Join us  

नितीन गडकरींनी सांगितली दही वांग्याच्या कापांची हटके-सिंपल रेसिपी, चवीला जबरदस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2024 12:30 PM

Nitin Gadkari's Favourite Dahi Baingan, Recipe Inside : वांग्याचे तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर, दही वांग्याचे काप ही चटपटीत रेसिपी करून पाहा..

भारताचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी अलीकडेच एका मुलाखतीत, त्यांच्या आवडत्या खाद्यपदार्थांची बाजू उघड केली. कर्ली टेल्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी विविध पदार्थांची माहिती दिली, व रेसिपीही शेअर केल्या आहेत. पुण्यातील प्रसिद्ध बटाटा वडा असो किंवा झणझणीत ठेचा या रेसिपीवरून मंत्री किती फुडी आहेत, हे कळून येते.

या मुलाखती दरम्यान, त्यांनी दही वांग्याचे काप ही रेसिपी शेअर केली आहे (Kitchen Tips). आपण वांगे बटाट्याचे भाजी, वाग्यांचे काप, भरली वांगी, वांग्याचं भरीत खाल्लंच असेल (Cooking Tips). पण दही वांग्याचे काप ही रेसिपी आपण पहिल्यांदाच ऐकलीच असेल. जर वांग्याचे तेच-तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर, ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पाहा(Nitin Gadkari's Favourite Dahi Baingan, Recipe Inside).

दही वांग्याचे काप करण्यासाठी लागणारं साहित्य

वांगी

तेल

जिरे

मोहरी

ज्वारीच्या पिठाची लुसलुशीत मसाला इडली; बनवायला सोपी; पौष्टिक - वजन होईल कमी

हिंग

लाल तिखट

मीठ

दही

कृती

सर्वप्रथम, वांग्याचे गोल काप करा. पॅनमध्ये २ चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा मोहरी, हिंग, जिरं घाला. जिरे-मोहरी तडतडल्यानंतर त्यावर वांग्याचे काप ठेवून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या.

कोण म्हणतं विरजणाशिवाय दही लावता येत नाही? ३ सुपर ट्रिक्स; घरीच तयार होईल विकतसारखे घट्ट दही

दुसरीकडे फोडणीच्या पळीत २ चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा जिरं, मोहरी घाला. एका वाटीत दही घ्या. त्या दह्यामध्ये फोडणी ओतून मिक्स करा. त्यात अर्धा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ घालून मिक्स करा, व तयार फोडणीची दही वांग्याच्या कापांवर लावून पसरवा. अशा प्रकारे सिंपल पण चटपटीत दही वांग्याचे काप खाण्यासाठी रेडी. आपण हे काप खिचडी, चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकता. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सनितीन गडकरी