Lokmat Sakhi >Food > भारती सिंगला आवडते तशी नेपाळी पद्धतीची तिळाची चटणी खाऊन तर पाहा, हिवाळ्यातली झणझणीत मजा...

भारती सिंगला आवडते तशी नेपाळी पद्धतीची तिळाची चटणी खाऊन तर पाहा, हिवाळ्यातली झणझणीत मजा...

Nepali Til Ki Chutney : Bharti Singh Viral Nepali Til ki Chutney : Bharti Singh's favorite Nepali TILL KI Chutney : Viral healthy Bharti singh's til chutney : Sesame Seeds Chutney : हिवाळ्यात आवर्जून खायलाच हवी अशी नेपाळी स्टाईल तिळाची चटणी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2025 18:10 IST2025-01-24T17:58:39+5:302025-01-24T18:10:25+5:30

Nepali Til Ki Chutney : Bharti Singh Viral Nepali Til ki Chutney : Bharti Singh's favorite Nepali TILL KI Chutney : Viral healthy Bharti singh's til chutney : Sesame Seeds Chutney : हिवाळ्यात आवर्जून खायलाच हवी अशी नेपाळी स्टाईल तिळाची चटणी...

Nepali Til Ki Chutney Bharti Singh Viral Nepali Til ki Chutney Bharti Singh's favorite Nepali TILL KI Chutney Viral healthy Bharti singh's til chutney | भारती सिंगला आवडते तशी नेपाळी पद्धतीची तिळाची चटणी खाऊन तर पाहा, हिवाळ्यातली झणझणीत मजा...

भारती सिंगला आवडते तशी नेपाळी पद्धतीची तिळाची चटणी खाऊन तर पाहा, हिवाळ्यातली झणझणीत मजा...

हिवाळ्यात आपण शक्यतो शरीराला उबदारपणा किंवा उष्णता मिळवून देणारे अनेक पदार्थ खातो. या पदार्थांमध्ये तिळाचा देखील समावेश होतो. थंडीच्या दिवसांत आपण सफेद किंवा काळ्या तिळापासून तयार केलेले अनेक पदार्थ खातो. तिळाचे लाडू, तिळाचा गोड हलवा, तिळाची वडी असे वेगवेगळे पदार्थ खातो. आकाराने अगदीच लहान असलेले तीळ (Nepali Til Ki Chutney) पौष्टिक बिया म्हणून ओळखले जातात. हे तीळ आणि तिळाचे पदार्थ फक्त सणांपुरतेच (Bharti Singh Viral Nepali Til ki Chutney ) मर्यादित नसतात. रोजच्या आहारात मर्यादित प्रमाणात तिळ खाणं महत्त्वाचं मानलं जातं. तीळ त्वचेसारख्या नाजूक घटकाचं संरक्षण करण्यापासून ते हदयासारख्या शरीरातील महत्त्वाच्या अवयवाचं आरोग्य सुरक्षित करण्यासाठी महत्त्वाचे असतात. या पदार्थांमुळे शरीराला ऊर्जा मिळायला मदत होते आणि शरीराचे पोषणही होते(Viral healthy Bharti singh's til chutney).

हवेत असणाऱ्या गारठ्यामुळे शरीराची जास्त ऊर्जा खर्च होत असल्याने आहाराच्या माध्यमातून शरीराला ती ऊर्जा मिळवावी लागते, यासाठी तीळ खाणे आवश्यक असते. सुप्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग ही सतत आपल्या इंस्टाग्राम (Bharti Singh's favorite Nepali TILL KI Chutney) अकाउंटवरुन काही ना काही हेल्दी रेसिपी शेअर करत असते. नुकतेच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून नेपाळी स्टाईलने तिळाची पौष्टिक चटणी कशी तयार करायची याची साधीसोपी रेसिपी शेअर केली आहे. नेपाळी स्टाईलने तिळाची चटणी कशी करायची याची रेसिपी पाहूयात. 

साहित्य :- 

१. सफेद तीळ - १ कप 
२. लाल सुक्या मिरच्या - ५ ते ६ सुक्या लाल मिरच्या 
३. लसूण पाकळ्या - ५ ते ६ पाकळ्या 
४. आलं - १ इंचाचा छोटा तुकडा
५. मीठ - चवीनुसार 
६. पुदिना - १/२ कप 
७. कोथिंबीर - १/२ कप 
८. टोमॅटो पल्प - १ कप 
९. पाणी - गरजेनुसार 
१०. चिंचेचा कोळ - ३ ते ५ टेबसलस्पून 
११. हिरव्या मिरच्या - २ ते ३ मिरच्या 
१२. मेथी दाणे - १ टेबलस्पून 
१३. तेल - गरजेनुसार 

पारंपरिक हुरडा थालीपीठ आवडतं, ‘असं’ हुरडा धिरडंही करुन पाहा, पोटभर-पौष्टिक खाण्याचं सुख...


क्षिती जोगला फार आवडते आजीच्या हातचे आंबट वरण! पाहा आंबट वरणाची पारंपरिक रेसिपी...

कृती :- 

१. सगळ्यात आधी एका पॅनमध्ये सफेद तीळ आणि लाल सुक्या मिरच्या एकत्रित करून कोरड्या भाजून घ्याव्यात. तिळाचा रंग बदलून हलका गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तीळ आणि मिरच्या भाजून घ्यावेत. त्यानंतर हे मिश्रण थोडे थंड होण्यासाठी ठेवून द्यावे. 
२. आता एका मिक्सरच्या भांड्यात लसूण पाकळ्या, आलं, चवीनुसार मीठ, कोरडे भाजून घेतलेले सफेद तीळ आणि लाल सुक्या मिरच्या, पुदिना, कोथिंबीर, शिजवून घेतलेल्या टोमॅटोचा पल्प, चिंचेचा कोळ, गरजेनुसार पाणी घालावे. 

३. त्यानंतर मिक्सरमधील सगळे जिन्नस एकत्रितपणे वाटून त्याची चटणी तयार करून घ्यावी. 
४. आता ही तयार चटणी एका बाऊलमध्ये काढून घ्यावी. 
५. सगळ्यात शेवटी एका भांड्यात थोडे तेल घेऊन त्यात मेथीचे दाणे व हिरव्या मिरच्या घालून खमंग फोडणी तयार करून घ्यावी. ही खमंग गरम फोडणी तयार चटणी वर ओतून चटणीला मस्त फोडणी द्यावी. 

नेपाळी स्टाईलने खमंग अशी तिळाची चटणी खाण्यासाठी तयार आहे. ही चटणी आपण जेवणात तोंडी लावायला म्हणून देखील खाऊ शकता. यासोबतच इडली, डोसा, चपाती, भात यांसारख्या पदार्थांसोबत देखील खाऊ शकता.

Web Title: Nepali Til Ki Chutney Bharti Singh Viral Nepali Til ki Chutney Bharti Singh's favorite Nepali TILL KI Chutney Viral healthy Bharti singh's til chutney

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.