Lokmat Sakhi >Food > ना डाळ - ना सोडा, कपभर तांदुळ घ्या, करा मऊ जाळीदार नारळाचा डोसा! पौष्टिक आणि पोटभर

ना डाळ - ना सोडा, कपभर तांदुळ घ्या, करा मऊ जाळीदार नारळाचा डोसा! पौष्टिक आणि पोटभर

No Dal,No Soda Soft & Tasty Coconut Dosa Recipe : कापसाहून मऊ जाळीदार स्पाँजी नारळाचा डोसा करण्याची सोपी कृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2024 04:01 PM2024-05-19T16:01:27+5:302024-05-19T17:34:02+5:30

No Dal,No Soda Soft & Tasty Coconut Dosa Recipe : कापसाहून मऊ जाळीदार स्पाँजी नारळाचा डोसा करण्याची सोपी कृती

No Dal,No Soda Soft & Tasty Coconut Dosa Recipe | ना डाळ - ना सोडा, कपभर तांदुळ घ्या, करा मऊ जाळीदार नारळाचा डोसा! पौष्टिक आणि पोटभर

ना डाळ - ना सोडा, कपभर तांदुळ घ्या, करा मऊ जाळीदार नारळाचा डोसा! पौष्टिक आणि पोटभर

नेहमी नाश्त्याला काय बनवावं हा प्रश्न प्रत्येकाला पडतो (Coconut Dosa). उपमा, पोहे, मसाला डोसा, इडली, मेदू वडा आपण खातोच. साऊथ इंडियन असो किंवा महाराष्ट्रीयन हे पदार्थ खाऊन बऱ्याचदा कंटाळाही येतो (Cooking Tips). अनेकांना डोसे खायला आवडतात. डोश्यांमध्ये देखील अनेक प्रकार आहेत. मसाला डोसा, मैसूर डोसा, साधा डोसा आपण खाल्लाच असेल. पण कधी नारळाचा डोसा करून पाहिलं आहे का?

नारळाचा डोसा करायला सोपा आणि चवीलाही मऊ आणि चविष्ट लागतो. जर आपल्यला डोश्यामध्ये काहीतरी हटके ट्राय करायचं असेल तर, एकदा नारळाचा डोसा करून पाहा. कापसाहून मऊसूत जाळीदार स्पंज नारळाचा डोसा आपल्याला नक्कीच आवडेल(No Dal,No Soda Soft & Tasty Coconut Dosa Recipe).

जाळीदार नारळाचा डोसा करण्यासाठी लागणारं साहित्य

तांदूळ

भात

१ कप सोया चंक्सचे करा इन्स्टंट आप्पे, १० मिनिटांत खा चमचमीत सोयाबिन आप्पे, वजनही होईल कमी

खोबरं

पाणी

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये एक कप तांदूळ घ्या. त्यात पाणी घालून तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. नंतर तांदूळ ५ ते ६ तासांसाठी भिजत ठेवा.

तांदूळ भिजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या. त्यात अर्धा कप ओल्या खोबऱ्याचे तुकडे, एक कप भात, चवीनुसार मीठ आणि अर्धा कप पाणी घालून वाटून घ्या. ज्याप्रमाणे आपण डोश्यासाठी पीठ तयार करतो. त्याचप्रमाणे करायचं आहे.

रोज फोडणीचा भात कशाला? भात उरला तर करा भाताचा ढोकळा झटपट; नाश्ता स्पेशल खास रेसिपी

एका बाऊलमध्ये बॅटर काढून घ्या. त्यावर झाकण ठेवा, आणि पीठ आंबवण्यासाठी ६ ते ७ तासांसाठी ठेवा. ७ तासानंतर चमच्याने बॅटर मिक्स करून घ्या.

लोखंडी किंवा डोश्याचा तवा गरम करण्यासाठी ठेवा. तवा गरम झाल्यानंतर त्यावर चमचाभर बॅटर ओतून पसरवा, व त्यावर २ मिनिटांसाठी झाकण ठेवा. नंतर दोन्ही बाजूने भाजून घ्या. अशा प्रकारे नारळाचा स्पाँजी डोसा खाण्यासाठी रेडी.

Web Title: No Dal,No Soda Soft & Tasty Coconut Dosa Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.