रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) भारतातील लोकप्रिय नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी देशासाठी आजतागायत केलेलं काम कौतुकास्पद ठरते. ते यशस्वी राजकारणी असून, एक उत्कृष्ट खवय्ये म्हणूनही ओळखले जातात. विविध प्रांतातील विविध भागातील त्यांना अनेक पदार्थ खायला आवडतात. शिवाय त्या पदार्थांबद्दल आवर्जून लोकांना माहितीही देतात. खाद्यपदार्थांचे शौकीन असलेले नेते नितीन गडकरी यांना पुण्यातील चमचमीत वडा खायला आवडतो (Batata Vada).
त्यांनी स्वतः कर्ली टेल्स या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत याची माहिती दिली. पुण्यातील प्रसिद्ध प्रभात हॉटेलचा स्पेशल बटाटा वड्याची चव त्यांना आवडते. विशेष म्हणजे त्यांनी बटाटा वड्याची रेसिपीही शेअर केली आहे. बटाटा वड्याची ही रेसिपी थोडी युनिक आहे (Cooking Tips). रोजच्या वड्याला थोडा हटके ट्विस्ट देण्यात आला आहे. पुण्यातील प्रसिद्ध वड्यामध्ये अशी कोणती खासियत आहे. पाहूयात(Nitin Gadkari Pune famous Vada recipe).
पुण्यातील प्रसिद्ध बटाटा वडा करण्यासाठी लागणारं साहित्य
बटाटे
सैंधव मीठ
आलं-लसूण पेस्ट
जॅकी श्रॉफला आवडते वाफेवर शिजवलेली वांग्याबटाट्याची भाजी, पाहा चमचमीत रेसिपी
कांद्याची पेस्ट
हिरवी मिरची
लिंबाचा रस
साखर
बेसन
पाणी
कृती
सर्वप्रथम, २ ते ३ उकडलेले बटाटे मॅश करून घ्या. नंतर त्यात सैंधव मीठ, आलं-लसूण पेस्ट, कांद्याची पेस्ट, बारीक चिरलेली हिरवी मिरची, लिंबाचा रस आणि साखर घालून हाताने मिक्स करा.
कपभर उरलेल्या भाताचे करा इन्स्टंट कुरकुरीत पेपर डोसे, डब्यासाठी बेस्ट ऑप्शन-खाल पोटभर
बेसनाचे बॅटर तयार करण्यासाठी एका बाऊलमध्ये बेसन, पाणी आणि मीठ घालून मिक्स करा. बॅटरमध्ये जास्त पाणी घालू नका. थोडे जाडसर पीठ ठेवा. जेणेकरून वडे क्रिस्पी तयार होतील.
दुसरीकडे तेल गरम करण्यासाठी ठेवा. हाताला थोडे तेल लावून हातावर बटाट्याची भाजी घ्या. त्याचा गोळा तयार करा. गोळा बॅटरमध्ये बुडवून तेलात सोडा, व दोन्ही बाजूने मध्यम आचेवर तळून घ्या. अशा प्रकारे पुण्यातील प्रसिद्ध वडा खाण्यासाठी तयार.