Join us  

पाक करायची गरज नाही, खव्याचीही गरज नाही; फक्त २ वाटी रव्यात करा स्वादिष्ट लाडू! पाहा मस्त रेसिपी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2023 4:59 PM

No Chashni no mawa laddu : एका कढईत तेल गरम करून त्यात  ड्रायफ्रुट्स, मनुके व्यवस्थित तळून घ्या. एका मिक्सरच्या भांड्यात चपातीचा चुरा करून घ्या.

सिजन कोणताही असो मधल्यावेळेत भूक लागल्यास लाडू खाल्ले तर पोट भरल्यासारखं वाटतं आणि बराचवेळ भूकही लागत नाही. कमी साहित्यात कमीत कमी वेळात तुम्ही रव्याचे लाडू बनवू शकता. (No Chashni no mawa laddu) हे लाडू बनण्यासाठी मावा, साखरेचा पाक इत्यादी साहित्य वापरावं लागतं. जास्त खर्च न करता अगदी कमीत साहित्यातही छान लाडू तयार होऊ शकतात. (Suji ke Ladu No Chashni No Khoya Instant Suji Laddu)

रवा लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य

रवा - २ कप

चिरलेला नारळ - १/२ कप

पाणी - १ कप

तूप - २ कप

बदाम - १/४ कप

काळे मनुके - 2 चमचे

काजू - १/४ कप

वेलची पावडर  - १/२ टीस्पून

गुळाची पावडर (देसी खंड) - १ कप

कृती

१) २ कप रवा एका परातीत घ्या. एका मिक्सरच्या भांड्यात ओल्या खोबऱ्याचे काप वाटून घ्या. नारळाचं दूध काढल्यानंतर ते रव्यात मिसळा पीठ एकसंध होईपर्यंत मळून घ्या.

२) मळलेल्या पीठाची जाडसर पोळी लाटून तूप लावून शेकून घ्या.  एका कढईत तेल गरम करून त्यात  ड्रायफ्रुट्स, मनुके व्यवस्थित तळून घ्या. एका मिक्सरच्या भांड्यात चपातीचा चुरा करून घ्या.

३) त्यात तळलेले ड्रायफ्रुट्स, गुळ पावडर घालून व्यवस्थित एकत्र करून घ्या. या मिश्रणाचे मध्यम आकाराचे लाडू वळून घ्या. तयार आहेत पौष्टीक रव्याचे लाडू.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न