Lokmat Sakhi >Food > New year special : घरच्याघरी करा भरपूर केळी वेफर्स, कुरकुरीत - ताजे वेफर्स करण्याची सोपी रेसिपी, पार्टी होईल मस्त...

New year special : घरच्याघरी करा भरपूर केळी वेफर्स, कुरकुरीत - ताजे वेफर्स करण्याची सोपी रेसिपी, पार्टी होईल मस्त...

Homemade Raw Banana Chips Recipe : कच्च्या केळ्याचे अतिशय कुरकुरीत, चटकदार, पातळ व तळलेले वेफर्स घरी करणे आता सोपे झाले आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2022 11:36 AM2022-12-29T11:36:34+5:302022-12-29T11:50:00+5:30

Homemade Raw Banana Chips Recipe : कच्च्या केळ्याचे अतिशय कुरकुरीत, चटकदार, पातळ व तळलेले वेफर्स घरी करणे आता सोपे झाले आहे.

New year special: Make lots of banana wafers at home, easy recipe to make crispy fresh wafers, news party will be great | New year special : घरच्याघरी करा भरपूर केळी वेफर्स, कुरकुरीत - ताजे वेफर्स करण्याची सोपी रेसिपी, पार्टी होईल मस्त...

New year special : घरच्याघरी करा भरपूर केळी वेफर्स, कुरकुरीत - ताजे वेफर्स करण्याची सोपी रेसिपी, पार्टी होईल मस्त...

वेफर्स हा जगभरातील सर्व वयोगटांतील व्यक्तींचा आवडता पदार्थ आहे. आपल्याला सगळ्यांना बटाट्याचे वेफर्स, केळीचे वेफर्स, विविध चवींचे वेफर्स किंवा विविध प्रकारच्या फ्रेंच फ्राईज खायला खूप आवडते. एकदा वेफर्स खायला सुरुवात केल्यावर कोणीही स्वत:ला थांबवू शकत नाही, ही वस्तुस्थितीदेखील सगळेच मान्य करतील. आपल्याकडे संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी, लहान मुलांना खाऊच्या डब्ब्यात देण्यासाठी म्हणून हे वेफर्स सहज खाल्ले जातात. सहलीला किंवा बाहेरगावी जाताना चिवडा, वेफर्स असे पदार्थ आवर्जून सोबत नेले जातात. वेफर्ससाठी लागणाऱ्या केळींचे उत्पादन हे केरळमध्ये जास्त होते. त्यामुळे हे केळ्यांचे वेफर्स बनविण्याचे जास्त प्रमाण केरळमध्ये आहे. कोणत्याही प्रकारचे कृत्रिम रंग, कृत्रिम चव यांचा वापर न करता नैसर्गिक व पारंपरिक पद्धतींचा वापर करून हे वेफर्स तयार केले जातात. केरळची ही अनोखी पाककृती आता तुम्ही घरच्या घरी झटपट करू शकता. कच्च्या केळ्याचे अतिशय कुरकुरीत, चटकदार, पातळ व तळलेले वेफर्स घरी करणे आता सोपे झाले आहे. कच्च्या केळ्यापासून हे वेफर्स कसे तयार करायचे हे समजून घेऊयात(Homemade Raw Banana Chips Recipe).

साहित्य - 

१. कच्ची केळी - ४
२. नारळाचे तेल - ३ कप (तळण्यासाठी)
३. हळद - १ टेबलस्पून 
४. लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून 
५. मीठ - आवडीनुसार 

कृती - 

१. सर्वप्रथम कच्ची केळी स्वच्छ धुवून त्यावरची साल काढून घ्या. मग या कच्च्या केळीचे वेफर्सच्या आकाराचे काप करून घ्या. 
२. एका भांड्यात पाणी घेऊन त्यात हळद, मीठ घालून मग सगळे काप त्यात घालून ५ मिनिटे तसेच बुडवून ठेवा. 


३. ५ मिनिटांनंतर त्या भांड्यातील पाणी ओतून द्या व कच्च्या केळीचे काप एका वेगळ्या डिशमध्ये काढून घ्या. (लक्षात ठेवा संपूर्ण पाणी नितळून जाऊ द्यात.)  
४. एका कढईत नारळाचे तेल घ्या. हे तेल चांगले गरम झाले आहे याची खात्री करून मगच त्यात हे काप तळण्यासाठी सोडा. 


५. हे केळ्याचे वेफर्स हलकेच सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस तळून घ्या.
६. कढईतून तळून काढल्यानंतर हे वेफर्स टिशू पेपरवर काढा. यामुळे वेफर्समधील जास्तीचे तेल शोषून घेतले जाईल.         


७. या वेफर्सवर चवीनुसार मीठ व लाल मिरची पावडर भुरभुरून घ्या. हलक्या हाताने हे वेफर्स हलवून घ्या जेणेकरून मीठ व लाल मिरची पावडर सगळ्या वेफर्सना व्यवस्थित लागेल. 

हे लक्षात ठेवा - 

१. हे वेफर्स थंड झाल्यावर एका हवाबंद डब्ब्यात किमान एक आठवड्यापर्यंत स्टोअर करून ठेवू शकता.

 

Web Title: New year special: Make lots of banana wafers at home, easy recipe to make crispy fresh wafers, news party will be great

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न