Lokmat Sakhi >Food > वयाच्या ६६ व्या वर्षीही राहाच्या आजीचा फिटनेस एकदम भारी, ग्लोइंग स्किन- तब्येतीसाठी खातात 'खास' पदार्थ...

वयाच्या ६६ व्या वर्षीही राहाच्या आजीचा फिटनेस एकदम भारी, ग्लोइंग स्किन- तब्येतीसाठी खातात 'खास' पदार्थ...

Neetu Kapoor reveals her secret to glowing skin at 66, shares ‘great recipe for probiotics from south India’ : Neetu Kapoor's BEST Probiotic Recipe : Nitu Kapoor Shares Her Secret to Making Probiotic Kanji : नीतू कपूर त्यांच्या डाएटमध्ये खातात भाताचा हा एक चविष्ट पदार्थ, कोणता आहे तो पदार्थ पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2024 14:42 IST2024-12-16T14:41:12+5:302024-12-16T14:42:31+5:30

Neetu Kapoor reveals her secret to glowing skin at 66, shares ‘great recipe for probiotics from south India’ : Neetu Kapoor's BEST Probiotic Recipe : Nitu Kapoor Shares Her Secret to Making Probiotic Kanji : नीतू कपूर त्यांच्या डाएटमध्ये खातात भाताचा हा एक चविष्ट पदार्थ, कोणता आहे तो पदार्थ पाहा...

Nitu Kapoor Shares Her Secret to Making Probiotic Kanji Neetu Kapoor reveals her secret to glowing skin at 66, shares ‘great recipe for probiotics from south India Neetu Kapoor's BEST Probiotic Recipe | वयाच्या ६६ व्या वर्षीही राहाच्या आजीचा फिटनेस एकदम भारी, ग्लोइंग स्किन- तब्येतीसाठी खातात 'खास' पदार्थ...

वयाच्या ६६ व्या वर्षीही राहाच्या आजीचा फिटनेस एकदम भारी, ग्लोइंग स्किन- तब्येतीसाठी खातात 'खास' पदार्थ...

ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर (Neetu Kapoor) या वयाच्या ६६ व्या वर्षी देखील तितक्याच फिट अँड फाईन आहेत. त्यांचा फिटनेस याही वयात एखाद्या तरुणीला लाजवेल असाच आहे. साधारणतः वयाची साठी उलटली की, आरोग्याच्या तक्रारी लहान मोठ्या कुरबुरी सतावू लागतात. परंतु वयाची साठी उलटून देखील इतके फिट अँड फाईन व सुंदर दिसणे हे कोणत्याही वरदानापेक्षा (Neetu Kapoor's BEST Probiotic Recipe) कमी नाही. नीतू कपूर आपल्या फिटनेस आणि आरोग्याच्या (Nitu Kapoor Shares Her Secret to Making Probiotic Kanji) बाबतीत सगळ्या गोष्टी अगदी काटेकोरपणाने पाळताना दिसतात. आपले आरोग्य आणि फिटनेस वयाची साठी उलटली तरीही उत्तम राहावा यासाठी व्हिटॅमिन्स, मिनरल्स यासोबतच प्रोबायोटिक्स देखील तितकेच महत्वाचे असतात(Neetu Kapoor reveals her secret to glowing skin at 66, shares ‘great recipe for probiotics from south India’).

प्रोबायोटिक्सची गरज भागवली जावी यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रोबायोटिक्सयुक्त ड्रिंक पितो. परंतु नीतू कपूर यांनी नुकतेच दिलेल्या एका मुलाखतीत, प्रोबायोटिक्सयुक्त एका होममेड खास पदार्थाची रेसिपी शेअर केली आहे. नीतू कपूर त्यांच्या या वयातही त्या तितक्याच तरुण आणि सुंदर दिसतात. फिटनेसच्या बाबतीत कुणापेक्षाही कमी नाही. नीतू कपूर (Neetu Kapoor's Perfect Fermented Rice Recipe) अनेकदा त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवर फॅनफॉलोअर्ससाठी   विविध टिप्स शेअर करत असतात. ज्यातून त्यांचा फिटनेस रुटीन आणि डाएट कळतो. जाणून घेऊयात वयाच्या ६६ व्या वर्षी देखील त्यांच फिटनेसचं सीक्रेट नेमकं काय आहे...

'कांजी राईस' हा नवीन पदार्थ कोणता ?

'कांजी राईस' तयार करण्यासाठी सर्वात आधी एका मातीच्या भांड्यात २ ते ३ टेबलस्पून शिजवलेला भात घ्यावा. त्यानंतर या शिजवून घेतलेल्या भातात कपभर गरजेनुसार पाणी घालावे. मग हे मातीच भांड झाकून रात्रभरासाठी तसेच ठेवून द्यावे. रात्रभरात पाणी आणि शिजवलेला भात यात फर्मेंटेशनची प्रक्रिया चांगल्या प्रकारे होते. रात्रभर फर्मेंटेशन करुन घेतलेल्या भातात गाजर बीट उकळवून घेतलेलं पाणी म्हणजेच कांजी घालावी. त्यानंतर सगळे जिन्नस एकत्रित करून त्यात थोडासा बारीक चिरलेला कांदा आणि नेहमीप्रमाणे जशी फोडणी देतो तशीच फोडणी द्यावी. तुमचा 'कांजी राईस' खाण्यासाठी तयार आहे. नीतू कपूर यांनी सांगितले की, गाजर आणि बीटचे उकळी काढलेले पाणी हे सर्वोत्तम प्रोबायोटिक आहे. 

फक्त कपभर मटारचे करा चविष्ट धिरडे, हिवाळ्यातला झटपट पौष्टिक हिरवागार कुरकुरीत नाश्ता-सोपी रेसिपी...

नीतू कपूर अनेकदा त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर हेल्दी ब्रेकफास्टचे फोटो शेअर करत असतात. त्यांना नाश्त्यात पोहे खायला आवडतात. ओट्स पोहे खाल्ल्याने अनेक पटींनी पोषण मिळते. नीतू कपूर यांना बहुतेक रोल केलेले ओट्स पोहे खायला आवडतात.

जान्हवी कपूर हिवाळ्यात आवडीने खाते रताळ्याचा ' हा ' खास पदार्थ, वजन होते कमी - पचनही सुधारते...


कपभर आवळ्याचे करा घरगुती आवळा सीरप, इन्स्टंट आवळा सरबताची साधीसोपी रेसिपी...

नीतू कपूर दुपारच्या जेवणात चपाती, डाळ, भाज्या असे साधे जेवण अगदी आवडीने खातात. त्यांना जेवणादरम्यान बदाम खायला आवडतात. सुका मेवा हा फायबरचा चांगला स्रोत आहे, त्यामुळे ते खाल्ल्याने तुम्हाला वारंवार भूक लागत नाही आणि जेवणाचे प्रमाणही कमी होते. अगदी कमी तेलाचा वापर करून त्यांचे अन्नपदार्थ शिजवले जातात.

 

Web Title: Nitu Kapoor Shares Her Secret to Making Probiotic Kanji Neetu Kapoor reveals her secret to glowing skin at 66, shares ‘great recipe for probiotics from south India Neetu Kapoor's BEST Probiotic Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.