाणा - १ कप २. बटाटे - २ (उकडलेले बटाटे)३. जिरे - १/२ टेबसलस्पून ४. मीठ - चवीनुसार ५. कोथिंबीर - २ टेबलस्पून (बारीक चिरलेली)६. हिरव्या मिरचीची पेस्ट - २ टेबलस्पून ७. चिली फ्लेक्स - १/२ टेबलस्पून ८. तेल - १ टेबसलस्पून ९. तूप - १ टेबलस्पून
चव साबुदाणा वड्याचीच पण खायचे मात्र साबुदाणा आप्पे-उपवासाला खा कमी तेलातील चमचमीत पदार्थ...
कृती :-
१. सगळ्यातआधी एका पॅनमध्ये साबुदाणे घालून ते ४ ते ५ मिनिटे कोरडे भाजून घ्यावेत. भाजून घेतलेले साबुदाणे थोडे थंड झाल्यावर मिक्सरमध्ये घालूंन त्याची बारीक पूड होईपर्यंत व्यवस्थित वाटून घ्यावे. २. ही मिक्सरमध्ये वाटून घेतलेली साबुदाण्याची पूड एका बारीक चाळणीने गाळून घ्यावी. साबुदाण्याचे पीठ चाळून घेतल्यानंतर त्यात उकडलेले बटाटे मॅश करून घालावेत. त्यानंतर त्यात जिरे, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरव्या मिरचीची पेस्ट, चिली फ्लेक्स घालूंन पीठ मळून घ्यावे. पीठ मळून झाल्यानंतर ते १० ते १५ मिनिटे झाकून ठेवावे.
नवरात्र स्पेशल : राजगिऱ्याचा हलवा करा फक्त १० मिनिटांत, १ कप पिठाचा पोटभर खाऊ!
३. १५ मिनिटानंतर या पिठाचे छोटे गोळे करुन चपातीप्रमाणेच गोलाकार पराठे लाटून घ्यावेत. पराठे लाटताना साबुदाण्याचे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेल्या पिठाचा वापर करावा. ४. आता पॅनला तेल लावून त्यावर हा पराठा घालून तो दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्यावा. कडेने थोडेसे तूप सोडून पराठा मंद आचेवर भाजून घ्यावा.
अशाप्रकारे उपवासाचा पराठा खाण्यासाठी तयार आहे. हा गरमागरम पराठा आपण दह्यासोबत खाण्यासाठी सर्व्ह करु शकता.