Join us  

मऊ, जाळीदार उपवासाचा ढोकळा घरीच करा; २ जिन्नस वापरून बनेल चविष्ट नाश्ता-सोपी रेसिपी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 11:43 AM

Upas Dhokla Marathi Recipe (Upvasacha Dhokla Kasa karava) : हा ढोकळा बनवण्यासाठी तुम्हाला जास्तवेळ लागणार नाही. फक्त २ पदार्थ वापरून चवदार नाश्ता बनवू शकता.

उपवासाच्या (Navratri) दिवसांत नेहमी नेहमी साबुदाणा, वरीचे तांदूळ साध्या पद्धतीने बनवले गेले तर खावंस वाटत नाही. साबुदाणा वडा, वरीचे डोसे बनवण्यात खूपच वेळ जातो आणि पदार्थ बिघडतात म्हणून अनेकजण हे पदार्थ बनवणं टाळता. उपवासाच्या  वेळेस नाश्त्याला खाण्यासाठी तुम्ही उपवासाचा ढोकळा ट्राय करू शकता. (How to make upwasacha dhokla) हा ढोकळा बनवण्यासाठी तुम्हाला जास्तवेळ लागणार नाही. फक्त २ पदार्थ वापरून चवदार नाश्ता बनवू शकता. (Fasting Dhokla Recipe)

१) उपवासाचे ढोकळे बनवण्यासाठी तुम्हाला फार काही करावं लागणार नाही. अगदी कमीत कमी वेळात हे ढोकळे तयार होतील. हे ढोकळे बनवण्यासाठी सगळ्यात आधी २०० ग्राम  भगर आणि १०० ग्राम साबुदाणे घ्या. मग  दोन्ही पदार्थ वेगवेगळे वाटून घ्या. साबुदाणा सुद्धा व्यवस्थित बारीक दळून घ्या. (Sabudana Dhokla Recipe How to Make Upwas ka Dhokla)

२) दोन्ही पदार्थ एकत्र करून यात पाणी आणि दही घाला.  कधी कधी दही जास्त घट्ट असतं तर कधी जास्त पातळ जर दही जास्त घट्ट असेल गरजेनुसार अजून पाणी घाला. यात १ टिस्पून आल्याची पेस्ट, हिरव्या मिरचीची पेस्ट घाला. त्यात चवीनुसार मीठ घाला. जर तुम्ही साधं मीठ खात नसाल तर यात सैंधव मीठ घालू शकता.

१ वाटी साबुदाणाचा पटकन बनेल खमंग नाश्ता; उपवासाची एकदम सोपी, नवी रेसिपी-चवीला भारी

३) हे मिश्रण एकजीव केल्यानंतर जास्त कोरडे वाटत असेल तर तुम्ही पाणी घालून व्यवस्थित मिक्स करू शकता. परफेक्ट कंसिटंन्सीसाठी हा उत्तम उपाय आहे.  यात १ टेबलस्पून तेल घाला आणि १५ मिनिटांसाठी झाकून ठेवून द्या.  ढोकळ्याच्या कुकरमध्ये किंवा एका भांड्याला व्यवस्थित ग्रीस करून त्याला तेल लावून घ्या. दुसरीकडे पाणी उकळण्यासाठी ठेवा. पाणी उकळं की थोड्यावेळासाठी गॅस मंद आचेवर ठेवा. 

४) ढोकळ्याच्या बॅटरमध्ये इनो घालून व्यवस्थित एकजीव करून घ्या त्यानंतर ढोकळ्याचं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या.  इनो घातल्यानंतर वेळ न घालवता लगेचच ढोकळ्याचे बॅटर  ढवळून घ्या. मग ढोकळ्याचे बॅटर ट्रेमध्ये किंवा ढोकळ्याच्या डब्यात घालून १० ते १५ मिनिटांसाठी वाफवून  घ्या.

५) फोडणी देण्यासाठी एका भांड्यात तेल गरम करून त्यात जीरं, हिरवी मिरची आणि पाणी घाला. ढोकळ्याचे चौकोनी काप करून घ्या.  तयार पाणी ढोकळ्यांच्या कापांवर घालून गरमागरम मऊ, स्पॉन्जी ढोकळा सर्व्ह करा. 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सनवरात्रीगरबाअन्नशारदीय नवरात्रोत्सव 2023