Join us  

नितीन गडकरींना आवडते टोमॅटोची झणझणीत चटणी; वाफेवर शिजवा - कमी तेलात ५ मिनिटात तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2024 4:52 PM

Nitin Gadkari's Favorite Tomato Chutney Recipe : ना मसाला - ना लाल तिखट; पाहा टोमॅटोची झणझणीत चटणी करण्याची सोपी कृती

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे भारतातील लोकप्रिय नेत्यांपैकी एक आहेत. त्यांचं देशासाठी असलेलं योगदान मोठं आहे. ते एक यशस्वी राजकारणी आहेत (Food). त्यांनी आजतागायत अनेक प्रोजेक्ट्स हाताळले. कामामुळे ते प्रचलित आहेतच, पण ते एक उत्कृष्ट खवय्ये देखील आहेत (Cooking Tips). विविध पदार्थ ट्राय करतात, आणि आवर्जून लोकांना रेसिपी शेअरही करतात.

त्यांनी नुकतंच एका मुलाखतीत टोमॅटोची झणझणीत चटणीची रेसिपी शेअर केली. अनेक भागात विविध पद्धतीची टोमॅटोची चटणी तयार केली जाते. जर आपल्याला देखील रोजची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर, एकदा टोमॅटोची झणझणीत चटणी करून पाहा. डोसा, इडली किंवा चपातीसह देखील ही चटणी अप्रतिम लागते(Nitin Gadkari's Favorite Tomato Chutney Recipe).

नितीन गडकरी यांची फेवरीट टोमॅटोची चटणी कशी करायची?

लागणारं साहित्य

टोमॅटो

तेल

लसूण

लाल सुक्या मिरच्या

दात नीट घासले तरी दातांवर पिवळा थर येतो? घरच्याघरी खास टूथपावडर, अमेरिकन तज्ज्ञ सांगतात उपाय

मोहरी

मीठ

साखर

लिंबाचा रस

अशा पद्धतीने तयार करा टोमॅटोची झणझणीत चटणी

सर्वात आधी टोमॅटो मधोमध चिरून घ्या. गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवा. त्यावर एक चमचा तेल ओतून पसरवा. त्यावर अर्धा चिरलेला टोमॅटो पसरवून ठेवा, व झाकण लावून वाफेवर शिजवा. ५ मिनिटानंतर तेलात ६ ते ७ लसणाच्या पाकळ्या आणि लाल सुक्या मिरच्या घालून भाजून घ्या.

सकाळी केलेल्या पोळ्या ऑफिसला डब्यात नेल्या की दुपारपर्यंत वातड होतात? ३ टिप्स- पोळ्या राहतील मऊ

दुसऱ्या पॅनवर एक चमचा तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा मोहरी, एक चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. शेवटी लिंबाचा रस घालून मिक्स करा. तयार फोडणी टोमॅटोमध्ये ओतून मिक्स करा. शेवटी मॅशरने टोमॅटो मॅश करा. २ मिनिटांसाठी टोमॅटोची चटणी शिजवून घ्या. नंतर गॅस बंद करा. अशा प्रकारे टोमॅटोची झणझणीत चटणी खाण्यासाठी रेडी. आपण ही झणझणीत चटणी डोसा, चपाती किंवा भातासोबत खाऊ शकता. 

टॅग्स :नितीन गडकरीअन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स