Lokmat Sakhi >Food > नाश्त्याला झटपट, चटपटीत काही हवे? करा रवा बेसन टोस्ट- चव आणि पोषण दोन्ही भरपूर

नाश्त्याला झटपट, चटपटीत काही हवे? करा रवा बेसन टोस्ट- चव आणि पोषण दोन्ही भरपूर

रवा बेसन टोस्ट हा पदार्थ करायला सोपा, पचायला उत्तम, चवीला जबरदस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2022 06:46 PM2022-09-05T18:46:31+5:302022-09-05T18:53:08+5:30

रवा बेसन टोस्ट हा पदार्थ करायला सोपा, पचायला उत्तम, चवीला जबरदस्त

Need something quick and spicy for breakfast? Make semolina gram toast – rava besan toast rich in both taste and nutrition | नाश्त्याला झटपट, चटपटीत काही हवे? करा रवा बेसन टोस्ट- चव आणि पोषण दोन्ही भरपूर

नाश्त्याला झटपट, चटपटीत काही हवे? करा रवा बेसन टोस्ट- चव आणि पोषण दोन्ही भरपूर

Highlightsखमंग कुरकुरीत रवा बेसन टोस्ट.

काहीतरी तिखट, चमचमीत पण फार झटपट होणारं खायचं असेल तर हा पदार्थ उत्तम आहे. वेळ न दवडता करा आणि पोटभर खा. रव्याचा उपमा,डोसा आपल्याला माहितेय, बेसनाचे तर असंख्य प्रकार होतात, तसाच ब्रेड पण. हे त्रिकुट स्वयंपाकघरात असले की अनेक नव्या गोष्टी आपण करू शकतो, एकसारखे पदार्थ खाणे हे निश्चितच वैताग आणते, त्यामुळं साहित्य नेहमीचेच पण पदार्थ वेगळा असे कसे करता येईल हे जुळलं की मग कल्पनाशक्ती लावून अफलातून आयटम अवतरतात. तर तसाच हा पदार्थ. रवा बेसन टोस्ट.

(Image : Google)

साहित्य खरंतर तुमच्या आवडीप्रमाणे जे हवे ते.
ब्रेड-कडा काढायच्या नाहीत. बेसन -अर्धी वाटी, रवा-पाव वाटी, हवं तर तांदूळ पीठ पण वापरू शकता. यात घालण्यासाठी
हिरवी मिरची/कोथिंबीर/आले,हळद,मीठ,किंचित साखर,हिंग,ओवा (ऐच्छिक, बेसन पचत नसेल तर)
यात आणखीन घालता येण्यासारखे पदार्थ
चिरलेली मेथी/पालक/गाजर/किसलेले चीझ

कृती

बेसन आणि रवा एकत्र करून त्यात आले मिरची आणि जे काही घालायचेय ते सर्व घालून व्यवस्थित एकत्र करून घेणे
त्यात हळूहळू गार पाणी घालणे, मिश्रण फार पातळ अथवा एकदम घट्ट असता नये,साधारण सरसरीत हवे,ब्रेड तुकड्याला चिकटेल असें.
पॅन अथवा तव्यावर बटर/तेल गरम करावे
ब्रेड तुकडे मिश्रणात बुडवून तव्यावर गरम तेलात दोन्ही बाजूने लालसर करावेत,सॉस बरोबर द्यावे.,
जे पीठ उरेल ते शेवटच्या ब्रेड तुकड्यावर ओतून सम्पवून टाकावे,हा प्रकार तळणीचा नाही. शॅलो फ्राय करायचे आहे.
खमंग कुरकुरीत लागतात. करुन पाहा रवा बेसन टोस्ट.
 

Web Title: Need something quick and spicy for breakfast? Make semolina gram toast – rava besan toast rich in both taste and nutrition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न