Lokmat Sakhi >Food > पेरु आणि पुदिन्याचे मस्त वेलकम ड्रिंक; चवीला मस्त, तब्येतीला उत्तम!

पेरु आणि पुदिन्याचे मस्त वेलकम ड्रिंक; चवीला मस्त, तब्येतीला उत्तम!

पेरु आणि पुदिना दोन्ही तब्येतीसाठी उत्तम, सरबत करा, प्या आणि तब्येतही जपा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2021 04:46 PM2021-12-06T16:46:33+5:302021-12-06T16:50:01+5:30

पेरु आणि पुदिना दोन्ही तब्येतीसाठी उत्तम, सरबत करा, प्या आणि तब्येतही जपा.

A nice welcome drink from Peru- guava and Mint; Great taste, great health! | पेरु आणि पुदिन्याचे मस्त वेलकम ड्रिंक; चवीला मस्त, तब्येतीला उत्तम!

पेरु आणि पुदिन्याचे मस्त वेलकम ड्रिंक; चवीला मस्त, तब्येतीला उत्तम!

Highlightsचवीला उत्तम आणि तब्येतीलाही.

सौ. प्रतिभा जामदार


पेरू पुदिना सरबत. अगदी आगळ्या वेगळ्या चवीचे हे सरबत. आमच्या घरच्या सगळ्या पार्ट्यांमधे वेलकम ड्रिंक म्हणून मानाचे स्थान मिळवणारे हे शीतल पेय. पेरु थंडीच्या मौसमात उत्तम मिळतात आणि एरव्हीही. पण सध्या पेरुचा मौसम आहे. पुदिना तर बारमाही. दोन्ही पदार्थ चवीला उत्तम. आणि त्यांचे सरबत तर चवीला अतिशय रुचकर लागते आणि बनवायला अगदी सोपे. माझ्या युट्यूब चॅनलसाठी  माझी मुलगी अमूल्या हिने यावेळी पेरु पुदिना सरबत बनवले आहे.
आपण स्वत:च नाही तर मुलंही हौशीने हे सरबत बनवू शकतात. करायला अगदी सोपे आहे.
याची अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेरूमधील भरपूर प्रमाणात असलेले अ आणि क जीवनसत्व. आणि पुदिनामध्ये कोलेस्ट्रॉल कमी करणारे फायबर, पचनक्रिया सुधारण्यासाठी उपयुक्त असलेले औषधी गुणधर्म हे ही शरीराला मिळतात. रिफाईंड साखरेपेक्षा सरस असणारी खडीसाखर ही आयुर्वेदानुसार थंड गुणधर्म असणारी तसेच वात, पित्त, कफ यांचे संतुलन राखणारी देखील आहे. या तीनच गोष्टी वापरुन केलेले  हे सरबत आल्हाददायक असण्याबरोबरच शरीराला फारच हितकारक आहे. तेव्हा नक्की करुन पहा.
पेरु पुदिनाचे सरबत.


( Image : Google)

 

कृती आणि साहित्य :


दोन वाट्या पिकलेल्या पेरुच्या फोडी, एक वाटी पुदिना, एक वाटी खडीसाखर, सैंधव, आणि पाणी
पाणी घालून साहित्य वाटून घ्या, गाळून घ्या. पाणी घालून सरबत स्वरुपात करा. झाले तयार.
चवीला उत्तम आणि तब्येतीलाही.

 

( प्रतिभा जामदार यांच्या संध्याई किचन या युट्यूब चॅनलवर अन्य रेसिपी पाहता येतील.)

Web Title: A nice welcome drink from Peru- guava and Mint; Great taste, great health!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.