Join us  

वयाच्या साठीतही नीतू कपूर दिसतात तरुण-जिंदादिल; सांगतात त्यांचं ओटमील रेसिपी सिक्रेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2022 11:56 AM

Neetu Kapoor's oatmeal recipe is the secret to her beauty at the age of 64 : नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी आपल्या आहारातीलही काही खास गोष्टी शेअर केल्या, त्याविषयी...

ठळक मुद्देआता ओटस तर आपण सगळेच खातो पण नीतू कपूर असे काय खास करतात की त्यामुळे त्यांच्या फिटनेसवर चर्चा व्हावी आपल्या आवडीप्रमाणे व्हॅनिला इसेन्स, सुकामेव्यातील तुम्हाला आवडतील त्या गोष्टी तुम्ही घालू शकता.  

प्रसिद्ध अभिनेत्री नीतू कपूर म्हणजेच अभिनेता रणबीर कपूर याची आई आणि अभिनेत्री आलिया भट हिची सासू. वयाच्या ६४ व्या वर्षीही त्यांचे सौंदर्य एखाद्या तरुणीला लाजवेल असे आहे. अभिनेत्री म्हणून त्यांना फिट आणि फाईन राहावे लागत असले तरी नीतू कपूर आपल्या फिटनेसची आणि सौंदर्याची कायमच विशेष काळजी घेताना दिसतात. लवकरच आलिया आणि रणबीर यांच्या बाळाची आजी म्हणून त्यांचे प्रमोशन होणार असले तरी त्या अजिबातच आजीप्रमाणे दिसत नाहीत. याचं कारण म्हणजे त्या नियमीतपणे व्यायाम करतात. इतकेच नाही तर नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी आपल्या आहारातीलही काही खास गोष्टी शेअर केल्या (Neetu Kapoor’s Oatmeal Recipe is the Secret to her Beauty at the age of 64).

(Image : Google)

‘जुग जुग जियो’ या सिनेमातून त्या लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटासाठी त्यांनी आपले वजन कमी केले असून ते पडद्यावर आपल्या सगळ्यांनाच दिसू शकेल. मात्र या वयातही इतकं फिट राहण्यासाठी त्या नेमकं काय करतात असा प्रश्न आपल्याला साहजिकच पडला असेल. तर नीतू कपूर आपल्या आहारात ओटमीलचा समावेश करतात. आता ओटस तर आपण सगळेच खातो पण नीतू कपूर असे काय खास करतात की त्यामुळे त्यांच्या फिटनेसवर चर्चा व्हावी ते पाहूयात. 

साहित्य -

१. बदामाचं दूध - १ कप २. ओटस - अर्धा कप३. खजूर - १ किंवा २ बिया ४. मनुके - ७ ते ८

(Image : Google)

कृती -

१. एक पॅन घेऊन त्यामध्ये बदामाचं दूध घालायचं, तुम्हाला बदाम दूध नको असेल तर वेगन प्रकारातील दुसरं कोणतंही दूध तुम्ही वापरु शकता. २. हे दूध चांगले उकळले की गॅस बारीक करुन त्यामध्ये ओटस घालावेत. ३. एक मिनीटभर ओटस दुधात चांगले हलवावेत आणि गॅस बंद करावा. ४. यामध्ये चिरलेला खजूर आणि मनुके घालून ते खावे. ५. बाऊलमध्ये हे तयार करुन ते गार करुनही आपण डेझर्टसारखे ते खाऊ शकतो. ६. यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे व्हॅनिला इसेन्स, सुकामेव्यातील तुम्हाला आवडतील त्या गोष्टी तुम्ही घालू शकता.   

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.फिटनेस टिप्स