Join us  

खोबरं न वापरता करा फक्त १० मिनिटांत साऊथ इंडियन चटणी, चवीला बेस्ट आणि झटपट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2024 8:43 AM

No Coconut Red Chutney : South Indian Chutney For Idli, Dosa : Instant Chutney without Coconut for Breakfast : चटणीसाठी खोबरं नसेल तरीही काम सोपं, चटणी चमचमीत...

इडली, डोसा, उत्तप्पा, मेदू वडा यांसारखे साऊथ इंडियन पदार्थ म्हटले की त्यासोबत सांबार, चटणी आलेच. साऊथ इंडियन पदार्थ हे गरमागरम सांबार आणि चटणीशिवाय अधुरेच आहेत. सांबार - चटणीशिवाय आपण या पदार्थांची कल्पनाच करु शकत नाही. साऊथ इंडियन पदार्थांसोबत दिली जाणारी खोबऱ्याची पांढरी चटणी किंवा टोमॅटोची (How to make chutney without coconut) मसालेदार लाल चटणी या दोन्ही प्रकारच्या चटण्या म्हटलं की तोंडाला पाणी सुटत. चटकदार चवीच्या या चटण्यांवर अगदी आवडीने ताव मारला जातो( South Indian Chutney For Idli, Dosa).

साऊथ इंडियन पदार्थांसोबत खाण्यासाठी चटणी करताना आपण वेगवगेळ्या प्रकारच्या चटण्या करतो. कधी शेंगदाण्याची, कधी खोबऱ्याची अशा अनेक प्रकारच्या चटण्या केल्या जातात. प्रत्येक घरात या साऊथ इंडियन पदार्थांसोबत केल्या जाणाऱ्या चटण्यांची रेसिपी वेगळी असते. उडुपी हॉटेल किंवा स्टॉलवर इडली, डोसा, उत्तप्पा, मेदू वडा या पदार्थांसोबत टोमॅटोची लाल चुटुक आंबट गोड चवीची चटणी दिली जाते. ही लालचुटुक आंबट - गोड चवीची चटणी आता आपण घरच्याघरी देखील तयार करु शकतो. या चटपटीत लाल चटणीची रेसिपी पाहूयात.(South Indian Red Chutney Recipes Without Coconut For Idli & Dosa).    

साहित्य :- 

१. तेल - २ ते ३ टेबलस्पून २. जिरे - १ टेबलस्पून ३. मोहरी - १ टेबलस्पून ४. पांढरी उडीद डाळ - २ टेबलस्पून ५. लसूण - ४ ते ५ लसूण पाकळ्या ६. आलं - एक छोटा तुकडा ७. टोमॅटो - ४८. मीठ - चवीनुसार९. लाल सुक्या मिरच्या - १० ते १२१०. चिंच - १ टेबलस्पून ११. गूळ - १ टेबलस्पून १२. पाणी - गरजेनुसार १३. चणा डाळ - १ टेबलस्पून (भाजलेली डाळ)१४. हिंग - १/२ टेबलस्पून १५. कडीपत्ता - ६ ते ८ पाने

इडली- डोशाचे पीठ खूप आंबले तर वाया जाते, लक्षात ठेवा ५ गोष्टी! पीठ फसफसणार नाही...

फक्त १० मिनिटांत करा गरमागरम उडपी सांबार, पावसाळ्यात वाफाळते इडली सांबार खा मनसोक्त...

कृती :- 

१. एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात जिरे, मोहरी, पांढरी उडीद डाळ घालून खमंग फोडणी द्यावी. त्यानंतर त्यात लसूण पाकळ्या आणि आल्याचे तुकडे घालावेत. २. आता पॅनमध्ये टोमॅटोचे माध्यम आकाराचे तुकडे करून घालावेत. त्यावर चवीनुसार मीठ घालून सगळे जिन्नस व्यवस्थित चमच्याने ढवळून घ्यावेत. ३. सगळ्यात शेवटी पॅनमध्ये लाल सुक्या मिरच्या व चिंच घालून सगळे मिश्रण एकजीव करून ४ ते ५ मिनिटे व्यवस्थित शिजवून घ्यावे. ४. हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात काढून थोडे थंड होऊ द्यावे. त्यानंतर मिक्सरमध्ये थोडे किसलेले गूळ आणि चवीनुसार पाणी घालून हे सगळे जिन्नस बारीक वाटून घ्यावेत.

फिल्टर नाही घरी, डोन्ट वरी! फिल्टर न वापरता ५ मिनिटांत करा फेसाळती फिल्टर कॉफी... 

५. आता एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात मोहरी, भाजून घेतलेली चणा डाळ, पांढरी उडीद डाळ, हिंग, कडीपत्ता, लाल सुक्या मिरच्या घालून खमंग फोडणी तयार करून घ्यावी. त्यानंतर या फोडणीमध्ये मिक्सरमध्ये वाटून घेतलेली चटणी घालून ढवळून घ्यावे. गरजेनुसार पाणी घालून आपल्या आवडी प्रमाणे चटणीची कंन्सिस्टंसी तयार करुन घ्यावी. 

इडली, डोसा, उत्तप्पा, मेदू वडा यांसारख्या साऊथ इंडियन पदार्थांसोबत खाण्यासाठी ही चटपटीत विकतसारखी लाल चटणी तयार आहे.

टॅग्स :अन्नपाककृती