Join us  

New Year : थर्टी फर्स्टच्या पार्टीला करा स्पेशल ढाबा स्टाईल ‘पंजाबी छोले’, घ्या परफेक्ट पारंपरिक रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2022 7:39 PM

Punjabi Dhaba Style Chole Recipe कोण म्हणतं घरी पंजाबी - ढाबा स्टाईल छोले करताच येत नाही, ती टेस्टच जमत नाही, ही घ्या रेसिपी.

सण, कार्यक्रम, अथवा पार्टी म्हंटलं की आपल्याला अनेक लज्जतदार पदार्थ आठवतात. मात्र, झटपट आणि चमचमीत पदार्थ खायची इच्छा होत असेल तर, आपण छोले - भटुरे हा पदार्थ घरी ट्राय करतो. घरच्या सदस्यांना आवडणारा हा पदार्थ चवीला तर उत्तम लागतोच यासह पार्टीची देखील रंगत वाढवतो.

पंजाबी छोले ही अतिशय साधी - सोपी रेसिपी आहे. घरामध्ये सहज आढळणाऱ्या सामग्रींपासून ही डिश काही मिनिटांमध्ये तयार केली जाऊ शकते. ही डिश आपण भटुरा, नान, भात किंवा पोळीसोबतही आस्वाद घेऊ शकता. चला तर मग हा पदार्थाची कृती जाणून घेऊयात.

चमचमीत छोले बनवण्यासाठी लागणारं साहित्य

१ कप काबुली चणे 

टी बॅग 

कांदा

१ कप टोमॅटो पेस्ट

लसूूण पेस्ट

आल्याची पेस्ट

शेंगदाण्याचे तेल

आवश्यकतेनुसार पाणी

हिरव्या मिरच्या

जिरे

दालचिनी

वेलची

तेजपत्ता

लवंग

हिरवी वेलची

तूप

मीठ

हळद

हिंग

तिखट पावडर

कसूरी मेथी पावडर

सुक्या आंब्याची पावडर

कोथिंबीर पेस्ट

कृती

सर्वप्रथम, एक कप छोले रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. यानंतर प्रेशर कुकरमध्ये भिजलेले छोले, अर्धा कप चहाचा काढा, तेजपत्ता, मोठा वेलदोडा, दालचिनीचा तुकडा, वेलची, लवंग आणि थोडं पाणी एकत्र भांड्यात मिक्स करा. आणि सर्व मिश्रण सहा ते सात शिट्ट्या येईपर्यंत शिजवून घ्या.

दुसरीकडे पॅनमध्ये तेल गरम करा. तेलामध्ये कांद्याची पेस्ट घाला आणि तीन ते चार मिनिटांसाठी सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या. यानंतर लसूण- आल्याची पेस्ट मिक्स करा आणि सामग्री दोन मिनिटांसाठी भाजून शिजवून घ्या.

कांद्याची पेस्ट भाजून झाल्यानंतर त्यात टोमॅटोची पेस्ट टाका. थोड्या वेळानंतर हिंग, हळद, लाल तिखट, धणे पूड आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण ३-४ मिनिटे शिजवा.

छोले शिजल्यानंतर प्रेशर कुकरमधील गरम मसाला बाहेर काढावा. यानंतर कुकरमध्ये पॅनमधील मसाला मिक्स करावा. सर्व मिश्रण नीट एकजीव करून घ्या.

दुसऱ्या भांड्यामध्ये तूप गरम करत ठेवा. लसूण- हिरव्या मिरच्या तेलात मिक्स करा. यानंतर जिरे घाला व सर्व सामग्री फ्राय करून घ्या. व हे मिश्रण छोलेंवर घाला. शेवटी आपण छोले मसाला देखील घालू शकता. अशा प्रकारे ढाबा स्टाईल गरमागरम पंजाबी छोल्यांचा आस्वाद घ्यायला रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स