Lokmat Sakhi >Food > १७००० रुपयांचे सँडविच? असे काय त्यात विशेष आहे, का एवढे महाग?

१७००० रुपयांचे सँडविच? असे काय त्यात विशेष आहे, का एवढे महाग?

New York Cafe Relaunches World's Most Expensive Sandwich, Worth ₹17,000, For Grilled Cheese Day : काय आहे या इतक्या महागड्या सँडविचची गोष्ट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2023 08:36 PM2023-04-13T20:36:07+5:302023-04-13T20:50:39+5:30

New York Cafe Relaunches World's Most Expensive Sandwich, Worth ₹17,000, For Grilled Cheese Day : काय आहे या इतक्या महागड्या सँडविचची गोष्ट...

New York eatery sells world's most expensive grilled cheese sandwich for ₹17,000 | १७००० रुपयांचे सँडविच? असे काय त्यात विशेष आहे, का एवढे महाग?

१७००० रुपयांचे सँडविच? असे काय त्यात विशेष आहे, का एवढे महाग?

सँडविच म्हटल की आपल्या डोळ्यांसमोर येतं ते मस्तपैकी दोन ब्रेडमध्ये भाज्या घातलेल, भरपूर बटर, टोमॅटो सॉस आणि वरून शेव भुरभुरून सर्व्ह केलेला ब्रेडचा एक खास पदार्थ. सकाळचा नाश्ता असो किंवा रात्रीचे जेवण सँडविच हा असा पदार्थ आहे जो कोणत्याही वेळी अतिशय आवडीने खाल्ला जातो. सँडविच हा झटपट होणारा आणि पोटभरीचा पौष्टिक पदार्थ आहे. खरंतर सँडविचमध्ये भरपूर प्रकार पाहायला मिळतात. सँडविच बनवण्याच्या विविध पद्धतीही आहेत. व्हेज सँडविच किंवा सँडविचचे अनेक प्रकार आपण पौष्टिक म्हणून घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खायला देऊ शकतो. सँडविच बनवताना यात वेगवेगळ्या प्रकारच्या पोषकतत्व असलेल्या भाज्या घातल्या जातात. यामुळे रस्त्यावरच्या ठेल्यापासून ते मोठ्या हॉटेलमध्ये मिळणारे सँडविच हा सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ आहे.

 रस्त्यांवरच्या ठेल्यांपासून ते रेस्टोरंस्टमध्ये मिळणाऱ्या सँडविचची किंमत कधी हजारोंच्या घरात जाईल अशी आपण कल्पना केली आहे का ? न्यूयॉर्कमधील सेरेनडिपिटी ३ (Serendipity ३) या रेस्टोरंस्टमध्ये मिळणाऱ्या सँडविचची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल. सामान्यपणे रस्त्यावरील गाड्यांवर किंवा एखाद्या हॉटेलमध्येही मिळणाऱ्या सँडविचची किंमत अगदी २० रुपयांपासून ते  काही शे रुपयांपर्यंत असते. सामान्य लोकही सहजपणे मनात आलं तर सँडविच खाऊ  इतका हा स्वस्त पदार्थ आहे. मात्र अमेरिकेतील एका शहरामध्ये सँडविच एवढं महाग मिळतं की सर्वसामान्यांना ते विकत घेणं शक्य होतं नाही. काय आहे या इतक्या महागड्या सँडविचची गोष्ट(New York Cafe Relaunches World's Most Expensive Sandwich, Worth ₹17,000, For Grilled Cheese Day).       

इतकं महाग सँडविच नेमकं कुठे विकत मिळत ? 

ज्या सँडविचबद्दल आपण बोलत आहोत ते जगातील सर्वात महागडं सँडविच (Most Expensive Sandwich In World) आहे. न्यूयॉर्कमधील सेरेनडिपिटी ३ (Serendipity ३) या रेस्टोरंस्टमध्ये मिळणारं सँडविच हे जगातील सर्वात महागडं सँडविच (Most Expensive Sandwich) आहे. 'गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'नेही (Guinness Book of World Record) या सँडविचची दखल घेतली असून हे सर्वात महागडं सँडविच असल्याचं मानलं जात आहे. या सँडविचची किंमत अंदाजे १७००० रुपये इतकी आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या सेरेनडिपिटी ३ या रेस्तराँमधील डेझर्स्टला सर्वात महागडं डेझर्ट, हॅमबर्गरला सर्वात महागडं हॅमबर्गर, हॉट डॉगलाही सर्वात महागडा हॉट डॉग हे किताब मिळाले आहेत. इतकच काय तर जगातील सर्वात मोठ्या वेडिंग केकचा विक्रमही याच रेस्टोरंस्टच्या नावे आहे.

ऑर्डर केलेला पिझ्झा २ इंचांनी छोटा दिला म्हणून तक्रार करणारी 'ती' होतेय व्हायरल...

आइस्क्रीम विथ पुदिना चटणी इन पाणीपुरी, हा ' असा ' पदार्थ खायचा का तुम्हाला उन्हाळयात?

या सँडविचमध्ये इतकं काय खास आहे? 

या सँडविचमध्ये इतकं काय खास आहे हे सांगायचे झाले तर, या सँडविचचं नाव क्विंटएसेशियल ग्रिल्ड चीज सँडविच (Quintessential Grilled Cheese Sandwich) असं आहे. या सँडविचमध्ये वापरल्या जाणाऱ्या गोष्टी या फारच महागड्या आणि दुर्मिळ प्रकारातील आहेत. या सँडविचची किंमत १७ हजार रुपये इतकी आहे. यामध्ये दोन फ्रेंच पुलमॅन शॅम्पेन ब्रेडचा वापर केला जातो. हा ब्रेड डोम पेरिगनन शॅम्पेन आणि खाता येणाऱ्या गोल्ड फ्लेकपासून तयार केला जातो. यामध्ये सफेट ट्र्रफल बटर वापरलं जातं. तसेच हा ब्रेड बनवताना कॅसिओकावालो पोडोलिको चीज वापरलं जातं. या साऱ्या गोष्टी फार महाग आहेत. हे सँडविच दक्षिण आफ्रिकन लॉब्स्टर टोमॅटो बिस्क डिपिंग सॉससहीत एका बॅकरेट क्रिस्टल प्लेटमध्ये ग्राहकांना सर्व्ह केलं जातं. 

या सँडविचमध्ये वापरल्या जाणाऱ्या चीजची ही आहे खासियत... 

हे सँडविच किती महाग आहे हे आपल्या लक्षात आलेच असेल. या सँडविच सोबतच त्यात वापरल्या जाणाऱ्या चीजची देखील एक वेगळीच खासियत आहे. हे सँडविच खायचं असेल तर ४८ तास आधी म्हणजेच दोन दिवस आधी यासाठी ऑर्डर द्यावी लागते. या सँडविचची ऑर्डर दिल्यानंतरच त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी मागवल्या जातात. यामध्ये जे चीज वापरलं जातं ते खास इटलीवरुन आणलं जातं. हे चीज विशेष प्रजातीच्या गाईच्या दुधापासून बनवलं जातं. या प्रजातीच्या गायी वर्षातून केवल दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये दूध देतात. अशाप्रकारच्या केवळ २५ हजार गाई दूध देण्यासाठी ब्रीड केल्या जातात.

Web Title: New York eatery sells world's most expensive grilled cheese sandwich for ₹17,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.