Join us  

उकड न काढता, न थापता करा मऊ लुसलुशीत तांदळाची भाकरी, कोकणी स्टाईल रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2023 6:35 PM

No Boil, No Knead Soft Luscious Rice Bread, Konkani Style Recipe न बिघडणारी, झपटपट होणारी आणि टम्म फुगणारी तांदळाची भाकरी करण्याची सोपी पद्धत..

तांदळाची भाकरी बनवणं ही एखाद्या टास्कपेक्षा कमी नाही. मऊ - लुशलुशीत तांदळाच्या भाकरीसह पिठलं खूप चविष्ट लागतं. तांदळाची भाकरी कोणत्याही भाजी किंवा रस्सा आमटीसह चविष्ट लागते. तांदळाची भाकरी करायची म्हटलं की, आधी उकड काढा मग ती थापा आणि मग भाजा अशी मोठी प्रक्रिया आहे, ही पद्धत बऱ्याचदा कंटाळवाणी वाटते. कधी कधी जर उकड बिघडली तर, तांदळाची भाकरी देखील थापायला अवघड जाते.

नोकरदार महिलांना तांदळाची भाकरी बनवण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. आपल्याला जर न थापता, अगदी उकड न काढताही लुसलुशीत तांदळाची भाकरी हवी असल्यास या रेसिपीला फॉलो करा. या पद्धतीने भाकरी बनवल्यास कमी वेळात तांदळाची भाकरी रेडी होईल. चला तर मग वेळखाऊ तांदळाची भाकरी कमी वेळात न थापता कशी बनते पाहूयात(No Boil, No Knead Soft Luscious Rice Bread, Konkani Style Recipe).

कुकरमध्ये बासूंदी? करा झटपट ‘कुकर बासूंदी’, ना खाली लागण्याची भीती-न उतू जाण्याची..

तांदळाची भाकरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य

तांदळाचं पीठ

चवीनुसार मीठ

पाणी

तेल

अशी बनवा झटपट तांदळाची भाकरी

सर्वप्रथम, परातीत एक कप तांदळाचं पीठ घ्या. दुसरीकडे एका भांड्यात एक कप पाणी उकळवत ठेवा. त्यात चिमुटभर मीठ घालून पाण्याला उकळी येऊ द्या. पाण्याला उकळी आल्यानंतर हे पाणी तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करा. हे पीठ गरम असल्यामुळे चमच्याच्या मदतीने पिठाला मिक्स करा. हाताला चटका बसू नये म्हणून, थंड पाण्याने पीठ मळून घ्या. पीठ मळत असताना मध्ये - मध्ये हाताला पाणी लावून पीठ मळा. जेणेकरून पीठ मऊ - लुसलुशीत मळून होईल.

कणिक मळून ठेवली की काळी पडते? ४ टिप्स, सकाळी मळून ठेवली तरी कणिक दिसेल ताजी

पीठ मळून झाल्यानंतर लोखंडी तव्यावर २ ते ३ थेंब तेल लावून ग्रीस करा, आता तवा गरम करण्यासाठी गॅसवर ठेवा. एकीकडे पोळपाट घ्या, त्यावर एक प्लास्टिक पेपर ठेवा, त्या पेपरला तेल व पाणी लावून ग्रीस करून घ्या. अशा प्रकारे दुसरा प्लास्टिक पेपर देखील तेल व पाणी लावून ग्रीस करा.

आता हातावर मळलेल्या पिठाचा गोळा घ्या, त्या गोळ्याला पुन्हा हातावर मळून घ्या. या पिठाचा गोळा, प्लास्टिक पेपरवर ठेवा, त्यावर दुसरे प्लास्टिक पेपर ठेवा. हाताने मळलेल्या पिठाला चपटा करून घ्या, आता लाटण्याच्या मदतीने भाकरी लाटून घ्या. भाकरी तयार झाल्यानंतर त्यावरील प्लास्टिक पेपर काढून घ्या, व ही भाकरी शेकण्यासाठी तव्यावर घाला. व दोन्ही बाजूने शेकून घ्या. अशाप्रकारे टम्म फुगणारी न थापता, न उकड घालता तांदळाची भाकरी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स