Join us  

मिक्सरमध्ये २ मिनिटांत कणिक भिजवण्याची सोपी ट्रिक, बघा झटपट सोपा पर्याय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2023 2:37 PM

How To Make Roti Dough With A Mixer : सकाळच्या कामाच्या घाई, गडबडीत कणिक मळायला वेळ नाही ? कणिक मळण्यासाठी आता वापरा एक सोपी भन्नाट ट्रिक...

सकाळी उठून घरातल्यांच्या डब्यांसाठी चपात्यांचे पीठ मळणे हे सगळ्या गृहिणींसाठी अगदी कंटाळवाणे काम असते. मुळात काही गृहिणींना चपातीचे पीठ मळणे, चपात्या लाटणे यासारखे कठीण आणि वेळखाऊ काम अजिबात आवडत नाही. रोज कितीही टाळायचे म्हटले तरीही टाळता येत नाही कारण चपाती हा आपल्या रोजच्या आहारातील एक मुख्य पदार्थ आहे. काही घरांत तर रोजच्या जेवणात चपाती ही लागतेच, चपाती शिवाय काहीजणांचा घासच जात नाही, अशावेळी गृहिणींना चपाती करण्याशिवाय काहीही पर्याय नसतो. चपाती ही खायला कितीही पौष्टिक असली तरीही ती बनवण्यासाठी आधी कणिक मळावी लागते. त्यानंतर चपात्या लाटाव्या लागतात, मग त्या भाजून घ्यायच्या. या एवढ्या सगळ्यात काहीवेळा घाई, गडबडीत पीठ व्यवस्थित मळले गेले नाही तर चपात्या वातड, किंवा कडक होतात. अशा चपात्या खाण्यायोग्य बनत नाहीत. 

चपात्या मऊ, लुसलुशीत, टम्म फुगलेल्या बनवायच्या असतील तर मुख्य कणिक योग्य पद्धतीने भिजवावी लागते. आपल्यापैकी काही महिला कणिक भिजवण्यासाठी फूड प्रोसेसर सारख्या मशीनचा वापर करतात. या मशिन्स खास कणिक भिजवण्यासाठीच तयार केलेल्या असतात. त्याचबरोबर अशा मशीन्समध्ये कणिक अगदी ५ मिनिटांत लगेच मळून तयार हातात मिळते. ही मळलेली कणिक घेऊन आपण चटकन चपात्या बनवू शकतो. परंतु सगळ्यांकडेच कणिक मळायचे असे मशीन असेलच असे नाही. तर अशावेळी आपण आपल्या घरात असणाऱ्या मिक्सरचा वापर करून अगदी क्षणांत कणिक मळू शकतो. मिक्सरचा वापर करून कणिक नेमकी कशी मळावी याची एक सोपी ट्रिक पाहूयात(New method of kneading the roti dough in 1 minute, How to knead super soft dough).

मिक्सरचा वापर करून अगदी काही मिनिटांतच कणिक मळा... 

१. मिक्सरमध्ये कणिक मळण्यासाठी सर्वप्रथम मिक्सरचे आकाराने मोठे असणारे भांडे घ्यावे.     २. आता या भांड्यात आपल्याला हवे तेवढे गव्हाचे पीठ ओतून घ्यावे. 

रोज चपात्या करायचा कंटाळा येतो? १ सोपी इन्स्टंट ट्रिक... चपात्या होतील झटपट...

३. त्यानंतर या गव्हाच्या पिठात गरजेनुसार पाणी व तेल घालावे. 

४. आता मिक्सरचे झाकण लावून मिक्सर सुरु करावा. मिक्सर आधी हळूहळू फिरवून घ्यावे. मिक्सरच्या वेग एकदम एकाचवेळी जास्त प्रमाणात वाढवू नये. 

मास्टरशेफ पंकज भदौरिया सांगतात नारळ फोडण्याची १ सोपी ट्रिक, नारळ फोडण्याचं अवघड काम होईल सोपं...

सुके खोबरे खवट होते, काळे पडते ? २ उपाय, खोबरे टिकेल भरपूर...

५. मिक्सरच्या भांड्यात हळूहळू पिठाचा गोळा तयार होताना दिसेल. गरज असल्यास आपण यात पाणी घालू शकतात. 

६. गरजेनुसार पाणी घातल्यानंतर मीठ एकत्रित होऊन मळून त्याचा गोळा तयार होताना दिसेल. 

७. कणिक संपूर्णपणे मळून झाल्यानंतर, मिस्कर मधून कणकेचा गोळा बाहेर काढून घ्यावा. त्यानंतर आवश्यकतेनुसार, त्याला तेल लावून घ्यावे. 

८. या तयार कणकेचे छोटे - छोटे गोळे तयार करून मग नेहमीप्रमाणे चपात्या लाटून घ्याव्यात. 

डाळ शिजवताना येणारा पांढरा फेस काढावा की काढू नये ? पाहा नेमका हा फेस असतो तरी कसला...

अशाप्रकारे आपण घाई - गडबडीच्यावेळी झटपट मिक्सरमध्ये पीठ मळून त्याची कणिक तयार करून चपात्या तयार करु शकतो.

टॅग्स :अन्नकिचन टिप्स